श्रीलंकेविरुद्ध भारताची वन-डे मालिका रविवारपासून सुरु होत आहे. या दौऱ्यासाठी भारतीय संघ दम्बुल्लामध्ये दाखल झाला आहे. भारताच्या वन-डे संघात रोहीत शर्माला उप-कर्णधार म्हणून बढती मिळाली आहे. त्याआधी रोहीत शर्माने नेट्समध्ये आपल्या फलंदाजीचा सराव केला. रोहीतवर वन-डे संघाच्या फलंदाजीची मोठी मदार आहे. शिखर धवनसोबत रोहीत भारताच्या डावाची सुरुवात करतो. त्यामुळे रोहीतच्या खेळीवर भारतीय संघ कशी कामगिरी करतो हे ठरत असतं. त्यामुळे पहिल्या सामन्याआधी रोहीत शर्माने नेट्समध्ये आपली सर्व शस्त्र परजून पाहिली.
अवश्य वाचा – रनमशीन कोहली रंगला आठवणींत
भारताने श्रीलंकेविरुद्धची कसोटी मालिका ही ३-० ने आपल्या खिशात घातली आहे. त्यामुळे वन-डे मालिकेत श्रीलंकेचा संघ भारताला कशी टक्कर देतो याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. वन-डे मालिका सुरु होण्याआधी आयसीसीने जाहीर केलेल्या क्रमवारीत भारताचा कर्णधार विराट कोहलीने पहिला क्रमांक पटकावला आहे. त्यामुळे कसोटी मालिकेप्रमाणेच भारत श्रीलंकेचा वन-डे आणि टी-२० सामन्यात धुव्वा उडवणार का हे पहावं लागणार आहे.
अवश्य वाचा – वन-डे क्रमवारीत विराट कोहली ‘किंग’ !