पीटीआय, आभा (सौदी अरेबिया)

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

जेक्सन सिंह व अन्वर अली यांच्या पुनरागमनाने भक्कम झालेला भारतीय फुटबॉल संघ गुरुवारी ‘फिफा’ विश्वचषक पात्रता सामन्यात अफगाणिस्तान संघाचा सामना करेल. तेव्हा भारताचे लक्ष्य सामन्यात विजय मिळवण्यासह तिसऱ्या फेरीत आगेकूच करण्याचे असेल.

मध्यरक्षक जेक्सन व अन्वर हे दुखापतीतून सावरत संघात पुनरागमन करीत आहे. दुसऱ्या फेरीच्या या पात्रता सामन्यात निचांकी क्रमवारी असलेल्या अफगाणिस्तानविरुद्ध भारताचे पारडे जड समजले जात आहे. दोन सामन्यांमधून एक विजय मिळवत भारत ‘अ’ गटात सध्या तिसऱ्या स्थानावर आहे. आशियाई विजेता कतार दोन विजयांसह सहा गुणांची कमाई करीत गुणतालिकेत शीर्षस्थानी आहे. दोन्ही सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागणारा अफगाणिस्तानचा संघ तळाशी आहे. कुवेतविरुद्ध विजय मिळवत इगोर स्टिमॅचचा संघ प्रथमच तिसरी फेरी गाठण्याच्या प्रयत्नात आहे.

हेही वाचा >>>IPL 2024: चेन्नई ते लखनौ, कोणत्या संघात काय बदल?

जागतिक क्रमवारीत १५८ व्या स्थानी असणाऱ्या अफगाणिस्तानला नमविल्यानंतर ११७ व्या स्थानी असणाऱ्या भारतीय संघाचे नऊ गुण होतील. कतारने कुवेतला उर्वरित दोन सामन्यांत पराभूत केल्यास भारताला दुसऱ्या स्थानी पोहोचण्याची संधी आहे. भारताने कुवेतला कुवेत सिटीमध्ये १-० अशा फरकाने पराभूत केले होते. तर, भुवनेश्वरमध्ये कुवेतने भारतावर ३-० असा विजय मिळवला होता. भारत व अफगाणिस्तान संघांनी १९४९ मध्ये झालेल्या पहिल्या सामन्यानंतर अनेकदा एकमेकांविरुद्ध सामने खेळले आहेत. विश्वचषक पात्रता, आशियाई चषक पात्रता व अन्य उपखंडीय तसेच, आमंत्रित स्पर्धेत या दोन्ही संघांनी एकमेकांचा सामना केला आहे.

हेही वाचा >>>IPL 2024 Squads: आयपीएलमधील सर्व संघांच्या खेळाडूंची यादी जाहीर, मुंबई इंडियन्सच्या संघात…

भारताच्या आक्रमणाचे नेतृत्व सुनील छेत्री व मनवीर सिंह करतील. छेत्रीने अफगाणिस्तानविरुद्ध आठ सामन्यांत चार गोल झळकावले आहेत. छेत्रीसह संघासाठी जेक्सन व अन्वरही महत्त्वाचे खेळाडू आहेत.  गेल्या दोन वर्षांत जेक्सनने सलग १७ सामने खेळले आहेत. आशिया चषकादरम्यान संघाला त्याची कमतरता जाणवली होती. दुसरीकडे, अफगाणिस्तानचे अनेक प्रमुख खेळाडू अफगाणिस्तान फुटबॉल महासंघावर भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर स्पर्धेबाहेर आहेत. अफगाणिस्तानचे १८ खेळाडू कुवेत व कतारविरुद्ध पात्रता सामने खेळले नव्हते. तरीही अफगाणिस्तानचा संघ अखेपर्यंत झुंज देण्यासाठी ओळखला जातो.

अफगाणिस्तान संघाने आपला खेळाचा स्तर उंचावला आहे. गेल्या दशकाहून अधिक काळ भारत व अफगाणिस्तान संघांनी आपल्या कामगिरीत सुधारणा केली आहे. जेक्सन व अन्वर आल्याने संघाला त्याचा नक्कीच फायदा होईल. आमचा प्रयत्न सामन्यात सर्वोत्तम कामगिरी करण्याचा असेल.-सुनील छेत्री, भारताचा आघाडीपटू

वेळ : रात्री १२.३० वा.

थेट प्रक्षेपण : डीडी स्पोर्ट्स, फॅनकोड अ‍ॅप.