India vs Australia, Cricket World Cup 2023 Final Highlights : विश्वचषकाच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रविवारी (१९ नोव्हेंबर) झालेल्या विजेतेपदाचा सामना ऑस्ट्रेलियाने सहा गडी राखून जिंकून विश्वचषकावर नाव कोरले. ऑस्ट्रेलिया सहाव्यांदा विश्वविजेता ठरला आहे. त्याचवेळी भारताचे तिसऱ्यांदा ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न भंगले. या स्पर्धेत भारताने सलग १० सामने जिंकले, मात्र ११व्या सामन्यात संघ मागे पडला.

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारतीय संघ प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत २४० धावांवर गारद झाला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला विजयासाी २४१ धावांचे लक्ष्य मिळाले होते. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने ४३ षटकात ४ विकेट गमावत २४१ धावा करुन सामना जिंकला. कांगारू संघासाठी ट्रॅव्हिस हेडने १३७ धावांची मॅचविनिंग इनिंग खेळली. मार्नस लाबुशेनने नाबाद ५८ धावा केल्या. मिचेल मार्श १५ धावा केल्यानंतर, डेव्हिड वॉर्नर सात धावा करून, स्टीव्ह स्मिथ चार धावा करून बाद झाला. ग्लेन मॅक्सवेलने नाबाद २ धावा केल्या.

Live Updates

World Cup 2023 Final India vs Australia Highlights Match Updates : ऑस्ट्रेलिया सहाव्यांदा विश्वविजेता ठरला आहे. त्याचवेळी भारताचे तिसऱ्यांदा ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न भंगले.

15:49 (IST) 19 Nov 2023
IND vs AUS Final: विराट-राहुलने सावरला टीम इंडियाचा डाव

८१ धावांवर ३ विकेट पडल्यानंतर केएल राहुल आणि विराट कोहलीने भारतीय संघाचा डाव सावरला आहे. दोघांनी २३ षटकांनंतर धावसंख्या ३ बाद १२५ धावांवर पोहोचवली आहे. कोहली ४५ आणि राहुल २३ धावांवर खेळत आहेत. दोन्ही फलंदाजांनी आतापर्यंत ४४ धावांची नाबाद भागीदारी केली आहे.

15:45 (IST) 19 Nov 2023
IND vs AUS Final: काँग्रेस नेते एकत्र बसून घेतायेत भारत-ऑस्ट्रेलिया फायनल सामन्याचा आनंद

एकदिवसीय विश्वचषक २०२३चा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात खेळला जात आहे. हा सामना नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जात आहे. मात्र या सामन्याचा आनंद काँग्रेस नेते मुंबईतील मुख्यालयात एकत्र बसून घेतायेत.

15:35 (IST) 19 Nov 2023
IND vs AUS Final: भारताच्या धावांचा वेग मंदावला, ५४ चेंडूत एकही आला नाही चौकार

टीम इंडियाच्या धावांचा वेग मंदावला आहे. बऱ्याच कालावधीपासून एकही चौकार आलेला नाही. शेवटचा चौकार ५४ चेंडूंपूर्वी मारला होता. २० षटकांनंतर भारताची धावसंख्या तीन गड्यांच्या मोबदल्यात ११५ धावा आहे. विराट कोहली ४० चेंडूत ३९ आणि केएल राहुल ३४ चेंडूत १९ धावांवर खेळत आहेत.

15:19 (IST) 19 Nov 2023
IND vs AUS Final: पॅट कमिन्सने दिल्या अवघ्या ३ धावा, अनुष्का शर्मा दिसली निराश

पॅट कमिन्सने आपल्या षटकात अवघ्या ३ धावा दिल्या. यानंतर विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा खूपच उदास दिसत होती. कोहली अजूनही क्रीजवर असला, तरी भारताने तीन विकेट्स लवकरच गमावल्याने धावसंख्या ३५० पर्यंत पोहोचणे कठीण होईल. १७ षटकांनंतर टीम इंडियाची धावसंख्या तीन विकेटवर १०४ धावा आहे.

