IND vs AUS : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुसरा टी२० सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत १९ षटकात ७ बाद १३२ धावा केल्या होत्या. बेन मॅकडरमॉटने तळाच्या फलंदाजांना हाताशी घेऊन केलेल्या उपयुक्त खेळीच्या जोरावर भारतापुढे डकवर्थ लुईस नियमानुसार १९ षटकात १३७ धावांचे आव्हान देण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा पाऊस आल्याने भारतापुढे ११ षटकात ९० धावांचे आव्हान देण्यात आले. पण पाऊस न थांबल्याने सामना रद्द करण्यात आला.

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने दुसऱ्या सामन्यातही नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. ऑस्ट्रेलियाची सुरूवात फारशी चांगली झाली नाही. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार फिंच शून्यावर झेलबाद झाला. भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर ऋषभ पंतने यष्ट्यांमागे त्याचा झेल टिपला आणि ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का दिला. फटकेबाजीला सुरुवात केल्यानंतर धोकादायक ख्रिस लिनदेखील १३ धावांवर झेलबाद झाला. पाठोपाठ चांगली सुरुवात मिळालेला सलामीवीर डार्सी शॉर्ट खलीलच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. त्याने १४ धावा काढल्या. मॅक्सवेलच्या साथीने गेल्या सामन्यात चांगली फलंदाजी केलेला मार्कस स्टॉयनीस (४) बाद झाला. ग्लेन मॅक्सवेलही आज स्वस्तात माघारी परतला. २२ चेंडूत १९ धावा करून तो बाद झाला. त्याने आजच्या डावात केवळ १ चौकार लगावला. देशांतर्गत टी२० स्पर्धेत चांगली कामगिरी करणारा यष्टीरक्षक अॅलेक्स कॅरी (४) या सामन्यात अपयशी ठरला. नॅथन कुल्टर-नाईल याने ९ चेंडूत १८ धावा तडकावून बाद झाला आणि ऑस्ट्रेलियाचा सातवा गडी माघारी परतला. त्याला भुवनेश्वर कुमारने माघारी पाठवले. त्यानंतर पावसाच्या व्यत्ययामुळे खेळ थांबवण्यात आला. त्यापुढे एकाही चेंडूचा खेळ होऊ शकला नाही.

Live Blog

16:36 (IST)23 Nov 2018
भारताच्या आव्हानावर पावसाचं पाणी

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुसरा टी२० सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. भारतापुढे डकवर्थ लुईस नियमानुसार १९ षटकात १३७ धावांचे आव्हान देण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा पाऊस आल्याने भारतापुढे ११ षटकात ९० धावांचे आव्हान देण्यात आले. पण पाऊस न थांबल्याने सामना रद्द करण्यात आला.

16:09 (IST)23 Nov 2018
भारतापुढे ११ षटकात ९० धावांचे आव्हान

ऑस्ट्रेलियाने १९ षटकांत ७ बाद १३२ धावा केल्या. मात्र त्यानंतर पावसामुळे खेळ थांबला. त्यामुळे आता भारतापुढे डकवर्थ लुईस नियमानुसार १९ षटकात १३७ धावांचे आव्हान देण्यात आले होते.  आता पुन्हा पाऊस आल्याने भारतापुढे ११ षटकात ९० धावांचे आव्हान देण्यात आले.

15:41 (IST)23 Nov 2018
भारतापुढे १९ षटकांत १३७ धावांचे आव्हान

ऑस्ट्रेलियाने १९ षटकांत ७ बाद १३२ धावा केल्या. मात्र त्यानंतर पावसामुळे खेळ थांबला. त्यामुळे आता भारतापुढे डकवर्थ लुईस नियमानुसार १९ षटकात १३७ धावांचे आव्हान देण्यात आले आहे.

14:36 (IST)23 Nov 2018
कुल्टर-नाईल बाद, ऑस्ट्रेलियाचा सातवा गडी माघारी

फटकेबाजी करणारा नॅथन कुल्टर-नाईल ९ चेंडूत १८ धावा तडकावून बाद झाला आणि ऑस्ट्रेलियाचा सातवा गडी माघारी परतला. त्याला भुवनेश्वर कुमारने माघारी पाठवले.

14:27 (IST)23 Nov 2018
अॅलेक्स कॅरी माघारी, ऑस्ट्रेलियाला सहावा धक्का

देशांतर्गत टी२० स्पर्धेत चांगली कामगिरी करणारा यष्टीरक्षक अॅलेक्स कॅरी या सामन्यात मात्र अपयशी ठरला. त्याच्या रूपाने ऑस्ट्रेलियाला सहावा धक्का बसला. त्याला कुलदीप यादवने बाद केले.

14:18 (IST)23 Nov 2018
ग्लेन मॅक्सवेल बाद, ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ गारद

गेल्या सामन्यात भारतीय गोलंदाजांसाठी डोकेदुखी ठरलेला ग्लेन मॅक्सवेल आज स्वस्तात माघारी परतला. २२ चेंडूत १९ धावा करून तो बाद झाला. त्याने आजच्या डावात केवळ १ चौकार लगावला.

14:04 (IST)23 Nov 2018
स्टॉयनीस बाद, ऑस्ट्रेलियाचे चार गडी माघारी

मॅक्सवेलच्या साथीने गेल्या सामन्यात चांगली फलंदाजी केलेला मार्कस स्टॉयनीस बाद झाला आणि ऑस्ट्रेलियाचे चार गडी माघारी परतले. त्याला बुमराहने तंबूत धाडले.

13:53 (IST)23 Nov 2018
डार्सी शॉर्ट त्रिफळाचीत, ऑस्ट्रेलियाचा तिसरा गडी माघारी

चांगली सुरुवात मिळालेला सलामीवीर डार्सी शॉर्ट खलीलच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला आणि ऑस्ट्रेलियाचा तिसरा गडी माघारी परतला. त्याने १४ धावा काढल्या.

13:43 (IST)23 Nov 2018
धोकादायक ख्रिस लिन बाद; ऑस्ट्रेलियाला दुसरा धक्का

फटकेबाजीला सुरुवात केल्यानंतर धोकादायक ख्रिस लिन १३ धावांवर झेलबाद झाला आणि ऑस्ट्रेलियाला दुसरा धक्का बसला. खलील अहमदने त्याचा अडसर दूर केला.

13:22 (IST)23 Nov 2018
कर्णधार फिंच झेलबाद; ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार फिंच शून्यावर झेलबाद झाला. भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर ऋषभ पंतने यष्ट्यांमागे त्याचा झेल टिपला आणि ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का दिला.

12:54 (IST)23 Nov 2018
नाणेफेक जिंकून भारताची प्रथम गोलंदाजी

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने दुसऱ्या सामन्यातही नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. संघात एकही बदल करण्यात आलेला नाही.

12:47 (IST)23 Nov 2018
मालिकेत बरोबरी साधण्याची भारताला संधी

पहिला टी२० सामना भारताने ४ धावांनी गमावला. त्यामुळे आजचा सामना जिंकून मालिकेत बरोबरी करण्यासाठी आणि मालिकेतील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी भारताचा संघ मैदानात उतरणार आहे.

Story img Loader