हार्दिक पांड्याने केलेल्या ९३ धावांच्या जोरावर भारताने केप टाऊन कसोटीच्या दुसऱ्या दिवशी, कमी धावसंख्येत बाद होण्याची नामुष्की टाळली. भुवनेश्वर कुमार आणि हार्दिक पांड्याने केलेल्या ९९ धावांच्या भागिदारीमुळे भारताने २०० धावांचा टप्पा ओलांडला. पहिल्या डावात आफ्रिकेला १४२ धावांची आघाडी मिळाली असली तरीही डेल स्टेनची दुखापत आणि दुसऱ्या डावात सलामीवीरांचं लवकर माघारी परतणं यामुळे भारताने या कसोटीत आपलं आव्हान कायम राखलं आहे.
अवश्य वाचा – आफ्रिकेत विराटने कर्णधार आणि फलंदाज या भूमिकांमध्ये समन्वय साधणं गरजेचं – सौरव गांगुली
तिसऱ्या दिवसाच्या सुरुवातीला सामन्यात पावसाने व्यत्यय आणल्यामुळे पहिल्या सत्राचा खेळ वाया गेला. मात्र केप टाऊन कसोटीच्या दुसऱ्या दिवशी ८ विक्रमांची नोंद करण्यात आली.
१ – पहिल्या डावात पिछाडीवर पडल्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केवळ एक वेळा पाहुणा संघ कसोटी सामना जिंकू शकला आहे. १९९७ साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या डावात १०१ धावांची पिछाडीवर पडल्यानंतर ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेला पराभूत केलं होतं.
१ – दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये आठव्या विकेटसाठी १०० धावांची भागीदारी करण्याचा विक्रम प्रविण अमरे- किरण मोरे या भारतीय जोडीच्या नावावर होता. कालच्या खेळाच पांड्या-भुवनेश्वर कुमार जोडीला हा विक्रम मोडण्याची संधी आली होती. मात्र केवळ १ धावेने त्यांची ही संधी हुकली.
२ – ४६ चेंडूत हार्दिक पांड्याने झळकवलेलं अर्धशतक हे दक्षिण आफ्रिकेतलं भारतीय फलंदाजाचं दुसरं सर्वात जलद शतक ठरलं आहे. महेंद्रसिंह धोनीने २०१० साली सेंच्युरिअनच्या मैदानावर ४० चेंडूत अर्धशतक झळकावलं होतं.
३ – आतापर्यंत खेळलेल्या ४ कसोटी डावांपैकी ३ डावांमध्ये त्याने अर्धशतकी खेळी केली आहे.
४ – गेल्या ६ कसोटीपैकी ४ कसोटी सामन्यांमध्ये आफ्रिकेचा जलदगती गोलंदाज डेल स्टेनला दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली आहे.
२०१४ साली इंग्लंडविरुद्ध डरबन कसोटी (उजव्या खांद्याला दुखापत)
२०१५ साली भारताविरुद्ध मोहाली कसोटी (मांडीची दुखापत)
२०१६ साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध पर्थ कसोटी (उजव्या खांद्याला दुखापत)
२०१७ साली भारताविरुद्ध केप टाऊन कसोटी (टाचेला दुखापत)
५ – सलग ५ कसोटी सामन्यांमध्ये अर्धशतकी खेळी करण्याची रोहित शर्माची मालिका काल खंडीत झाली. कगिसो रबाडाच्या गोलंदाजीवर शर्मा ११ धावांवर माघारी परतला. याआधीच्या ५ कसोटी सामन्यांमध्ये रोहित शर्माने ८२, ५१*, १०२*, ६५ आणि ५०* धावा काढल्या आहेत.
६ – दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पदार्पण करताना पहिल्याच डावात अर्धशतक ठोकणारा हार्दिक पांड्या सहावा भारतीय खेळाडू ठरला आहे. या अर्धशतकासह हार्दिक पांड्या; विराट कोहली, विरेंद्र सेहवाग, प्रविण अमरे, दिनेश कार्तिक आणि किरण मोरे यांच्या पंक्तीत जाऊन बसला आहे.