अफगाणिस्तानविरुद्ध एकमेव कसोटी सामना सुरु होण्याआधी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. भारताचा जलदगती गोलंदाज मोहम्मद शमी यो-यो फिटनेस टेस्ट नापास झाल्याने, त्याला संघातून वगळण्यात आलेलं आहे. बंगळुरुच्या नॅशनल क्रिकेट अकादमीत ही फिटनेस टेस्ट घेण्यात आली होती. १४ जूनपासून भारत विरुद्ध अफगाणिस्तान कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. मोहम्मद शमी ऐवजी बीसीसीआयने नवदीप सैनी याचा संघात समावेश केला आहे. यंदाच्या रणजी हंगामात नवदीप सैनीने ३४ बळी घेतले आहेत. त्यामुळे शमीच्या अनुपस्थितीत भारतीय संघात कोणाला जागा मिळते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अफगाणिस्तानविरुद्ध कसोटीसाठी असा असेल भारताचा संघ –

अजिंक्य रहाणे (कर्णधार), चेतेश्वर पुजारा, शिखर धवन, मुरली विजय, लोकेश राहुल, करुण नायर, रविचंद्रन आश्विन, रविंद्र जाडेजा, कुलदीप यादव, उमेश यादव, हार्दिक पांड्या, इशांत शर्मा, शार्दुल ठाकूर, दिनेश कार्तिक, नवदीप सैनी

अवश्य वाचा – यो-यो फिटनेस टेस्ट नापास झाल्यामुळे संजू सॅमसन भारत अ संघातून बाहेर, सुत्रांची माहिती