15:17 (IST) 19 Nov 2023
IND vs AUS Final: टीम इंडियाचे धावांचे शतक! कोहली आणि राहुलकडून मोठ्या खेळीची अपेक्षा

टीम इंडियाला आता विराट कोहली आणि केएल राहुलकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. १६ षटकांनंतर धावसंख्या ३ बाद १०१ धावा आहे. कोहली ३४ आणि राहुल १० धावांवर खेळत आहेत. विराटने चालू विश्वचषकात ७००हून अधिक धावा केल्या आहेत. सामन्यादरम्यान एक चाहता विराटला भेटण्यासाठी थेट मैदानावर पोहोचला.

15:07 (IST) 19 Nov 2023
IND vs AUS Final: १३ षटकांनंतर भारताची धावसंख्या ३ बाद ८९ धावा

भारतीय संघाने १३ षटकांत ३ बाद ८९ धावा केल्या आहेत. विराट कोहली २७ आणि केएल राहुल पाच धावांवर नाबाद आहे. भारतीय चाहत्यांना दोन्ही खेळाडूंकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे.

14:53 (IST) 19 Nov 2023
IND vs AUS Final: रोहित शर्मा पाठोपाठ श्रेयस अय्यरही बाद, टीम इंडियाला तिसरा झटका

श्रेयस अय्यरच्या रूपाने भारताला तिसरा धक्का बसला. ११व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर तो पॅव्हेलियनमध्ये परतला. अय्यरला कमिन्सने यष्टिरक्षक जोश इंग्लिशच्या हाती झेलबाद केले. त्याला तीन चेंडूत केवळ चार धावा करता आल्या.

14:50 (IST) 19 Nov 2023
IND vs AUS Final: रोहित शर्मा ४७ धावा करून बाद झाला

टीम इंडियाला ७६ च्या स्कोअरवर दुसरा धक्का बसला आहे. रोहित शर्मा ४७ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात रोहितने आपली विकेट गमावली. ग्लेन मॅक्सवेलच्या चेंडूवर पाठीमागे धावताना ट्रॅव्हिस हेडने अप्रतिम झेल घेतला. रोहितने बाद होण्यापूर्वी ३१ चेंडूत ४७ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने ४ चौकार आणि ३ षटकार मारले.

14:44 (IST) 19 Nov 2023
IND vs AUS Final: विराट कोहलीची मिचेल स्टार्कच्या षटकांत चौकारांची हॅट्ट्रिक

भारताची धावसंख्या ७ षटकांनंतर एक विकेट गमावून ५४ धावा आहे. रोहित शर्मा २२ चेंडूत ३३ धावा करून खेळत आहे. त्याचवेळी नवीन फलंदाज विराट कोहलीने १३ चेंडूंचा सामना केल्यानंतर १६ धावा केल्या आहेत. स्टार्कच्या षटकात किंग कोहलीने पाठीमागे तीन चौकार मारले.

14:37 (IST) 19 Nov 2023
IND vs AUS Final: टीम इंडियाने ६ षटकांत केल्या ४० धावा

भारताने ६ षटकांनंतर १ गडी गमावून ४० धावा केल्या. रोहित शर्मा २१ चेंडूत ३२ धावा करून खेळत आहे. त्याने दोन षटकार मारले आहेत. विराट ८ चेंडूत ३ धावांवर खेळत आहे.

14:31 (IST) 19 Nov 2023
IND vs AUS Final: रोहित शर्माने मोडला ख्रिस गेलचा विक्रम

रोहित शर्माने ख्रिस गेलचा इंग्लंडविरुद्ध वनडे सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम मोडला आहे. ख्रिस गेल इंग्लंडविरुद्ध ८५ षटकार मारले होत, आता रोहित ८६ षटकारांसह एका
ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक षटकार मारत, एका संघाविरुद्ध सर्वाधिक षटकारा मारणारा फलंदाज ठरला आहे.

14:24 (IST) 19 Nov 2023
IND vs AUS Final: टीम इंडियाला पहिला धक्का

शुबमन गिल विश्वचषकाच्या अंतिम फेरीत अपयशी ठरला. तो पाचव्या षटकात मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीवर बाद झाला. लाँग ऑनवर उभ्या असलेल्या अॅडम झाम्पाने त्याचा झेल घेतला. गिलला सात चेंडूत केवळ चार धावा करता आल्या. भारताला पहिला धक्का ३० धावांवर बसला. टीम इंडियाच्या पाच षटकात एका विकेटवर ३७ धावा आहेत. रोहित शर्मा नाबाद ३१ तर विराट कोहली एका धावेवर नाबाद आहे.

14:16 (IST) 19 Nov 2023
IND vs AUS Final: रोहित-शुबमनने भारतीय डावाची केली सावध सुरुवात

भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि शुबमन गिल फलंदाजीसाठी आले आहेत. या दोघांनी भारतीय डावाची सुरुवात केली. चाहत्यांना त्यांच्याकडून मोठ्या भागीदारीची अपेक्षा आहे. त्याचवेळी मिचेल स्टार्क ऑस्ट्रेलियन गोलंदाजीची सुरुवात करत आहे. पहिल्या तीन षटकात बिनबाद एकूण १८ धावा आल्या आहे. रोहित १४ आणि शुबमन गिल ३ धावांवर खेळत आहेत.

14:14 (IST) 19 Nov 2023
IND vs AUS Final: फायनल सामना पाहण्यासाठी गृहमंत्री अमित शाह पोहोचले

फायनल सामना पाहण्यासाठी भारताचे गृहमंत्री अमित शाह अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पोहोचले आहेत. राष्ट्रगीत सुरू असताना शाह कॅमेऱ्याच्या नजरेत आले. गृहमंत्र्यांना क्रिकेट हा खेळ खूप आवडतो. याआधीही ते अनेकदा स्टेडियममध्ये सामना पाहण्यासाठी आले आहेत.

14:03 (IST) 19 Nov 2023
IND vs AUS Final: फायनलपूर्वी सचिन तेंडुलकरने विराट कोहलीला आपली जर्सी भेट दिली

फायनलपूर्वी सचिन तेंडुलकरने विराट कोहलीला आपली जर्सी भेट दिली

13:59 (IST) 19 Nov 2023
IND vs AUS Final: दोन्ही संघांचे राष्ट्रगीत झाल्यानंतर प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात

१५ मिनिटांचा एअर शो झाल्यानंतर दोन्ही संघाचे राष्ट्रगीत झाले. यामध्ये पहिल्यांदा ऑस्ट्रेलियाचे नंतर भारताचे राष्ट्रगीत झाले. आता प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल.

13:49 (IST) 19 Nov 2023
IND vs AUS Final: भारतीय संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी सज्ज

अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकली आहे. त्याने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्माने सांगितले की, त्याने प्लेइंग इलेल्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. रोहितने सांगितले की, मला प्रथम फलंदाजी करायची होती. ऑस्ट्रेलियन संघातही कोणताही बदल झालेला नाही.

13:46 (IST) 19 Nov 2023
IND vs AUS Final: नाणेफेकीनंतर भारतीय वायुसेनेचा एरोबॅटिक संघ सूर्य किरणचा एअर शो झाला सुरु

सामन्यापूर्वी भारतीय वायुसेनेचा एरोबॅटिक संघ सूर्य किरणचा एअर शो करत आहे. नाणेफेक झाल्यानंतर लगेचच दुपारी १:३५ वाजता या कार्यक्रमाला सुरूवात झाली. एअर शो १५ मिनिटे चालेल आणि दुपारी १:५० वाजता संपेल. यानंतर दोन्ही संघांचे राष्ट्रगीत होईल आणि त्यानंतर सामना सुरू होईल.

13:40 (IST) 19 Nov 2023
IND vs AUS Final: पाहा दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज

ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन): ट्रॅव्हिस हेड, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्हन स्मिथ, मार्नस लॅबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, जोश इंग्लिस (यष्टीरक्षक), मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स (कर्णधार), अॅडम झाम्पा, जोश हेझलवूड

13:37 (IST) 19 Nov 2023
IND vs AUS Final: ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून घेतला गोलंदाजीचा निर्णय

आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३चा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात खेळला जाणार आहे. तत्पूर्वी पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

13:26 (IST) 19 Nov 2023
IND vs AUS Final: दोन्ही संघांच्या खेळाडूंची तयारी सुरू

दोन्ही संघ मैदानावर पोहोचले असून नाणेफेकपूर्वी दोन्ही संघांचे खेळाडू सराव करत आहेत. सामन्यापूर्वी, खेळाडू आपले शरीर तंदुरुस्त आणि ताजेतवाने ठेवण्यासाठी हलका व्यायाम करत आहेत. जेणकरुन सामन्यादरम्यान धावण्यासाठी आणि डाइव्हसाठी मदत होईल. जसप्रीत बुमराह आणि मिचेल स्टार्क यांनीही नाणेफेकीपूर्वी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

13:18 (IST) 19 Nov 2023
IND vs AUS Final: रणवीर सिंग पत्नी दीपिका पदुकोणसोबत स्टेडियममध्ये पोहोचला

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग पत्नी दीपिका पदुकोणसोबत नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये पोहोचला आहे. याशिवाय अनुष्का शर्मा आणि रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबाही स्टेडियममध्ये पोहोचल्या आहेत.

13:14 (IST) 19 Nov 2023
IND vs AUS Final: थोड्याच वेळात होणार नाणेफेक

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अंतिम सामन्यातील नाणेफेक थोड्याच वेळात होणार आहे. यानंतर दुपारी २ वाजता सामन्यात पहिला चेंडू टाकला जाईल.

13:07 (IST) 19 Nov 2023
IND vs AUS Final: ऑस्ट्रेलियन संघही स्टेडियमवर पोहोचला

या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघही स्टेडियममध्ये पोहोचला आहे. पाचवेळचा चॅम्पियन संघ आणखी एका विजेतेपदावर नाव कोरण्याचा प्रयत्न करताना दिसणार आहे. भारतीय संघ त्याला या मैदानावर रोखू इच्छितो.

13:03 (IST) 19 Nov 2023
IND vs AUS Final: प्लेअर ऑफ द टूर्नामेंटच्या शर्यतीत अनेक भारतीय खेळाडू

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अंतिम सामना आज अहमदाबाद येथे होणार आहे. यासह, 45 दिवस चाललेला 13 वा एकदिवसीय विश्वचषक आज संपणार आहे. दरम्यान प्लेअर ऑफ द टूर्नामेंटच्या शर्यतीत अनेक भारतीय खेळाडू सामील आहेत. या शर्यतीत विराट कोहलीपासून मोहम्मद शमीपर्यंत सर्वजण आघाडीवर आहेत.

12:58 (IST) 19 Nov 2023
IND vs AUS Final: विश्वविजेत्या कर्णधारांना मिळणार खास ब्लेझर –

विश्वविजेत्या कर्णधारांना मिळणार खास ब्लेझर –

बीसीसीआय १९७५ ते २०१९ मधील सर्व विश्वचषक विजेत्या कर्णधारांना एक विशेष ब्लेझर देखील देणार आहे. वेस्ट इंडिजचे दिग्गज क्लाइव्ह लॉईड (१९७५ आणि १९७९), भारताचे कपिल देव (१९८३), ऑस्ट्रेलियाचे अॅलन बॉर्डर (१९८७), श्रीलंकेचा अर्जुन रणतुंगा (१९९६), ऑस्ट्रेलियाचे स्टीव्ह वॉ (१९९९), रिकी पॉन्टिंग (२००३ आणि २००७), भारताचा महेंद्र धोनी (२०११), ऑस्ट्रेलियाचा मायकल क्लार्क (२०१५), इंग्लंडचा इऑन मॉर्गन (२०१९) या सर्वांना आमंत्रित करण्यात आले आहे.

12:57 (IST) 19 Nov 2023
IND vs AUS Final: एअर शोपासून प्रीतमच्या परफॉर्मन्सपर्यंत, फायनलच्या दिवशी कोण-कोणते कार्यक्रम होणार?

ड्रिंक्स आणि इनिंग ब्रेक्स दरम्यान होणार कार्यक्रम –

सामन्यादरम्यान पहिल्या डावात ड्रिंक्स ब्रेक दरम्यान गायक आदित्य गढवी परफॉर्म करणार आहे. यानंतर सामन्याचा पहिला डाव संपल्यानंतर प्रसिद्ध संगीतकार प्रीतम चक्रवर्ती यांचा कार्यक्रम होणार आहे. त्यांच्याशिवाय प्रसिद्ध गायिका जोनिता गांधी, नकाश अजीज, अमित मिश्रा, आकाश सिंग आणि तुषार जोशी हे देखील परफॉर्म करणार आहेत. यानंतर दुसऱ्या डावात ड्रिंक्स ब्रेक दरम्यान लेझर आणि लाइट शो आयोजित केला जाईल.

सायंकाळी ५:३० वाजता चॅम्पियन्सची होणार परेड –

सर्व विश्वचषक विजेत्या संघांच्या कर्णधारांना २०२३ च्या विश्वचषक अंतिम सामना पाहण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. पाकिस्तानचा इम्रान खान वगळता, वेस्ट इंडिजच्या क्लाइव्ह लॉयडपासून इंग्लंडच्या इऑन मॉर्गनपर्यंतचा प्रत्येक कर्णधार अंतिम सामन्याच्या इनिंग ब्रेक दरम्यान आयोजित करण्यात येणाऱ्या चॅम्पियन्सच्या परेडमध्ये भाग घेईल. या कार्यक्रमादरम्यान, कर्णधार त्यांच्या विश्वचषक विजेत्या ट्रॉफीचे प्रदर्शन करतील आणि बीसीसीआयकडून त्यांचा सत्कारही केला जाईल.

12:51 (IST) 19 Nov 2023
IND vs AUS Final: विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा पोहोचली अहमदाबादला

भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज खेळाडू विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा आणि रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा जडेजाही अहमदाबादला पोहोचली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अंतिम सामना पाहण्यासाठी ती नरेंद्र मोदी स्टेडियमवर काही वेळात पोहोचेल.

12:45 (IST) 19 Nov 2023
IND vs AUS Final: पुण्यात विराच आणि रोहितच्या पोस्टरवर दुधाचा अभिषेक

पुण्यातील क्रिकेट चाहत्यांनी विराट कोहली आणि रोहित शर्माच्या पोस्टर्सवर दुधाचा अभिषेक केला आहे. देशभरात भारताच्या विजयासाठी लोक प्रार्थना करत आहेत. अंतिम सामन्यासाठी भारतीय संघ स्टेडियमवर पोहोचला आहे.

12:41 (IST) 19 Nov 2023
IND vs AUS Final: भारतीय संघ नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये दाखल

भारतीय संघ हॉटेलमधून नरेंद्र मोदी स्टेडियमवर पोहोचला आहे. नाणेफेक लवकरच होणार आहे. दोन्ही संघ सध्या विजयाच्या रथावर स्वार आहेत.

World Cup 2023 Final India vs Australia Highlights : ऑस्ट्रेलिया सहाव्यांदा विश्वविजेता ठरला आहे. त्याचवेळी भारताचे तिसऱ्यांदा ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न भंगले. या स्पर्धेत सलग १० सामने जिंकले होते, मात्र ११व्या आणि अंतिम सामन्यात संघ मागे पडला. भारताला दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या फायनलमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले आहे. या अगोदर रिकी पाँटिंगच्या नेतृत्वाखालील संघाने २००३ मध्ये भारताचा पराभव केला होता.