मोहाली : ऑस्ट्रेलियाविरुद्ध आज, शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेत भारताचे ऑफ-स्पिनर रविचंद्रन अश्विन आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्या कामगिरीवर सर्वाचे लक्ष असेल. अक्षर पटेलच्या दुखापतीमुळे या दोघांपैकी एकाला आगामी विश्वचषकासाठी भारतीय संघात स्थान मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्ध दमदार कामगिरी करत विश्वचषकाच्या संघासाठी आपली दावेदारी भक्कम करण्याचा अश्विन आणि सुंदरचा प्रयत्न असेल.

* एकदिवसीय विश्वचषकाला

IND vs AUS 3rd Test Match Timing Date Venue What Time Does the Gabba Test Start
IND vs AUS: भारत-ऑस्ट्रेलिया गाबा कसोटी पहाटे किती वाजता सुरू होणार? जाणून घ्या योग्य वेळ
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Syed Mushtaq Ali Trophy
SMAT 2024: मुंबई सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत! रहाणे-शॉच्या फलंदाजीसमोर विदर्भचा संघ पडला फिका
INDW vs AUSW Arundhati Reddy Dismissed Top 4 Batters of Australia Top Order Becomes
INDW vs AUSW: अरूंधती रेड्डीचा ऐतिहासिक पराक्रम, ‘ही’ कामगिरी करणारी पहिली भारतीय गोलंदाज
Shaheen Shah Afridi becomes youngest bowler to complete 100 wickets in all 3 formats
Shaheen Afridi: शाहीन शाह आफ्रिदीचा मोठा पराक्रम, क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये ‘ही’ कामगिरी करणारा सर्वात तरूण गोलंदाज
Rohit Sharma on Mohammed Shami Fitness and Comeback in Team for last 3 Test Against Australia
IND vs AUS: मोहम्मद शमीच्या पुनरागमनाबद्दल रोहित शर्माचं मोठं वक्तव्य, दुसऱ्या कसोटी पराभवानंतर नेमकं काय म्हणाला?
Australia Beat India by 10 Wickets in Pink Ball Test Pat Cummins 5 Wickets Nitish Reddy 42 Runs Inning
IND vs AUS: पिंक बॉल कसोटीत ऑस्ट्रेलियाची बाजी; भारतावर १० विकेट्सनी दणदणीत विजय
IND vs AUS 2nd Test Day 2 Highlights Only Twice Any Team Win Day Night Test After Conceding First Innings Lead
IND vs AUS: ॲडलेड कसोटीत भारताची स्थिती बिकट, दुसऱ्या दिवशी निम्मा संघ तंबूत; ‘हा’ रेकॉर्ड पाहता पराभव टाळणं कठीण

५ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार असून त्यापूर्वी भारताची ही अखेरची मालिका आहे. त्यामुळे या मालिकेकडे विश्वचषकाची रंगीत तालीम म्हणून पाहिले जात आहे. भारताचे प्रमुख फलंदाज रोहित शर्मा, विराट कोहली यांच्यासह अष्टपैलू हार्दिक पंडय़ा आणि चायनामन फिरकीपटू कुलदीप यादव यांना पहिल्या दोन सामन्यांसाठी विश्रांती देण्यात आली आहे. नियमित कर्णधार रोहित आणि उपकर्णधार हार्दिकच्या अनुपस्थितीत केएल राहुल भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे.

हेही वाचा >>> IND vs AUS: एकदिवसीय मालिकेपूर्वी पॅट कमिन्सचे टीम इंडियाला आव्हान; म्हणाला, “विश्वचषकापूर्वी घरच्या मैदानावर…”

* मुंबईकर फलंदाजांची कसोटी

या मालिकेत श्रेयस अय्यर आणि सूर्यकुमार यादव या मुंबईकर फलंदाजांची कसोटी लागणार आहे. श्रेयसला आपली तंदुरुस्ती, तर सूर्यकुमारला एकदिवसीय क्रिकेटमधील आपली उपयुक्तता सिद्ध करावी लागणार आहे. पाठीची दुखापत, त्यानंतर शस्त्रक्रिया आणि पुन्हा पाठदुखी यामुळे २८ वर्षीय श्रेयसने गेल्या सहा महिन्यांत फारसे क्रिकेट खेळलेले नाही.  पुढील पाच दिवसांत तीन एकदिवसीय सामन्यांत श्रेयसला त्याचे शरीर साथ देते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

* वेळ : दु. १.३० वाजता

* थेट प्रक्षेपण : स्पोर्ट्स १८-१, जिओ सिनेमा

हेही वाचा >>> World Cup 2023: दक्षिण आफ्रिकेला दुहेरी धक्का, ऑनरिक नॉर्खिया नंतर आणखी खेळाडू दुखापतीमुळे वर्ल्ड कप २०२३मधून बाहेर

अश्विन विरुद्ध वॉर्नर आणि स्मिथ

अश्विनला संधी मिळाल्यास तो जानेवारी २०२२ नंतर आपला पहिला एकदिवसीय सामना खेळेल. त्याने आतापर्यंत ११३ एकदिवसीय सामन्यांत १५१ गडी बाद केले आहेत. एकदिवसीय विश्वचषकासाठी भारताच्या १५ सदस्यीय संघाची घोषणा झाल्यानंतर यात एकही ऑफ-स्पिनर नसल्याची टीका झाली होती. त्यानंतर आशिया चषकात अक्षर पटेलच्या मांडीला दुखापत झाल्याने विश्वचषकासाठी त्याच्या उपलब्धतेबाबत साशंकता निर्माण झाली आहे. विश्वचषकासाठी निवडलेल्या संघात बदल करण्यासाठी २८ सप्टेंबपर्यंतचा वेळ देण्यात आला आहे. त्यापूर्वीच भारतीय संघाचे ऑस्ट्रेलियाविरुद्धचे तीनही सामने होणार आहेत. त्यामुळे अश्विन आणि सुंदर यांचा या मालिकेत आपली सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न असेल. विशेषत: ३७ वर्षीय अश्विन विरुद्ध डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्ह स्मिथ या अनुभवी खेळाडूंमधील द्वंद्व पाहण्यासारखे असेल. कसोटी क्रिकेटमध्ये अश्विनने वॉर्नरला अनेकदा अडचणीत टाकले आहे. आता एकदिवसीय क्रिकेटमध्येही अशीच कामगिरी करण्याचा त्याचा मानस असेल.

संघ

* भारत : केएल राहुल (कर्णधार/यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, इशान किशन (यष्टीरक्षक), शार्दूल ठाकूर, वॉशिंग्टन सुंदर, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमरा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णा. * ऑस्ट्रेलिया : पॅट कमिन्स (कर्णधार), अ‍ॅलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), डेव्हिड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ, मार्नस लबूशेन, मिचेल मार्श, कॅमरुन ग्रीन, मार्कस स्टॉइनिस, मॅट शॉर्ट, नेथन एलिस, अ‍ॅडम झ्ॉम्पा, जोश हेझलवूड, स्पेन्सर जॉन्सन, तन्वीर संघा.

Story img Loader