२६ डिसेंबर पासून मेलबर्न येथे सुरू होणाऱ्या तिसऱ्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाने संघात सहा वर्षाच्या खेळाडूचा समावेश केला आहे. तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी १५ जणांच्या संघामध्ये यजमानांनी ६ वर्षाच्या आर्ची शिलर नावाच्या खेळाडूचा समावेश करण्यात आला आहे. आर्ची शिलर हा तिसऱ्या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियन संघाचा उपकर्णधारदेखिल असणार आहे. ऑस्ट्रेलियन कर्णधार टीम पेनने आर्ची शिलरच्या वाढदिवसादिवशी शनिवारी (ता. 22) रोजी ही घोषणा केली आहे. यानंतर आर्ची शिलरने तिसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियन संघासोबत सरावदेखिल केला आहे. सध्या त्याचे फोटो सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहेत.
Meet the newest member of the Australian Test team: https://t.co/vmcqkK0tqE @MakeAWishAust | #AUSvIND pic.twitter.com/0EMBSu4yEm
— cricket.com.au (@cricketcomau) December 23, 2018
आर्ची जेव्हा अॅडलेड ओव्हल मैदानावर आला तेव्हा त्याला त्याची ऑस्ट्रेलियाची जर्सी देण्यात आली. तसेच त्याने संघाबरोबर सरावातही भाग घेतला होता. त्याचबरोबर आर्चीने भारताचा कर्णधार विराट कोहलीलाही बाद करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. आर्ची हा दिग्गज माजी लेग स्पीनर शेन वॉर्नला आदर्श मानतो. काही दिवसांपूर्वी त्याला ऑस्ट्रेलियाचे मुख्य प्रशिक्षक जस्टीन लँगर यांच्याकडून मेक ए विश या फाउंडेशनच्या मदतीने व्हिडिओ कॉल करण्यात आला. त्यावेळी त्याला ऑस्ट्रेलियन संघातील त्याच्या समावेशाबद्दल सांगण्यात आले. त्याच्यासाठी हा सुखद आश्चर्याचा धक्का होता.
Fans thronged Yarra Park for the grand Indian Summer Festival happening in Melbourne. The two captains pose with the Border-Gavaskar trophy at the event #AUSvIND pic.twitter.com/BkY2Kd0l2O
— BCCI (@BCCI) December 23, 2018
Watch out Nathan Lyon, Archie’s coming for your spot!
MORE: https://t.co/zOHu6KpvYE pic.twitter.com/PEgW1qSITd
— cricket.com.au (@cricketcomau) December 23, 2018