ICC Cricket World Cup, India vs Afghanistan Highlights: एकदिवसीय विश्वचषकात भारतीय संघाचा दुसरा सामना अफगाणिस्तानशी होता. अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत २७२ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने ३५ षटकांत दोन गडी गमावून लक्ष्य गाठले.जसप्रीत बुमराहच्या (४ विकेट्स) घातक गोलंदाजीनंतर, रोहित शर्माच्या (१३१ धावा) तुफानी फलंदाजीच्या बळावर टीम इंडियाने अफगाणिस्तानवर ८ विकेट्सने विजय मिळवला. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करताना ८ विकेट गमावत २७२ धावा केल्या होत्या.
प्रत्युत्तरात टीम इंडियाने अवघ्या ३५ षटकांत दोन गडी गमावून लक्ष्याचा सहज पाठलाग केला. भारताकडून गोलंदाजी करताना बुमराहने ४ बळी घेतले. रोहित शर्माने विक्रमी शतक झळकावले आणि २०२३ च्या विश्वचषकात भारताला दुसरा विजय मिळवून दिला. रोहितशिवाय विराटनेही अर्धशतक झळकावले. किंग कोहली ५५ धावांवर नाबाद परतला.
ICC Men’s ODI World Cup 2023, IND vs AFG Highlightsआयसीसी पुरुषांचा एकदिवसीय विश्वचषक २०२३, भारत विरुद्ध अफगाणिस्तान हायलाइट्स:
जसप्रीत बुमराहच्या (४ विकेट्स) घातक गोलंदाजीनंतर, रोहित शर्माच्या (१३१ धावा) तुफानी फलंदाजीच्या बळावर टीम इंडियाने अफगाणिस्तानवर ८ विकेट्सने विजय मिळवला. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करताना ८ विकेट गमावत २७२ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात टीम इंडियाने अवघ्या ३५ षटकांत दोन गडी गमावून लक्ष्याचा सहज पाठलाग केला. भारताकडून गोलंदाजी करताना बुमराहने ४ बळी घेतले. रोहित शर्माने विक्रमी शतक झळकावले आणि २०२३ च्या विश्वचषकात भारताला दुसरा विजय मिळवून दिला. रोहितशिवाय विराटनेही अर्धशतक झळकावले. किंग कोहली ५५ धावांवर नाबाद परतला.
या सामन्यात टीम इंडियाचा विजय निश्चित दिसत आहे. भारत आता अफगाणिस्तानविरुद्धच्या विजयापासून केवळ ३७ धावा दूर आहे. ३० षटकांनंतर, भारताची धावसंख्या दोन विकेट गमावून २३७/२ आहे. विराट ३९ चेंडूत ३७ धावांवर तर श्रेयस अय्यर ११ चेंडूत ७ धावांवर खेळत आहे.
भारत विरुद्ध अफगाणिस्तान सामन्यादरम्यान शतकवीर रोहित शर्मा वैयक्तिक १३० धावांवर बाद झाला. राशिद खानच्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करत असताना, तो क्लीन बोल्ड झाला. याआधीही त्याने संघासाठी आपले काम केले आहे. या सामन्यात भारताचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे. रोहितने आज आपल्या खेळीत १५ चौकार आणि पाच षटकार मारले.
नवीन उल हकने घेतली विराट कोहलीची गळाभेट
https://twitter.com/mufaddal_vohra/status/1712120399193063570?t=cl4nR4rFlXApo5c6HOZ_fQ&s=19
टीम इंडियाची धावसंख्या अवघ्या २५ षटकांत २०० च्या पुढे गेली आहे. रोहित शर्मा १३० आणि विराट कोहली १६ धावांवर खेळत आहे. दोघांमध्ये ४५ धावांची भागीदारी आहे. आता भारताला विजयासाठी फक्त ७१ धावा करायच्या आहेत.
२३ षटकांनंतर भारताने एक विकेट गमावून १९४ धावा केल्या आहेत. सध्या विराट कोहली नऊ आणि रोहित शर्मा १२९ धावांसह फलंदाजी करत आहे. दोघांमध्ये ३० हून अधिक धावांची भागीदारी झाली आहे. २३व्या षटकात राशीदच्या षटकात रोहितने दोन चौकार आणि एक षटकार ठोकला. भारताला आता ७९ धावांची गरज आहे.
भारतीय कर्णधार रोहित शर्माने ६३ चेंडूत शतक झळकावले. तो एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारतासाठी सर्वात जलद शतक करणारा खेळाडू ठरला. या बाबतीत रोहितने महान कर्णधार कपिल देव यांचा विक्रम मोडला. कपिल देव यांनी १९८३ च्या विश्वचषकात झिम्बाब्वेविरुद्ध अवघ्या ७२ चेंडूत शतक झळकावले होते. रोहितच्या वनडे कारकिर्दीतील हे ३१ वे शतक होते.
१४ षटकांनंतर टीम इंडियाची धावसंख्या एकही विकेट न गमावता १२५ धावा झाली आहे. रोहित शर्मा ५२ चेंडूत ८८ धावांवर खेळत आहे. तर इशान किशन ३० धावांवर आहे आहे. दोघेही सहज धावा काढत आहेत.
रोहित शर्मा अप्रतिम फॉर्ममध्ये दिसत आहे. त्याने ३० चेंडूत अर्धशतक झळकावले. त्याचे एकदिवसीय कारकिर्दीतील हे ५३ वे अर्धशतक होते. नऊ षटकांनंतर भारताची धावसंख्या एकही विकेट न गमावता ८७ धावा आहे. सध्या रोहित ३८ चेंडूत ७१ धावा तर इशान १६ चेंडूत १० धावा करत फलंदाजी करत आहे. भारताला आता १८६ धावांची गरज आहे.
रोहित शर्मा दिल्लीत खळबळ माजवत आहे. तो केवळ ३३ चेंडूत ६० धावांवर फलंदाजी करत आहे. इशान किशन १० धावा करुन त्याला साथ देत आहे. ८ षटकांनंतर भारताची धावसंख्या एकही विकेट न पडता ७५ धावा आहे.
https://twitter.com/Shebas_10dulkar/status/1712099941672448420
सात षटकांनंतर टीम इंडियाची धावसंख्या बिनबाद ६४ धावा झाली आहे. रोहित शर्मा तुफानी फलंदाजी करत आहे. तो अवघ्या २६ चेंडूत ४९ धावांवर आहे. रोहितने ६ चौकार आणि २ षटकार मारले आहेत. तर इशान किशन १० व्या स्थानावर आहे. रोहित शर्माच्या फलंदाजीचे विराट कोहलीने कौतुक केले आहे.
https://twitter.com/mufaddal_vohra/status/1712098249254007085?s=20
एकदिवसीय विश्वचषकामध्ये सर्वात जलद १,००० धावा करणारे फलंदाज
फलंदाज - इनिंग्स
रोहित शर्मा - १९*
डेविड वॉर्नर - १९
एबी डिव्हिलियर्स - २०
पहिल्या सामन्यात शून्यावर बाद झाल्यानंतर, कर्णधार रोहित शर्मा आज पुन्हा एकद आपल्या जुन्या रंगात दिसत आहे. अफगाणिस्तानविरुद्ध तो मुक्तपणे फटकेबाजी कताना दिसत आहे. भारतीय संघाने पहिल्या सहा षटकानंतर भारताने बिनबाद ४७ धावा केल्या आहेत, त्यापैकी ३२ रोहितच्या आणि १० इशानच्या बॅटमधून आल्या आहेत.
भारतीय संघाच्या डावाला सुरुवात झाली आहे. एका षटकानंतर टीम इंडियाने एकही विकेट न गमावता दोन धावा केल्या आहेत. सध्या इशान किशन आणि रोहित शर्मा क्रीजवर आहेत. अफगाणिस्तानसाठी फजलहक फारुकीने पहिले षटक टाकले.
अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करताना आठ गडी गमावून २७२ धावा केल्या. भारताविरुद्ध अफगाणिस्तानची ही सर्वात मोठी धावसंख्या आहे. कर्णधार हशमतुल्ला शाहिदीने सर्वाधिक ८० धावांचे योगदान दिले. तसेच अजमतुल्ला उमरझाईने ६२ धावा केल्या. या दोघांशिवाय अफगाणिस्तानच्या इतर अनेक फलंदाजांनी चांगली सुरुवात केली, पण कोणीही मोठी खेळी करू शकले नाही. २२ धावा करणारा इब्राहिम झद्रान संघाचा तिसरा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. भारताकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या.
