२२ धावांवर चार गडी बाद अशी घसरगुंडी उडालेल्या भारतीय डावाला आकार देत कर्णधार रोहित शर्माने अफगाणिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात नाबाद १२१ धावांची दिमाखदार खेळी साकारली. ट्वेन्टी-२० प्रकारातलं रोहितचं हे पाचवं शतक आहे. रोहित शर्माच्या या तडाखेबंद शतकी खेळीच्या बळावर भारताने २१२ धावांची मजल मारली. बंगळुरूचं छोटेखानी मैदान आणि अफगाणिस्तानची अनुनभवी गोलंदाजी यांचा पुरेपूर फायदा उचलत रोहितने ११ चौकार आणि आठ षटकारांसह ही खेळी सजवली.

मालिकेत विजयी आघाडी घेतलेल्या भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. भारताने संजू सॅमसन, कुलदीप यादव आणि अवेश खान यांना अंतिम अकरा जणांच्या संघात संधी दिली. तिसऱ्या षटकात फरीद अहमदने उत्तम फॉर्मात असलेल्या यशस्वी जैस्वालला ४ धावांवर बाद केलं. आयपीएल स्पर्धेतील आरसीबी स्पर्धेचं मैदान असल्यामुळे विराट कोहलीकडून या सामन्यात प्रचंड अपेक्षा होत्या. पण कोहली पहिल्याच चेंडूवर भोपळाही न फोडता बाद झाला. कोहली बाद झाला आणि मैदानात स्मशानशांतता पसरली.

Rohit Sharma Century in IND vs ENG 2nd ODI Match in just 76 Balls
Rohit Sharma Century: रोहित शर्माचे झंझावाती शतक! चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी भारतासाठी आनंदाची बातमी, वादळी फलंदाजी करत ट्रोलर्सची केली बोलती बंद
Best Vegetables for Vegetarians and Non-vegetarians
Vegetables for Nonvegetarians ‘ही’ भाजी मांसाहार करणाऱ्यांकरता आवश्यक…;…
IND vs ENG Rohit Sharma surpasses Rahul Dravid in runs and Chris Gayle in most sixes ODI at Cuttack
IND vs ENG : रोहित शर्माने एकाच झटक्यात मोडला द्रविड-गेलचा विक्रम, हिटमॅनच्या नावावर झाली मोठ्या पराक्रमाची नोंद
IND vs ENG Jos Buttler has been dismissed in 4 out of 9 innings against Hardik Pandya
IND vs ENG : भारताच्या ‘या’ गोलंदाजाला कळली जोस बटलरची कमजोरी! ९ पैकी ४ डावांमध्ये दाखवला तंबूचा रस्ता
Virat Kohli fit for 2nd England ODI
भारतासमोर संघनिवडीचा पेच; इंग्लंडविरुद्ध दुसरा एकदिवसीय सामना आज; कोहलीचे पुनरागमन अपेक्षित
Ravindra Jadeja Completes 600 Wickets in International Cricket with 3 Wicket Haul
IND vs ENG: रवींद्र जडेजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये घडवला इतिहास, इंग्लंडविरूद्ध ३ विकेट घेत केली मोठी कामगिरी
Hardik Pandya Shivam Dube Partnership Record with Fifty for 6th Wicket IND vs ENG 4th T20I
IND vs ENG: हार्दिकचा नो-लूक षटकार तर शिवम दुबेचं दणक्यात पुनरागमन; दुबे-पंड्याने अर्धशतकांसह भारतासाठी रचली विक्रमी भागीदारी
IND vs ENG Saqib Mahmood Triple Maiden Wicket Over
IND vs ENG: कानामागून आला, भारी पडला! व्हिसा दिरंगाई बाजूला सारत मेहमूदने भारताची उडवली दाणादाण, ३ चेंडूत ३ विकेट

पुढच्याच षटकात शिवम दुबेही तंबूत परतला. त्याला केवळ एका धाव करता आली. संजू सॅमसनला फरीदनेच पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. त्यालाही खातं उघडता आलं नाही. चार बाद २२ अशी अवस्था झालेल्या स्थितीतून संघाला बाहेर काढण्यासाठी कर्णधार रोहित शर्माला रिंकू सिंगची साथ मिळाली. रोहितच्या आक्रमक पवित्र्यामुळे रिंकूने बचावात्मक पवित्रा खेळ करत त्याला साथ दिली. या जोडीने सुरुवातीला एकेरी-दुहेरी धावांवर भर देत डावाची पडझड थांबवली. खेळपट्टीवर स्थिरावल्यानंतर रोहितने भात्यातल्या फटक्यांची पोतडी उघडत अफगाणिस्तानच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. अझमतुल्ला ओमरझाइच्या चौथ्या षटकातल्या चौथ्या चेंडूवर चौकार खेचत रोहितने या प्रकारातल्या पाचव्या शतकाला गवसणी घातली.

रोहित-रिंकूची नाबाद भागीदारी

रोहित-रिंकू जोडीने पाचव्या विकेटसाठी ९५ चेंडूत १९० धावांची मॅरेथॉन भागीदारी साकारली. रिंकूने कर्णधाराला तोलामोलाची साथ देत ३९ चेंडूत नाबाद ६९ धावांची खेळी साकारली. त्याने २ चौकार आणि ६ षटकार लगावले. करिम जनतने टाकलेल्या २० व्या षटकात रोहित-रिंकूने तब्बल ३६ धावा चोपून काढल्या. या जोडीने ट्वेन्टी-२० प्रकारात एका षटकात सर्वाधिक धावांच्या युवराज सिंहच्या विक्रमाची बरोबरी केली. २००७ च्या टी-२० विश्वचषकात युवराज सिंहने स्टुअर्ट ब्रॉडच्या गोलंदाजीवर ६ षटकारांसह ३६ धावा वसूल केल्या होत्या. तर अखिल धनंजयच्या गोलंदाजीवर कायरन पोलार्डने ३६ धावा कुटल्या होत्या. रोहित-रिंकूने जोडीने करीम जनतच्या गोलंदाजीवर जोरदार टोलेबाजी केली. या सगळ्या धुमश्चक्रीत फरीद अहमदने चार षटकात २० धावांच्या मोबदल्यात ३ विकेट्स पटकावल्या.

Story img Loader