कर्णधार विराट कोहलीने केलेल्या नाबाद 61 धावांच्या खेळीवर भारताने अखेरच्या टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियावर मात केली. 6 गडी राखून भारताने हा सामना जिंकत मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. दुसरा टी-20 सामना पावसाने व्यत्यय आणल्यामुळे रद्द झाला. सामन्यानंतर बोलत असताना विराटने आपला संघ हा ऑस्ट्रेलियापेक्षा तांत्रिक बाबतीत सरस असल्याचं म्हटलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अवश्य वाचा – विराटच्या अर्धशतकाने मालिका बरोबरीत, अखेरच्या टी-20 सामन्यात भारत विजयी

“तांत्रिकदृष्ट्या आणि खेळाच्या शैलीचा विचार केला तर आम्ही ऑस्ट्रेलियापेक्षा सरस होतो. आजच्या सामन्यात गोलंदाजीमध्ये आम्ही अधिक चांगली कामगिरी केली. खेळपट्टी पाहता ऑस्ट्रेलियाचा संघ 180 पर्यंतची धावसंख्या गाठेल असा आम्हाला अंदाज होता. मात्र कांगारुंना 164 धावांवर रोखणं हे आमच्या गोलंदाजांचं कौशल्य आहे.” विराटने आपल्या संघाचं कौतुक केलं.

ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 165 धावांचा पाठलाग करताना भारताची सलामीची जोडी शिखर धवन आणि रोहित शर्माने धडाकेबाज सुरुवात करुन दिली. कर्णधार विराटने त्यांच्या खेळीचं कौतुकही केलं. ज्यावेळी शिखर आणि रोहित फॉर्मात असतात तेव्हा त्यांना बाद करणं कठीण असतं. आजच्या सामन्यानंतर भारतीय संघ 6 डिसेंबरपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे.