India vs Australia 2nd T20 Live Score, 26 November 2023: प्रथम फलंदाजी करताना मोठी धावसंख्या उभारायची आणि नंतर त्या धावसंख्येचा यशस्वी बचाव हे सूत्र अवलंबत भारतीय संघाने तिरुवनंतपुरम इथे झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेन्टी२० सामन्यात ४४ धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारतीय संघाने पाच सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे. 

Live Updates

India vs Australia 2nd T20 Live Score: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात दुसऱा ट्वेन्टी२० सामना तिरुवनंतपुरम इथे होत आहे. या सामन्याचे सर्व लाईव्ह अपडेट्स...

22:53 (IST) 26 Nov 2023
दुसऱ्या ट्वेन्टी२० सामन्यातही भारताची ऑस्ट्रेलियावर बाजी

शिस्तबद्ध गोलंदाजीच्या बळावर भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेन्टी२० लढतीत ४४ धावांनी विजय मिळवला. भारताने प्रथम फलंदाजी करताना २३५ धावांचा डोंगर उभारला. ऑस्ट्रेलियाला १९१ धावाच करता आल्या. रवी बिश्नोई आणि प्रसिध कृष्णा यांनी प्रत्येकी ३ विकेट्स पटकावल्या.

22:15 (IST) 26 Nov 2023
स्टॉइनस तंबूत; भारत विजयाच्या दिशेने

जोरदार फटकेबाजी प्रसिद्ध मार्कस स्टॉइनसला बाद करत मुकेश कुमारने भारताच्या विजयाचा मार्ग सुकर केला. स्टॉइनसने २५ चेंडूत ४५ धावांची खेळी केली.

21:49 (IST) 26 Nov 2023
ऑस्ट्रेलियाची १०व्या षटकात शंभरी पार

ऑस्ट्रेलियाने चार विकेट्स गमावल्या असल्या तरी दहाव्या षटकात त्यांनी शंभरी पार केली आहे.

21:48 (IST) 26 Nov 2023
मुकेश कुमारच्या षटकात २२ धावांची लूट

टीम डेव्हिड आणि मार्कस स्टॉइनस जोडीने मुकेश कुमारच्या दुसऱ्या षटकात २२ धावा कुटून काढल्या.

21:40 (IST) 26 Nov 2023
स्टीव्हन स्मिथ तंबूत

प्रचंड लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने स्टीव्हन स्मिथलाही गमावलं आहे. प्रसिध कृष्णाच्या गोलंदाजीवर यशस्वी जैस्वालने त्याचा सुरेख झेल टिपला. त्याने १९ धावा केल्या.

21:29 (IST) 26 Nov 2023
ऑस्ट्रेलियाचा तिसरा गडी माघारी, १४ षटकांत १८३ धावांची आवश्यकता

पॉवर प्लेचा ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी पुरेपूर फायदा घेतला असला तर भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाचे तीन फलंदाज माघारी धाडले आहेत. मॅट शॉर्ट (१९) आणि जॉश इंग्लिस (२) या दोघांना रवी बिश्नोईने तर ग्लेन मॅक्सवेलला (१२) अक्षर पटेलने पव्हेलियनचा रस्ता दाखवला.

21:08 (IST) 26 Nov 2023
ऑस्ट्रेलियाची दणक्यात सुरुवात, २ षटकांत चोपल्या ३१ धावा

२३६ धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियाने दणक्यात सुरुवात केली आहे. ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीरांनी २ षटकांत ३१ धावा चोपल्या आहेत.

20:49 (IST) 26 Nov 2023
भारताचे ऑस्ट्रेलियाला २३६ धावांचे आव्हान; इशान-यशस्वी-ऋतुराजची अर्धशतकं

इशान किशन, यशस्वी जैस्वाल आणि ऋतुराज गायकवाड यांच्या अर्धशतकी खेळींच्या बळावर भारताने दुसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात २३५ धावांचा डोंगर उभारला. फलंदाजीला पोषक खेळपट्टीवर भारताच्या युवा फलंदाजांनी चौकार-षटकारांची लयलूट केली. यशस्वीने २५ चेंडूत ५३ तर ऋतुराज गायकवाडने ४३ चेंडूत ५८ तर इशान किशनने ३२ चेंडूत ५२ धावांची खेळी केली. रिंकू सिंगने ९ चेंडूत ४ चौकार आणि २ षटकारांसह नाबाद ३१ धावांची खेळी केली.

20:39 (IST) 26 Nov 2023
भारताच्या दोनशे पार

रिंकू सिंगच्या दमदार षटकारासह भारतीय संघाने दोनशे धावांचा टप्पा ओलांडला.

20:34 (IST) 26 Nov 2023
कर्णधार सूर्यकुमार यादव तंबूत

नॅथन एलिसच्या फसव्या स्लोअरवन चेंडूवर कर्णधार सूर्यकुमार यादव बाद झाला. त्याने १९ धावा केल्या.

20:28 (IST) 26 Nov 2023
ऋतुराज गायकवाडचं अर्धशतक

यशस्वी जैस्वाल आणि इशान किशन धुवाधार टोलेबाजी करत असतानाच ऋतुराज गायकवाडने एका बाजूने संयमी खेळ करत अर्धशतक पूर्ण केलं.

20:18 (IST) 26 Nov 2023
३२ चेंडूत ५२ धावांची खेळी करुन इशान किशन माघारी

पहिल्या सामन्यातील सूर कायम राखत इशान किशानने ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांचा समाचार घेत ३२ चेंडूत ५२ धावांची आक्रमक खेळी केली. यात ३ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश आहे.

20:14 (IST) 26 Nov 2023
इशान किशनचं २९ चेंडूत अर्धशतक

डावखुरा शैलीदार फलंदाज इशान किशनने यशस्वी जैस्वालचा कित्ता गिरवत अवघ्या २९ चेंडूत अर्धशतकाला गवसणी घातली. तन्वीर संघाच्या गोलंदाजीवर षटकार खेचत इशानने अर्धशतक पूर्ण केलं. पहिल्या ट्वेन्टी२० सामन्यातही इशानने तडाखेबंद खेळी केली होती.

20:11 (IST) 26 Nov 2023
मॅक्सवेलच्या षटकात २२ धावांची लूट

ग्लेन मॅक्सवेलच्या दुसऱ्या षटकात इशान किशन आणि ऋतुराज गायकवाड यांनी २२ धावा चोपून काढल्या. नुकत्याच झालेल्या वर्ल्डकप स्पर्धेत मॅक्सवेल ऑस्ट्रेलियाच्या प्रमुख फिरकीपटूंपैकी एक होता.

19:49 (IST) 26 Nov 2023
दहाव्या षटकात भारताची शंभरी पार

ऋतुराज गायकवाड आणि यशस्वी जैस्वाल यांच्या दमदार खेळाच्या बळावर भारतीय संघाने दहाव्या षटकातच शंभर धावांचा टप्पा ओलांडला.

19:32 (IST) 26 Nov 2023
झंझावाती अर्धशतकानंतर यशस्वी जैस्वाल तंबूत

२४ चेंडूत अर्धशतक झळकावल्यानंतर यशस्वी जैस्वाल तंबूत परतला. नॅथन एलिसच्या गोलंदाजीवर तीन चौकार खेचत यशस्वीने अर्धशतकाला गवसणी घातली. पण त्याच षटकात स्लोअर वन चेंडूवर तो बाद झाला. झंपाने त्याचा झेल टिपला. त्याने २५ चेंडूत ९ चौकार आणि २ षटकारांसह ५३ धावांची खेळी केली.

19:30 (IST) 26 Nov 2023
यशस्वी जैस्वालचं २४ चेंडूत अर्धशतक

डावखुरा शैलीदार फलंदाज यशस्वी जैस्वालने अवघ्या २४ चेंडूत अर्धशतकाला गवसणी घातली. नॅथन एलिसच्या गोलंदाजीवर सलग तीन चौकार खेचत यशस्वीने अर्धशतक पूर्ण केलं.

19:26 (IST) 26 Nov 2023
शॉन अबॉटच्या ओव्हरमध्ये २४ धावांची लूट

ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज शॉन अबॉटच्या पहिल्याच ओव्हरमध्ये यशस्वी-ऋतुराज जोडीने २४ धावा चोपून काढल्या.

19:23 (IST) 26 Nov 2023
ऋतुराज-यशस्वीची दमदार सलामी

ऋतुराज गायकवाड आणि यशस्वी जैस्वाल या युवा जोडीने चौकार-षटकारांची लयलूट करत पन्नाशीचा टप्पा ओलांडला. या जोडीने पॉवरप्लेचा पुरेपूर फायदा उठवत जोरदार टोलेबाजी केली.

18:42 (IST) 26 Nov 2023
भारतीय संघ जैसे थे, ऑस्ट्रेलियाच्या संघात दोन बदल

भारतीय संघ- यशस्वी जैस्वाल, ऋतुराज गायकवाड, इशान किशन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, रिंकू सिंग, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार, प्रसिध कृष्णा

ऑस्ट्रेलियाचा संघ- स्टीव्हन स्मिथ, मॅथ्यू शॉर्ट, जोश इंगलिस, मार्कस स्टॉइनस, टीम डेव्हिड, ग्लेन मॅक्सवेल, मॅथ्यू वेड (कर्णधार आणि यष्टीरक्षक), शॉन अबॉट, नॅथन एलिस, अॅडम झंपा, तन्वीर संघा

18:34 (IST) 26 Nov 2023
ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकली; गोलंदाजीचा निर्णय

तिरुवनंतपुरम इथल्या दुसऱ्या ट्वेन्टी२० सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मॅथ्यू वेडने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलियाने अॅडम झंपा आणि ग्लेन मॅक्सवेल यांना संघात समाविष्ट केलं आहे. भारतीय संघात कोणतेही बदल नाहीत.

India vs Australia 2nd T20 Live Updates

भारत वि ऑस्ट्रेलिया दुसरा ट्वेन्टी२० सामना लाईव्ह

Story img Loader