India vs Australia 5th T20 Match Highlights, 03 December 2023 : बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या पाचव्या टी-२० सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. रोमहर्षक झालेल्या या सामन्यात टीम इंडियाने ६ धावांनी विजय मिळवला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाला विजयासाठी शेवटच्या षटकात १० धावा करायच्या होत्या. संपूर्ण मालिकेत नाबाद राहिलेला मॅथ्यू वेड क्रीजवर होता, मात्र अर्शदीप सिंगने अप्रतिम गोलंदाजी करत भारताला विजय मिळवून दिला. यासह भारताने पाच सामन्यांची मालिका ४-१ अशी जिंकली. भारताने प्रथम फलंदाजी करताना १६१ धावांचे लक्ष्य ठेवले होते. मात्र प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाला २० षटकांत १५४ धावांच करता आल्या.
IND vs AUS 5th T20 Highlights : रविवारी बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या शेवटच्या टी-२० सामन्यात भारताने ऑस्ट्रेलिया सहा धावांनी पराभव केला. त्याचबरोबर पाच सामन्यांची टी-२० मालिका ४-१ अशी जिंकली आहे.
भारताने बेंगळुरू येथे खेळल्या गेलेल्या पाचव्या टी-20 सामन्यातही ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. रोमांचक झालेल्या या सामन्यात भारताने प्रथम खेळून कांगारूंना 161 धावांचे लक्ष्य दिले होते. यानंतर सामना 19 षटकांपर्यंत कांगारूंच्या हातात राहिला, मात्र अखेरच्या षटकात अर्शदीप सिंगने 10 धावा देत भारताला रोमहर्षक विजय मिळवून दिला. भारताच्या 161 धावांच्या प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियन संघ 8 गड्यांच्या मोबदल्यात 154 धावाच करू शकला. भारतातर्फे अक्षर पटेलने चार षटकात अवघ्या 14 धावा देत एक विकेट घेतली. तर रवी बिश्नोईने 29 धावांत 2 गडी बाद केले. मुकेश कुमारने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या.
आवेश खानने 18व्या षटकात 15 धावा दिल्या. मॅथ्यू वेडने या षटकात तीन चौकार मारले. आता सामना पुन्हा ऑस्ट्रेलियाच्या दिशेने गेला आहे. ऑस्ट्रेलियाला विजयासाठी शेवटच्या 12 चेंडूत 17 धावा करायच्या आहेत.
मुकेश कुमारने सामन्यात जीवदान दिले आहे. त्याने सलग 2 विकेट घेतल्या आहेत. ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 32 धावांची गरज आहे. मुकेश कुमारने 17व्या षटकात दोन चेंडूत दोन बळी घेत सामना भारताकडे वळवला. या षटकात मुकेशने केवळ पाच धावा दिल्या. मॅथ्यू शॉर्ट आणि बेन द्वारशुईस बाद झाले. आता ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 18 चेंडूत 32 धावा करायच्या आहेत. संपूर्ण मालिकेत नाबाद राहिलेला कर्णधार मॅथ्यू वेड क्रीझवर आहे.
अर्शदीप सिंगने 15व्या षटकातील पहिल्या पाच चेंडूत 12 धावा दिल्या होत्या. मात्र, शेवटच्या चेंडूवर षटकार मारण्याच्या प्रयत्नात बेन मॅकडरमॉट बाद झाला. रिंकू सिंगने सीमारेषेपर्यंत लांब धाव घेत त्याचा झेल घेतला. तो 36 चेंडूत पाच षटकारांच्या मदतीने 54 धावा करून बाद झाला.
अर्शदीप सिंगने 15व्या षटकातील पहिल्या पाच चेंडूत 12 धावा दिल्या होत्या. मात्र, शेवटच्या चेंडूवर षटकार मारण्याच्या प्रयत्नात बेन मॅकडरमॉट बाद झाला. रिंकू सिंगने सीमारेषेपर्यंत लांब धाव घेत त्याचा झेल घेतला. तो 36 चेंडूत पाच षटकारांच्या मदतीने 54 धावा करून बाद झाला.
अक्षर पटेलने महत्त्वाच्या क्षणी भारताला यश मिळवून दिले. 17 चेंडूत 17 धावा करून टीम डेव्हिड बाद झाला. आवेश खानने दाऊदचा अप्रतिम झेल घेतला. 14 षटकांनंतर ऑस्ट्रेलियाची धावसंख्या चार गड्यांच्या मोबदल्यात 104 धावा आहे. कांगारूंना आता 36 चेंडूत विजयासाठी 57 धावा करायच्या आहेत.
ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 10 षटकांनंतर 3 गडी बाद 70 धावा. सध्या ऑस्ट्रेलियाकडून बेन मॅकडरमॉट आणि टीम डेव्हिड क्रीजवर आहेत. बेन मॅकडरमॉटने 20 चेंडूत 25 धावा केल्या आहेत. तर टीम डेव्हिड 8 चेंडूत 6 धावा करून खेळत आहे.
रवी बिश्नोईने टीम इंडियाला तिसरे यश मिळवून दिले. रवी बिश्नोईच्या चेंडूवर आरोन हार्डी पायचीत झाला. अॅरॉन हार्डीने 10 चेंडूत 6 धावा केल्या. आता ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 7 षटकांनंतर 3 बाद ५५ धावा आहे. ऑस्ट्रेलियाकडून बेन मॅकडरमॉट आणि टीम डेव्हिड क्रीजवर आहेत
भारतीय संघाला मोठे यश मिळाले आहे. रवी बिश्नोईने तुफानी फलंदाजी करणाऱ्या ट्रॅव्हिस हेडला बाद केले. ट्रॅव्हिस हेडने 18 चेंडूत 28 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत 5 चौकार आणि 1 षटकार लगावला. आता ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 5 षटकात 2 बाद 48 धावा आहे. दोन्ही सलामीवीर पॅव्हेलियनमध्ये परतले आहेत.
वेगवान गोलंदाज मुकेश कुमारने भारताला पहिले यश मिळवून दिले. त्याने आपल्या तिसऱ्या आणि डावातील पहिल्याच षटकात टीम इंडियाला एक विकेट दिली. मुकेशने जोश फिलिपला क्लीन बोल्ड केले. फिलिपला चार चेंडूत केवळ चार धावा करता आल्या. ऑस्ट्रेलियाने तीन षटकात एका विकेटवर 28 धावा केल्या आहेत. ट्रॅव्हिस हेड 11 चेंडूत 17 धावा करून नाबाद असून बेन मॅकडरमॉट तीन चेंडूत सहा धावा करून नाबाद आहे.
ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 2 षटकांनंतर 18 धावा. आवेश खानने भारताकडून दुसरे षटक टाकले. या षटकात 4 धावा झाल्या. सध्या ट्रेव्हिस हेड 11 चेंडूत 17 धावा करून खेळत आहे. त्याचवेळी जोश फिलिप शून्यावर नाबाद आहे.
फलंदाजीसाठी अनुकूल असलेल्या खेळपट्टीवर प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघ २० षटकांत आठ गडी गमावून केवळ १६० धावा करू शकला. चार षटकांत ३३ धावांवर पहिली विकेट पडल्यानंतर टीम इंडियाने ठराविक अंतराने विकेट गमावल्या. भारताने १०व्या षटकात अवघ्या ५५ धावांत चार विकेट गमावल्या. ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव, रिंकू सिंग आज अपयशी ठरले . मात्र, श्रेयस अय्यर एका टोकाला उभा राहिला. अय्यरने ३७ चेंडूत ५३ धावा केल्या. यादरम्यान त्याच्या बॅटमधून ५ चौकार आणि २ षटकार आले. त्याला जितेश शर्मा २४ आणि अक्षर पटेल ३१ यांनी चांगली साथ दिली. ऑस्ट्रेलियाकडून जेसन बेहरेनडॉर्फ आणि बेन द्वारशुइसने प्रत्येकी दोन गडी बाद केले.
भारताने 19 व्या षटकात 143 धावांवर सहावी विकेट गमावली आहे. अक्षर पटेल 21 चेंडूत 31 धावा करून बाद झाला. त्याने दोन चौकार आणि एक षटकार लगावला. अक्षरला जेसन बेहरेनडॉर्फने झेलबाद केले.
16 षटकांनंतर टीम इंडियाची धावसंख्या पाच विकेटवर 115 धावा आहे. श्रेयस अय्यर 34 आणि अक्षर पटेल 12 धावांवर खेळत आहे. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी आतापर्यंत अचूक लाईन लेन्थवर गोलंदाजी केली आहे, मात्र भारतीय फलंदाज शेवटच्या चार षटकांमध्ये आपली लय खराब करण्याचा प्रयत्न करतील.
14 व्या षटकात अवघ्या 97 धावांवर भारताने पाचवी विकेट गमावली. जितेश शर्मा षटकार मारण्याच्या प्रयत्नात अॅरॉन हार्डीच्या चेंडूवर झेलबाद झाला. त्याने 16 चेंडूत 3 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 24 धावा केल्या.
https://twitter.com/Saabir_Saabu01/status/1731322480768540815
पहिल्या षटकातून 16 धावा आणि 12व्या षटकातून 10 धावा आल्या. तनवीर संघाने 12 वे षटक टाकले. या षटकात जितेश शर्माने षटकार ठोकला. मात्र, सीमारेषेवर झेल सुटला आणि षटकार गेला. या दोघांनी शेवटच्या 12 चेंडूत वेगवान धावा करत संघासाठी छोटेसे पुनरागमन केले आहे. 12 षटकांनंतर भारताची धावसंख्या चार गड्यांच्या मोबदल्यात 87 धावा आहे.
भारताची चौथी विकेट पडली, रिंकू सिंग बाद
10 व्या षटकात अवघ्या 55 धावांवर भारताने चौथी विकेट गमावली आहे. रिंकू सिंगला आठ चेंडूत केवळ सहा धावा करता आल्या. तन्वीर संघाच्या षटकात षटकार मारण्याच्या प्रयत्नात तो झेलबाद झाला.
https://twitter.com/ankit_bhattar/status/1731316853530910900
भारताची तिसरी विकेट पडली, सूर्यकुमार बाद
सातव्या षटकात अवघ्या 43 धावांवर भारताला मोठा धक्का बसला. कर्णधार सूर्यकुमार यादव केवळ पाच धावा करून बाद झाला. तो बेन द्वारशुइसकरवी झेलबाद झाला. सातव्या षटकातील पाचव्या चेंडूवर तो बाद झाला. सूर्यकुमारला सात चेंडूत केवळ पाच धावा करता आल्या. भारताने सात षटकांत तीन गडी बाद 46 धावा केल्या आहेत. श्रेयस अय्यर सात धावा करून नाबाद आहे.द्वारशुईचे हे दुसरे यश आहे. आता श्रेयस अय्यर आणि रिंकू सिंग क्रीजवर आहेत.
पाचव्या षटकात ३३ धावांवर टीम इंडियाने दुसरी विकेटही गमावली. बेन द्वारशुईसने ऋतुराज गायकवाडला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. त्याला १२चेंडूत केवळ १० धावा करता आल्या. 5 षटकांनंतर भारताची धावसंख्या दोन गड्यांच्या मोबदल्यात ३५ धावा आहे. तत्पूर्वी यशस्वी जैस्वाल मोठा शॉट खेळण्याच्या प्रयत्नात तो बाद झाला. त्याने १५ चेंडूत दोन षटकार आणि एक चौकारासह २१ धावा केल्या.
फलंदाजांसाठी उपयुक्त अशा खेळपट्टीवर भारतीय सलामीवीरांची संथ सुरुवात झाली आहे. 3 षटकांनंतर टीम इंडियाची धावसंख्या एकही विकेट न पडता 17 धावा आहे. यशस्वी जैस्वालने लेग साईडवर अॅरॉन हार्डीच्या षटकात षटकार मारला.
भारत (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जैस्वाल, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, रवी बिश्नोई, आवेश खान, मुकेश कुमार, अर्शदीप सिंग.
https://twitter.com/BCCI/status/1731299213487829427
ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन): ट्रॅव्हिस हेड, जोश फिलिप, बेन मॅकडरमॉट, अॅरॉन हार्डी, टिम डेव्हिड, मॅथ्यू शॉर्ट, मॅथ्यू वेड (कर्णधार/यष्टीरक्षक), बेन ड्वार्शुइस, नॅथन एलिस, जेसन बेहरेनडॉर्फ, तन्वीर संघा
ऑस्ट्रेलियन कर्णधार मॅथ्यू वेडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघ प्रथम फलंदाजी करेल. ऑस्ट्रेलियाने एक बदल केला आहे. टीम इंडियानेही एका बदलासह प्रवेश केला आहे.
दक्षिण आफ्रिका दौरा लक्षात घेऊन या सामन्यात श्रेयस अय्यर आणि दीपक चहर यांना प्रभाव पाडायचा आहे. भारताला १० डिसेंबरपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-२० मालिका खेळायची आहे. ज्यामध्ये अय्यर आणि चहर महत्त्वाची भूमिका बजावतील. अय्यरने एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत चमकदार कामगिरी केली होती, परंतु शुक्रवारी त्याने रायपूरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध वर्षभरातील पहिला टी-२० आंतरराष्ट्रीय सामना खेळला. या सामन्यात त्याने सात चेंडूंचा सामना करत आठ धावा केल्या ज्यात एकाही चौकाराचा समावेश नव्हता. त्यामुळे या दोन खेळाडूंवर विशेष लक्ष असणार आहे.
एम चिन्नास्वामी स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात एकमेकाविरुद्ध एक सामना झाला असून त्यात ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला आहे. या स्टेडियममधील भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यातील सर्वोच्च धावसंख्या १९४/३ आहे जी ऑस्ट्रेलियाने २०१९ मध्ये केली होती. मात्र, अलीकडचा फॉर्म पाहता या सामन्यात भारतच फेव्हरिट संघ असेल.
एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर आतापर्यंत ७ आंतरराष्ट्रीय टी-२० सामने खेळले गेले आहेत. २०१२ मध्ये येथे भारत आणि पाकिस्तान यांच्यात पहिला टी-२० सामना झाला होता, ज्यामध्ये पाकिस्तानने बाजी मारली होती. भारताने येथे ५ टी-२० सामने खेळले आहेत, त्यापैकी २ जिंकले आणि ३ वेळा पराभव पत्करावा लागला. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात येथे यापूर्वी एक टी-२० सामना खेळला गेला आहे. २०१९ मध्ये झालेल्या त्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने ७ गडी राखून विजय मिळवला होता.
https://twitter.com/BCCI/status/1731279496098292122
बंगळुरूमध्ये ७ पैकी ५ वेळा संघाने प्रथम गोलंदाजी जिंकली आहे, याचा अर्थ येथे लक्ष्याचा पाठलाग करणे सोप्पे होईल. तर प्रथम फलंदाजी करणारा संघ दोनदा जिंकला आहे. येथे २०० पेक्षा जास्त धावा केवळ एकदाच गाठली गेली आहेत. भारताने २०१७ मध्ये येथे इंग्लंडविरुद्ध २०२/६ धावा केल्या होत्या, जी या मैदानावरील आतापर्यंतची सर्वोच्च टी-२० धावसंख्या आहे.
रविवारी बंगळुरूमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. सकाळी पावसाची शक्यता १५ टक्के आहे. हा सामना संध्याकाळी ७ वाजल्यापासून खेळवला जाईल, त्यावेळी पावसाची शक्यता ११ टक्के आहे. संध्याकाळी जरी पावसाची शक्यता तशी नसली तरी सामना रद्द होण्याचा धोका आहे, पण जर सामन्याच्या मध्यभागी पाऊस पडला तर खेळ काही षटके कमी होऊ शकतो.
बंगळुरूमधील पावसाचा एम. चिन्नास्वामीच्या खेळपट्टीवरही परिणाम होऊ शकतो. खेळपट्टीवर कमी उसळी दिसू शकते. जरी येथील आऊटफिल्ड वेगवान असले तरी पाऊस पडल्यास आऊटफिल्ड थोडी संथ होऊ शकते. बंगळुरूमध्ये रविवारी संध्याकाळी ७-८च्या सुमारास सामन्याच्या वेळी आर्द्रता ६४ टक्के असेल आणि वारे ताशी २१ किलोमीटर वेगाने वाहतील.
भारत: यशस्वी जैस्वाल, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर/तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), जितेश शर्मा (यष्टीरक्षक), रिंकू सिंग, अक्षर पटेल/वॉशिंग्टन सुंदर, दीपक चाहर, रवी बिश्नोई, आवेश खान, मुकेश कुमार.
ऑस्ट्रेलिया: जोश फिलिप, ट्रॅविस हेड, बेन मॅकडर्मॉट, अॅरॉन हार्डी, टिम डेव्हिड, मॅथ्यू शॉर्ट, मॅथ्यू वेड (कर्णधार/ विकेट्स), बेन ड्वार्शुइस, ख्रिस ग्रीन, जेसन बेहरेनडॉर्फ, तन्वीर संघा/नाथन एलिस/केन रिचर्डसन.
कर्णधार सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील युवा भारतीय संघ रविवारी बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर, पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाशी भिडणार आहे. टीम इंडियाने ही मालिका आधीच जिंकली आहे, पण अंतिम सामना जिंकून त्यांना ४-१ असे फरक वाढवायचा आहे. भारतीय संघाने ही मालिका जर ४-१ने जिंकली तर ऑस्ट्रेलियाविरुद्ध एक विक्रम होईल. ऑस्ट्रेलियाविरुद्धची या फॉरमॅटमधील मालिका सर्वात मोठ्या फरकाने टीम इंडिया जिंकेल. दोन्ही संघांमध्ये प्रथमच पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळवली जात आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पाचवा सामना रविवार, ३ डिसेंबर रोजी बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जाईल. सामना सायंकाळी ७ वाजता सुरू होईल. ऑस्ट्रेलियन संघाने या मैदानावर आतापर्यंत एकही टी-२० सामना गमावलेला नाही. या सामन्यात सूर्यकुमार यादवच्या संघाला इतिहास बदलायला आवडेल. भारताने एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर सहा सामने खेळले आहेत. त्यांनी दोन सामने जिंकले आहेत आणि तीन गमावले आहेत, तर एका सामन्याचा निकाल लागला नाही. याउलट ऑस्ट्रेलियाने स्टेडियमवर दोन सामने खेळले आहेत आणि दोन्ही जिंकले आहेत.