नवीन उल हक फलंदाजीला आला आहे. तो मैदानात येताच चाहत्यांनी कोहली-कोहलीच्या घोषणा द्यायला सुरुवात केली.
२३५ धावांच्या स्कोअरवर अफगाणिस्तानची सातवी विकेट पडली. मोहम्मद नबी २७ चेंडूत १९ धावा करून बाद झाला. जसप्रीत बुमराहने त्याला विकेट्ससमोर पायचीत केले. आता राशीद खानसोबत मुजीब उर रहमान क्रीझवर आहे. ४७ षटकांनंतर अफगाणिस्तानची धावसंख्या सात गड्यांच्या मोबदल्यात २४७ धावा आहे.
२२९ धावांवर अफगाणिस्तानची सहावी विकेट पडली. नजीबुल्ला झद्रान आठ चेंडूत दोन धावा करून बाद झाला. जसप्रीत बुमराहने त्याला विराट कोहलीच्या हाती झेलबाद केले. आता मोहम्मद नबीसोबत राशीद खान क्रीजवर आहे.
अफगाणिस्तानचा निम्मा संघ २२५ धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. कुलदीप यादवने हशमतुल्ला शाहिदीला विकेट्ससमोर पायचीत करत अफगाणिस्तानला पाचवा धक्का दिला. शाहिदीने ८८ चेंडूत ८० धावा केल्या. त्याच्या खेळीत आठ चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता.
अफगाणिस्तानच्या धावसंख्येने चार गड्यांच्या मोबदल्यात २०० धावांचा टप्पा ओलांडला आहे. मोहम्मद नबी हशमतुल्ला शाहिदीसोबत क्रीजवर आहे. अखेरच्या षटकांत जलद धावा करून अफगाणिस्तानची धावसंख्या ३०० धावांच्या जवळ नेण्याची दोघांची इच्छा आहे. ३८ षटकांनंतर अफगाणिस्तानची धावसंख्या २०३/४ आहे.
अफगाणिस्तानची चौथी विकेट १८४ धावांच्या स्कोअरवर पडली. अजमतुल्ला उमरझाई ६९ चेंडूत ६२ धावा करून बाद झाला. हार्दिक पांड्याने त्याला स्लोवर चेंडूवर क्लीन बोल्ड केले. त्याने आपल्या खेळीत दोन चौकार आणि चार षटकार मारले. आता मोहम्मद नबी हशमतुल्ला शाहिदीसोबत क्रीजवर आहे. ३५ षटकांनंतर अफगाणिस्तानची धावसंख्या १८९/४ आहे.
अजमतुल्ला उमरझाईने ६२ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याचे वनडे कारकिर्दीतील हे दुसरे अर्धशतक आहे. या खेळीत त्याने तीन षटकार आणि एक चौकार लगावला आहे. अफगाणिस्तानच्या धावसंख्येने तीन विकेट गमावून १५० धावांचा टप्पा पार केला. अजमतुल्ला उमरझाई आणि हशमतुल्ला शाहिदी यांच्यात १०० धावांची भागीदारी झाली आहे.
https://twitter.com/ACBofficials/status/1712046066307047654
२९ षटकांनंतर अफगाणिस्तानने तीन गड्यांच्या मोबदल्यात १३७ धावा केल्या आहेत. सध्या अजमतुल्ला उमरझाई ४१ धावा करून क्रीजवर आहे आणि हशमतुल्ला शाहिदी ३० धावा करून क्रीजवर आहे. दोघांमध्ये ७० हून अधिक धावांची भागीदारी झाली आहे. भारतीय गोलंदाजांना विकेट घेण्याची गरज आहे.
