ICC Cricket World Cup, India vs Afghanistan Highlights: एकदिवसीय विश्वचषकात भारतीय संघाचा दुसरा सामना अफगाणिस्तानशी होता. अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत २७२ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने ३५ षटकांत दोन गडी गमावून लक्ष्य गाठले.जसप्रीत बुमराहच्या (४ विकेट्स) घातक गोलंदाजीनंतर, रोहित शर्माच्या (१३१ धावा) तुफानी फलंदाजीच्या बळावर टीम इंडियाने अफगाणिस्तानवर ८ विकेट्सने विजय मिळवला. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करताना ८ विकेट गमावत २७२ धावा केल्या होत्या.

प्रत्युत्तरात टीम इंडियाने अवघ्या ३५ षटकांत दोन गडी गमावून लक्ष्याचा सहज पाठलाग केला. भारताकडून गोलंदाजी करताना बुमराहने ४ बळी घेतले. रोहित शर्माने विक्रमी शतक झळकावले आणि २०२३ च्या विश्वचषकात भारताला दुसरा विजय मिळवून दिला. रोहितशिवाय विराटनेही अर्धशतक झळकावले. किंग कोहली ५५ धावांवर नाबाद परतला.

Live Updates

ICC Men’s ODI World Cup 2023, IND vs AFG Highlightsआयसीसी पुरुषांचा एकदिवसीय विश्वचषक २०२३, भारत विरुद्ध अफगाणिस्तान हायलाइट्स:

14:19 (IST) 11 Oct 2023
IND vs AFG: अफगाणिस्तानची फलंदाजी सुरु

भारताविरुद्ध अफगाणिस्तानची फलंदाजी सुरू झाली आहे. रहमानउल्ला गुरबाज आणि इब्राहिम झद्रान यांनी डावाची सलामी दिली. दोघेही सावधपणे खेळत आहेत. जसप्रीत बुमराहने भारतासाठी पहिले षटक टाकले. तीन षटकांनंतर अफगाणिस्तानची धावसंख्या बिनबाद नऊ धावा आहे.

https://twitter.com/BCCI/status/1712027040831132080

13:47 (IST) 11 Oct 2023
IND vs AFG: आजच्या सामन्यासाठी दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

भारत: रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

https://twitter.com/StarSportsIndia/status/1712020662620168597

अफगाणिस्तान : रहमानउल्ला गुरबाज (यष्टीरक्षक), इब्राहिम झद्रान, रहमत शाह, हशमतुल्ला शाहिदी (कर्णधार), नजीबुल्ला झदरन, मोहम्मद नबी, अजमतुल्ला उमरझाई, रशीद खान, मुजीब उर रहमान, नवीन-उल-हक, फजलहक फारुकी.

13:44 (IST) 11 Oct 2023
IND vs AFG: नाणेफेकीपूर्वी कापला हार्दिक पांड्याचा केक

नाणेफेकीपूर्वी हार्दिक पांड्याच्या वाढदिवसाचा केक कापण्यात आला.

https://twitter.com/JeyVamos/status/1712018296671989803

13:39 (IST) 11 Oct 2023
IND vs AFG: अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून घेतला फलंदाजीचा निर्णय

अफगाणिस्तानचा कर्णधार हशमतुल्ला शाहिदीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दिल्लीची खेळपट्टी फलंदाजांसाठी योग्य असून या सामन्यात मोठी धावसंख्या पाहायला मिळेल. मात्र, भारतीय कर्णधार रोहित शर्माने सांगितले की, मला प्रथम गोलंदाजी करायची होती. भारतीय संघात अश्विनच्या जागी शार्दुल ठाकूरला संधी देण्यात आली आहे.

https://twitter.com/BCCI/status/1712017224804999360

13:30 (IST) 11 Oct 2023
IND vs AFG: थोड्याच वेळात होणार नाणेफेक

भारत आणि अफगाणिस्तान सामन्याची नाणेफेक दीडला होणार आहे. तसेच प्रत्यक्ष सामन्याला दोन वाजता सुरुवात होणार आहे.

https://twitter.com/BCCI/status/1712000557358145740

13:22 (IST) 11 Oct 2023
IND vs AFG: टीम इंडिया हार्दिकला वाढदिवसाचे गिफ्ट देण्याचा करणार प्रयत्न

भारतीय संघाचा उपकर्णधार हार्दिक पांड्याचा आज वाढदिवस आहे. अशा परिस्थितीत हा सामना जिंकून टीम इंडिया आपल्या उपकर्णधाराला एक खास भेट देऊ इच्छित आहे. टीम इंडियासाठी हा सामना जिंकणे फारसे अवघड नसेल, पण विश्वचषकासारख्या स्पर्धेत कोणत्याही संघाला हलक्यात घेणे महागात पडू शकते.

https://twitter.com/BCCI/status/1711946908800012307

13:09 (IST) 11 Oct 2023
IND vs AFG: भारत आणि अफगाणिस्तानचा संघ

दोन्ही संघ –

अफगाणिस्तान : हशमतुल्ला शाहिदी (कर्णधार), रहमानउल्लाह गुरबाज, इब्राहिम झद्रान, रियाझ हसन, रहमत शाह, नजीबुल्ला झदरन, मोहम्मद नबी, इक्रम अलीखिल, अजमतुल्ला उमरझाई, रशीद खान, मुजीब उर रहमान, नूर अहमद, फजलहक फारुकी, अब्दुल उल रहमान, नवीन बरोबर.

भारत: रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, इशान किशन, सूर्यकुमार यादव.

13:02 (IST) 11 Oct 2023
IND vs AFG: भारताने जिंकला आहे पहिला सामना

एकदिवसीय विश्वचषक २०२३ मध्ये, भारताने पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा सहा गडी राखून पराभव केला. २०० धावांचा पाठलाग करताना भारताने दोन धावांत तीन विकेट गमावल्या होत्या. यानंतर विराट कोहली आणि लोकेश राहुलने मिळून भारतीय डावाची धुरा सांभाळत त्यांना विजयाच्या उंबरठ्यावर नेले. शेवटी राहुलने हार्दिकसह भारताला विजयापर्यंत नेले. आता भारताचा सलग दुसरा सामना जिंकण्याचा प्रयत्न असेल.

https://twitter.com/BCCI/status/1712000557358145740

ICC Men’s ODI World Cup 2023, IND vs AFG Highlights आयसीसी पुरुषांचा एकदिवसीय विश्वचषक २०२३, भारत विरुद्ध अफगाणिस्तान हायलाइट्स:

India vs Afghanistan Highlights, World Cup 2023: जसप्रीत बुमराहच्या (४ विकेट्स) घातक गोलंदाजीनंतर, रोहित शर्माच्या (१३१ धावा) तुफानी फलंदाजीच्या बळावर टीम इंडियाने अफगाणिस्तानवर ८ विकेट्सने विजय मिळवला.