भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याची सुरुवात जबरदस्त केली. उभय संघांतील बॉर्डर गावसकर ट्रॉफी गुरुवारी (९ फेब्रुवारी) नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये सुरू झाली. पहिल्या दिवसाचा खेळ संपला. नाणेफेक जिंकून फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात १७७ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत एका विकेटच्या मोबदल्यात ७७ धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलिया १०० धावांनी पुढे आहे आणि भारताच्या नऊ विकेट्स शिल्लक आहेत. कर्णधार रोहित अर्धशतक झळकावत खेळत आहे. त्याच्यासोबत अश्विनही नाबाद आहे.
पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारतीय संघाने एक गडी गमावून ७७ धावा केल्या आहेत. कर्णधार रोहित ५६ आणि रविचंद्रन अश्विन खाते न उघडता खेळपट्टीवर टिकून आहेत. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात १७७ धावा केल्या होत्या. या संदर्भात कांगारू संघ भारतापेक्षा १०० धावांनी पुढे आहे आणि भारताच्या नऊ विकेट्स शिल्लक आहेत. ऑस्ट्रेलियाकडून टॉड मर्फीने एकमेव विकेट घेतली. त्याने लोकेश राहुलला २० धावांवर बाद केले.
रोहित शर्माने डावाची सुरुवात आक्रमक फटकेबाजीने केली. त्याने पहिल्या षटकात तीन चौकार खेचले. नॅथन लियॉनने पुढे येत षटकार खेचून त्याने कसोटीतील २५०वा षटकार मारला. रोहित व लोकेश यांनी २३ षटकं खेळून काढताना ७६ धावांची भागीदारी केली. पहिल्या दिवसाचा खेळ संपायला ८ चेंडू शिल्लक असताना ऑस्ट्रेलियाने पहिली विकेट मिळवली. पदार्पणवीर टॉड मर्फीने स्वतःच्याच गोलंदाजीवर लोकेश राहुलची ( २०) विकेट घेतली. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने १ बाद ७७ धावा केल्या आणि १०० धावांनी ते अजूनही पिछाडीवर आहेत. रोहित ६९ चेंडूंत ९ चौकार व १ षटकारासह ५६ धावांवर नाबाद आहे.
पहिल्या दिवशी काय झाले?
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली. दोन धावांच्या स्कोअरवर संघाचे दोन्ही सलामीवीर तंबूत परतले. यानंतर स्टीव्ह स्मिथ आणि मार्नस लाबुशेन यांनी ८२ धावांची भागीदारी करून संघाचा ताबा घेतला, पण जडेजाने एका षटकात दोन विकेट्स घेत ऑस्ट्रेलियाला बॅकफूटवर आणले. यानंतर त्याने स्मिथलाही बाद केले. पीटर हँड्सकॉम्ब आणि अॅलेक्स कॅरी यांनीही अर्धशतकी भागीदारी केली, मात्र अश्विनने ही जोडी फोडली. यानंतर त्याने जडेजाच्या साथीने ऑस्ट्रेलियाचा डाव १७७ धावांवर संपुष्टात आणला.
ऑस्ट्रेलियाकडून मार्नस लबुशेनने सर्वाधिक ४९ धावा केल्या. त्यांच्याशिवाय स्टीव्ह स्मिथ (३७), अॅलेक्स कॅरी (३६) आणि पीटर हँड्सकॉम्ब (३१) यांनाच दुहेरी आकडा गाठता आला. भारताकडून जडेजाने पाच विकेट घेतल्या. त्याने कसोटीत ११व्यांदा एका षटकात पाच बळी घेण्याचा पराक्रम केला. त्याचवेळी अश्विनने तीन विकेट घेतल्या. यादरम्यान त्याने कसोटीत ४५० विकेट्सही पूर्ण केल्या. शमी आणि सिराजला प्रत्येकी एक विकेट मिळाली. केवळ अक्षर पटेलला एकही विकेट घेता आली नाही.