२३ डिसेंबरपासून संयुक्त अरब अमिराती (यूएई) येथे होणाऱ्या १९ वर्षांखालील आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आशिया चषक स्पर्धेसाठी २० सदस्यीय संघ निवडला आहे. या संघाचा कर्णधार यश धूळ आहे. अखिल भारतीय ज्युनियर निवड समितीने आशियाई क्रिकेट परिषद (एसीसी) स्पर्धेपूर्वी ११ ते ९ डिसेंबर दरम्यान बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) येथे शिबिरासाठी २५ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे.

दरम्यान, वसू वत्स याचाही २० जणांच्या संघात समावेश करण्यात आला आहे. मात्र, त्याच्या फिटनेसवर प्रश्नचिन्ह आहे. तो जर वेळेत फिट झाला, तरच तो ही स्पर्धा खेळू शकणार आहे. शिवाय, जुन्नर तालुक्यातील कौशल तांबेचीही या संघात निवड झाली आहे. कौशलला यापूर्वी बांगलादेशविरुद्ध झालेल्या तिरंगी मालिकेत १९ वर्षांखालील भारत ब संघात संधी मिळाली होती. अष्टपैलू खेळाडू म्हणून कौशलची ओळख आहे.

केंड्स क्रिकेट अकादमीत कौशल मागील दहा वर्षापासून प्रशिक्षण घेत आहे. पुण्यातील एसपी कॉलेजमध्ये प्रथम वर्षात शिक्षण घेत असलेल्या कौशलने पुण्यातील विविध क्लबमधून क्रिकेट खेळले. २०१६ मध्ये त्याला एमसीएचा उदयोन्मुख खेळाडू म्हणून गौरवण्यात आले होते.

हेही वाचा – VIDEO : चहलच्या बायकोनं खेळला धोनीचा हेलिकॉप्टर शॉट; नेटिझन्स म्हणाले, ‘‘आधी बॅट नीट पकड”

स्टँडबाय खेळाडू म्हणून, बीसीसीआयने आयुष सिंग ठाकूर, उदय सहारन, शाश्वत डंगवाल, दानुष गोडा आणि पीएम सिंग राठौर यांची निवड केली आहे. हे खेळाडू राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या शिबिराचा भाग असतील.

भारतीय संघ –

हरनूर सिंग पन्नू, अंगक्रिश रघुवंशी, अंश गोसाई, एसके रशीद, यश धूळ (कर्णधार), अन्नेश्वर गौतम, सिद्धार्थ यादव, कौशल तांबे, निशांत सिंधू, दिनेश बाना (यष्टीरक्षक), आराध्य यादव (यष्टीरक्षक), राजनगड बावा, राजवर्धन हंगरगेकर, गर्व सांगवन, रवी कुमार, रिषिथ रेड्डी, मानव पारख, अमृत राज उपाध्याय, विकी ओस्वाल, वासू वत्स.

Story img Loader