India vs Australia, Cricket World Cup 2023 Final Highlights : विश्वचषकाच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रविवारी (१९ नोव्हेंबर) झालेल्या विजेतेपदाचा सामना ऑस्ट्रेलियाने सहा गडी राखून जिंकून विश्वचषकावर नाव कोरले. ऑस्ट्रेलिया सहाव्यांदा विश्वविजेता ठरला आहे. त्याचवेळी भारताचे तिसऱ्यांदा ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न भंगले. या स्पर्धेत भारताने सलग १० सामने जिंकले, मात्र ११व्या सामन्यात संघ मागे पडला.

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारतीय संघ प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत २४० धावांवर गारद झाला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला विजयासाी २४१ धावांचे लक्ष्य मिळाले होते. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने ४३ षटकात ४ विकेट गमावत २४१ धावा करुन सामना जिंकला. कांगारू संघासाठी ट्रॅव्हिस हेडने १३७ धावांची मॅचविनिंग इनिंग खेळली. मार्नस लाबुशेनने नाबाद ५८ धावा केल्या. मिचेल मार्श १५ धावा केल्यानंतर, डेव्हिड वॉर्नर सात धावा करून, स्टीव्ह स्मिथ चार धावा करून बाद झाला. ग्लेन मॅक्सवेलने नाबाद २ धावा केल्या.

Live Updates

World Cup 2023 Final India vs Australia Highlights Match Updates : ऑस्ट्रेलिया सहाव्यांदा विश्वविजेता ठरला आहे. त्याचवेळी भारताचे तिसऱ्यांदा ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न भंगले.

12:37 (IST) 19 Nov 2023
IND vs AUS Final: फायनल सामन्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी टीम इंडियाला दिल्या शुभेच्छा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय संघाला एकदिवसीय विश्वचषकाच्या फायनलसाटी शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधानांनी एक्सवर लिहिले, ‘१४० कोटी लोक तुमचा जयजयकार करत आहेत. ऑल द बेस्ट टीम इंडिया.’

12:30 (IST) 19 Nov 2023
IND vs AUS Final: माजी कर्णधार रिकी पाँटिंग आणि फिंच स्टेडियमवर पोहोचले

ऑस्ट्रेलियाचा विश्वविजेता कर्णधार रिकी पाँटिंग आणि अॅरॉन फिंच अहमदाबाद स्टेडियमवर पोहोचले आहेत. कांगारू संघाने पाँटिंगच्या नेतृत्वाखाली दोन वेळा विश्वचषक जिंकला आहे. जगातील महान कर्णधारांमध्ये पाँटिंगची गणना केली जाते.

12:28 (IST) 19 Nov 2023
IND vs AUS Final: टीम इंडिया स्टेडियमकडे रवाना

भारतीय संघ १२ वर्षांनंतर इतिहास रचण्यासाठी हॉटेलमधून स्टेडियमकडे रवाना झाला आहे. सर्व खेळाडू टीम हॉटेलमधून चार्टर्ड बसमध्ये बसून नरेंद्र मोदी स्टेडियमकडे रवाना झाले. आज भारतीय संघ २० वर्षापूर्वीचा बदला घेण्यासाठी सज्ज आहे.

12:24 (IST) 19 Nov 2023
IND vs AUS Final: श्रीनगरमध्ये भारतीय संघाच्या विजयासाठी करण्यात आली प्रार्थना

विश्वचषक फायनलमध्ये टीम इंडियाच्या विजयासाठी श्रीनगरमधील स्थानिक लोकांनी हजरत सय्यद याकूब साहीन यांच्या पवित्र दर्ग्यावर विशेष प्रार्थना केली. विश्वचषकाच्या अंतिम फेरीत भारतीय संघाचा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. हा सामना दुपारी २ वाजता सुरू होईल.

12:16 (IST) 19 Nov 2023
IND vs AUS Final: ‘अल्लाह ताला शमी को आज कामयाबी दे’, मोहम्मद शमीच्या आईने आपल्या मुलासाठी केली प्रार्थना

विश्वचषक फायनलसाठी मोहम्मद शमीच्या आईने आपल्या मुलासाठी प्रार्थना केली आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या की, ‘अल्लाह ताला शमी को आज कामयाबी दे’ . माझा मुलगा जग जिंकेल, असेही त्या म्हणाल्या. शमी या विश्वचषकात उत्कृष्ट गोलंदाजी करत आहे. उपांत्य फेरीत न्यूझीलंडविरुद्ध त्याने ७ विकेट्स घेतल्या होत्या. आज ही त्याच्याकडून अशाच कामगिरीची अपेक्षा आहे.

