भारतीय संघाने वेस्टइंडिजमधली तिरंगी मालिका जिंकली आणि ‘हम भी कूछ कम नही’ असे सिद्ध करत भारताच्या १९ वर्षाखालील संघानेही ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या तिरंगी मालिकेच्या चषकावर भारताचे नाव कोरले. भारत आणि यजमान ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध झालेल्या अंतिम सामन्यात भारताच्या गोलंदाजांनी आपल्या भेदक गोलंदाजीच्या बळावर ऑस्ट्रेलिया संघाला अवघ्या ७५ धावांवर गारद केले. त्यानंतर भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया संघाने दिलेले कूचकामी आव्हान भारतीय संघाने दोन बाद ७६ धावाकरत अवघ्या १५ षटकांत गाठले. मुख्यम्हणजे भारतीय संघाने या मालिकेत एकही सामना गमावलेला नाही.
भारतीय संघाचा कर्णधार विजय झोल मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. विजय झोलने संपुर्ण मालिकेच उत्कृष्ट कामगिरी केली. भारताच्या दीपक हुड्डाने आपल्या दहा षटकांमध्ये २२ धावा देऊन तीन विकेट्स झटकावल्या तर, चामा मिलिंद, कुलदीप यादव आणि अभिमन्यु लांबा यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा