India vs Australia 4th Test : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि स्टार फलंदाज विराट कोहली मागील काही दिवसांपासून कसोटी क्रिकेटमध्ये छाप पाडण्यात अपयशी ठरत आहे. त्याने खराब फॉर्मनंतर टी २० आणि वनडेत पुनरागमन केलं. पण कसोटी क्रिकेटमध्ये धावांचा पाऊस पाडण्यात त्याला अपयश येत असल्याचं दिसत आहे. कोहलीने २००९ नंतर कसोटी क्रिकेटमध्ये एकही शतक ठोकलं नाही. पण विराटने आज अहमदाबादमध्ये सुरु असलेल्या भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या चौथ्या कसोटी सामन्यात ४२ धावा केल्या, तर विराटच्या नावावर आणखी एक विक्रम नोंदवला जाईल.
बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा शेवटचा चौथ्या कसोटी सामन्यात विराटने ४२ धावा केल्या, तर विराट कसोटी क्रिकेटमध्ये घरेलू मैदानात त्याच्या ४००० धावा पूर्ण करेल. दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि विरेंद्र सेहवाग यांच्यानंतर ही कामगिरी करणारा विराट पाचवा फलंदाज ठरेल. तसंच विराट कोहलीचा भारतातील हा ५० कसोटी सामनाही आहे.
विराट कोहली अहमदाबाद कसोटीच्या पहिल्या डावात ४२ धावा करण्यात यशस्वी झाला, तर तो भारतात घरेलू मैदानावर सर्वात वेगवान ४००० धावा बनवणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तिसऱ्या स्थानावर येईल. तो भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि लिटल मास्टर गावस्कर यांचा विक्रम मोडेल. कोहलीने आतापर्यंत ७६ डावात ३९५८ धावा कुटल्या आहेत. तसंच ४००० हजार धावा बनवणाऱ्या खेळाडूंच्या यादीत कोहलीची सरासरी (५८) सर्वात चांगली असेल.
भारतात घरेलू मैदानावर सर्वात वेगवान ४००० धावा बनवणारे फलंदाज
१) विरेंद्र सेहवाग (७१ इनिंग)
२) सचिन तेंडुलकर (७६ इनिंग)
३) सुनिल गावस्कर (८७ इनिंग)
४) राहुल द्रविड (८८ इनिंग)