अजमतुल्ला उमरझाईने कुलदीप यादवच्या २५व्या षटकात दोन षटकार ठोकले. अफगाणिस्तानच्या खेळाडूंनी या षटकात एकूण १४ धावा केल्या. २५ षटकांनंतर अफगाणिस्तानची धावसंख्या तीन गड्यांच्या मोबदल्यात ११४ धावा आहे. सध्या उमरझाई २५ धावांवर तर कर्णधार हशमतुल्ला शाहिदी २५ धावांवर फलंदाजी करत आहे.
२० षटकांनंतर अफगाणिस्तानने तीन विकेट गमावून ८३ धावा केल्या आहेत. सध्या कर्णधार हशमतुल्ला शाहिदी १४ आणि अजमतुल्ला उमरझाई ६ धावांसह फलंदाजी करत आहे.
आता अफगाणिस्तानला ६३ धावांवर तिसरा धक्का बसला आहे. रहमानउल्ला गुरबाजचा उत्कृष्ट झेल घेणाऱ्या शार्दुल ठाकूरने रहमत शाहला एलबीडब्ल्यू आऊट केले. रहमतने २२ चेंडूत १६ धावांची खेळी खेळली. सध्या कर्णधार हशमतुल्ला शाहिदी आणि अजमतुल्ला उमरझाई क्रीजवर आहेत. १४ षटकांनंतर अफगाणिस्तानची धावसंख्या तीन गड्यांच्या मोबदल्यात ६६ धावा आहे.
अफगाणिस्तानला ६३ धावांवर दुसरा धक्का बसला. १३व्या षटकातील चौथ्या चेंडूवर हार्दिक पांड्याने रहमानउल्ला गुरबाजला शार्दुल ठाकूरकरवी झेलबाद केले. शार्दुलने उत्तम कौशल्य दाखवत सीमारेषेवर उत्कृष्ट झेल घेतला. गुरबाजने २८ चेंडूत २१ धावांची खेळी खेळली. १३ षटकांनंतर अफगाणिस्तानची धावसंख्या दोन गड्यांच्या मोबदल्यात ६३ धावा आहे. सध्या कर्णधार हशमतुल्ला शाहिदी आणि रहमत शाह क्रीजवर आहेत.
https://twitter.com/cricspaceoffl/status/1712040396912763074
१० षटकांनंतर अफगाणिस्तानची धावसंख्या एका विकेटवर ४८ धावा आहे. रहमानउल्ला गुरबाज २४ चेंडूत २० धावांवर खेळत आहे. त्याने तीन चौकार आणि एक षटकार मारला आहे. रहमत शाह पाच धावांवर खेळत आहे. तर इब्राहिम झद्रान २२ धावा करून बाद झाला.
अफगाणिस्तानची पहिली विकेट ३२ धावांवर पडली. जसप्रीत बुमराहने इब्राहिम झद्रानला यष्टिरक्षक लोकेश राहुलकडे झेलबाद केले. झाद्रानने २८ चेंडूंत ४ चौकारांच्या मदतीने २२ धावा केल्या.
भारताने चौथ्या षटकातच पहिला रिव्ह्यू गमावला असून उर्वरित डावासाठी टीम इंडियाकडे फक्त एक रिव्ह्यू शिल्लक आहे. सिराजच्या चेंडूवर इब्राहिम झद्रानविरुद्ध एलबीडब्ल्यूचे जोरदार अपील करण्यात आली. यानंतर अंपायरने नाबाद ठरवले आणि रोहितने रिव्ह्यू घेतला. चेंडू स्टंपच्या बाहेर जात असल्याचे रिप्लेमध्ये दिसून आले आणि भारताला रिव्ह्यू गमावावा लागला. पाच षटकांनंतर अफगाणिस्तानची धावसंख्या १९/० आहे.दोन्ही संघाची प्लेइंग इलेव्हन
ICC Men’s ODI World Cup 2023, IND vs AFG Highlights आयसीसी पुरुषांचा एकदिवसीय विश्वचषक २०२३, भारत विरुद्ध अफगाणिस्तान हायलाइट्स:
India vs Afghanistan Highlights, World Cup 2023: जसप्रीत बुमराहच्या (४ विकेट्स) घातक गोलंदाजीनंतर, रोहित शर्माच्या (१३१ धावा) तुफानी फलंदाजीच्या बळावर टीम इंडियाने अफगाणिस्तानवर ८ विकेट्सने विजय मिळवला.