वन-डे मालिकेत ४-१ अशी विजयी आघाडी घेतल्यानंतर भारत आता अखेरच्या सामन्यात आफ्रिकेविरुद्ध दोन हात करेलं. यानंतर भारत आणि आफ्रिका यांच्यात ३ टी-२० सामन्यांची मालिका रंगणार आहे. भारताचा डावखुरा फलंदाज सुरेश रैनाने भारताच्या टी-२० संघात पुनरागमन केलं आहे. या मालिकेसाठी सुरेश रैना जयदेव उनाडकट आणि लोकेश राहुल या आपल्या दोन साथीदारांसह नुकताच आफ्रिकेला रवाना झाला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवर रैनाने आपला फोटो शेअर केला आहे.
En route Joburg . can’t wait to get started . @ Dubai International Airport https://t.co/nG8XUYsNqG
— Suresh Raina (@ImRaina) February 15, 2018
सुरेश रैनाच्या या फोटोवर पाकिस्तानी जलदगती गोलंदाज मोहम्मद आमीरने आपली प्रतिक्रीया देत रैनाला आफ्रिकेविरुद्ध मालिकेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
Good luck bro do well
— Mohammad Amir (@iamamirofficial) February 15, 2018
मोहम्मद आमीर व्यतिरीक्त दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू जॉन्टी ऱ्होड्सनेही रैनाला त्याच्या पुनरागमनाबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत.
Sorry I missed u at Dubai airport , my brother; am sitting on @emirates flight to Cape Town! Back yourself and have fun; just rewards for all your hard work!
— Jonty Rhodes (@JontyRhodes8) February 15, 2018
वन-डे मालिका विजयामुळे भारत आयसीसीच्या वन-डे क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर पोहचला आहे. त्यामुळे सुरेश रैना आणि इतर खेळाडूंच्या उपस्थितीत भारतीय संघ कशी कामगिरी करतो हे पहावं लागणार आहे.