11:43 (IST) 19 Nov 2023
IND vs AUS सामन्यासाठी आशिष शेलार पोहोचले स्टेडिअममध्ये

11:35 (IST) 19 Nov 2023
रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोणही उपस्थित राहणार

10:28 (IST) 19 Nov 2023
सिद्धिविनायक मंदिरात भारताच्या विजयासाठी विशेष आरती

10:23 (IST) 19 Nov 2023
मोहम्मद शमीच्या गावी टीम इंडियासाठी प्रार्थना

भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या उत्तर प्रदेशातील अमरोहा येथील गावात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आयसीसी विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाच्या विजयासाठी प्रार्थना केली जात आहे.

09:54 (IST) 19 Nov 2023
“आज २००३ चा बदला घेणार”, स्टेडिअमबाहेर क्रिकेटप्रेमींचा विश्वास

https://x.com/ANI/status/1726088608166420866?s=20

09:52 (IST) 19 Nov 2023
अहमदाबादेतील नरेंद्र मोदी स्टेडिअमबाहेर भारतीयांचा जल्लोष

09:28 (IST) 19 Nov 2023
World Cup 2023 साठी गुगलकडून खास डुडल

गुगलने भारत आणि ऑस्ट्रेलियातील खेळाडूंना शुभेच्छा देत World Cup 2023 चे डुडल साकारले आहे. महत्त्वाचं म्हणजे हे डुडल GIF फॉर्माटमध्ये असून त्यातील अक्षरे बदलत आहेत.

09:20 (IST) 19 Nov 2023
भारतच जिंकेल अशी मला खात्री आहे – उर्वशी

08:26 (IST) 19 Nov 2023
IND vs AUS Final: माजी दिग्गजाने सांगितली ऑस्ट्रेलियाची सर्वात मोठी कमतरता

माजी दिग्गजाने सांगितली ऑस्ट्रेलियाची सर्वात मोठी कमतरता, टीम इंडिया फायनलमध्ये फायदा उचलणार का?

ऑस्ट्रेलियाच्या उणिवांबद्दल बोलताना इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू ग्रॅमी स्वान याने सीएनएन न्यूज 18 ला सांगितले की, “जेव्हा तुम्ही एखाद्या संघाकडून हरता, तेव्हा तुमच्या मनात भीती निर्माण होणे खूप साहजिक आहे. या संपूर्ण स्पर्धेत भारतीय संघात कोणतीही कमतरता राहिली नाही, परंतु फिरकीविरुद्ध ऑस्ट्रेलियाने स्पष्ट कमकुवतपणा दाखवला आहे.”

इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू पुढे म्हणाला की, “दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या शेवटच्या सामन्यातही ऑस्ट्रेलियन संघ वर्चस्व दाखवू शकला नाही. अवघ्या २१२ धावांचा पाठलाग करतानाही त्यांना दक्षिण आफ्रिकेने जवळपास गुंडाळले होते. ऑस्ट्रेलियन संघ अंतिम फेरीत पोहोचला आहे, पण भारतीय संघ वेगळ्या शैलीत अंतिम फेरीत पोहोचला आहे.”

08:24 (IST) 19 Nov 2023
IND vs AUS Final: विजयासाठी किती धावा ठरणार पुरेशा? आकडा आला समोर

पीच क्युरेटरनं व्यक्त केला अंदाज!

गुजरात क्रिकेट असोसिएशनमधील पीच क्युरेटरच्या हवाल्याने पीटीआयनं यासंदर्भात महत्त्वाची अपडेट दिली आहे. बीसीसीआयचे क्रिकेट व्यवस्थापक ज्याअर्थी त्या खेळपट्टीवर हेवी रोलर फिरवला जात असल्याच्या प्रक्रियेचं मूल्यांकन करत होते, त्याअर्थी तिथे तशाच स्वरुपाची खेळपट्टी असेल, असं त्यांनी नमूद केलं आहे.

“जर इथल्या काळ्या मातीच्या खेळपट्टीवर अवजड रोलर फिरवला जात असेल, तर त्याचा अर्थ संथ फलंदाजीच्या अनुषंगाने खेळपट्टी बनवली जात आहे. या खेळपट्टीवर तुम्ही मोठी धावसंख्या निश्चितच उभारू शकता, पण सातत्याने मोठे फटके खेळणं फलंदाजांसाठी जिकिरीचं ठरू शकेल. त्यामुळे दुसऱ्या डावात फलंदाजी करणाऱ्या संघासाठी धावसंख्येचा पाठलाग करणं अवघड होईल. याचा विचार करता पहिली फलंदाजी करण्यासाठी उतरणाऱ्या संघाला ३१५ धावा सामना जिंकण्यासाठी पुरेशा ठरतील”, असं या पीच क्युरेटरनं नमूद केल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे.

08:20 (IST) 19 Nov 2023
IND vs AUS Final: विश्वचषकाच्या अंतिम फेरीतील आतापर्यंत दोन्ही संघांची कामगिरी

विश्वचषकाच्या अंतिम फेरीतील दोन्ही संघांची कामगिरी –

भारतीय संघाबाबत बोलायचे झाले, तर तो चौथ्यांदा फायनलमध्ये पोहोचला आहे, त्यापैकी गेल्या तीन फायनलमध्ये हा संघ दोनदा चॅम्पियन बनला आहे. तसेच एकदा पराभूत झाला आहे. भारतीय संघ १९८३ मध्ये पहिल्यांदा फायनलमध्ये पोहोचला होता आणि चॅम्पियन बनला होता, तर दुसऱ्यांदा हा संघ २००३ मध्ये फायनलमध्ये पोहोचला होता, पण तिथे कांगारू टीमकडून पराभव पत्करावा लागला होता. यानंतर टीम इंडियाने २०११ मध्ये अंतिम फेरी गाठली आणि दुसऱ्यांदा चॅम्पियन होण्याचा मान मिळविला.

आता टीम इंडियाला तिसऱ्यांदा चॅम्पियन बनण्याची संधी आहे. ऑस्ट्रेलियन संघ आठव्यांदा फायनलमध्ये पोहोचला आहे. जर शेवटच्या ७ फायनलबद्दल बोलायचे, तर हा संघ ५ वेळा चॅम्पियन बनला आणि दोनदा उपविजेता ठरला आहे. कांगारू संघाने १९८७, १९९९, २००३, २००७, २०१५ मध्ये विश्वचषक जिंकला होता, तर या संघाला १९७५ आणि १९९६ मध्ये अंतिम फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले होते. कांगारू संघाला पुन्हा एकदा विक्रमी सहाव्यांदा वर्ल्ड चॅम्पियन बनण्याची संधी मिळाली आहे.

08:17 (IST) 19 Nov 2023
IND vs AUS Final: २० वर्षानंतर टीम इंडिया बदला घेण्यासाठी सज्ज!

एकदिवसीय विश्वचषकाच्या इतिहासात भारतीय संघ अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाशी भिडण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी २००३ मध्ये दोन्ही संघ आमनेसामने आले होते. त्या सामन्यात टीम इंडियाचा पराभव झाला होता. तेव्हा राहुल द्रविड त्या भारतीय संघाचा खेळाडू होता, आता २० वर्षानंतर राहुल द्रविड भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक आहे. भारतीय भूमीवर एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम फेरीत दोन्ही संघ विजेतेपदासाठी प्रथमच आमनेसामने येतील. ऑस्ट्रेलियाकडून त्या पराभवाचा बदला घेण्याची टीम इंडियाकडे आता चांगली संधी आहे. तसेच २० वर्षांनंतर टीम इंडियाकडे वर्ल्ड कप फायनलमध्ये कांगारू टीमला पराभूत करण्याची चांगली संधी आहे. २००३ मध्ये झालेल्या अंतिम सामन्यात भारतीय संघाचा ऑस्ट्रेलियाकडून १२५ धावांनी पराभव झाला होता.

08:13 (IST) 19 Nov 2023
IND vs AUS Final: भारताचा फायनलपर्यंतचा प्रवास

भारताचा फायनलपर्यंतचा प्रवास –

वि. ऑस्ट्रेलिया- ६ विकेट्सनी विजयी

वि. अफगाणिस्तान- ८ विके्ट्सनी विजयी

वि. पाकिस्तान- ७ विकेट्सनी विजयी

वि. बांगलादेश- ७ विकेट्सनी विजयी

वि. न्यूझीलंड- ४ विकेट्सनी विजयी

वि. इंग्लंड- १०० धावांनी विजयी

वि. श्रीलंका- ३०२ धावांनी विजयी

वि. दक्षिण आफ्रिका- २४३ धावांनी विजयी

वि. नेदरलँड्स- १६० धावांनी विजयी

वि. न्यूझीलंड- ७० धावांनी विजयी

08:12 (IST) 19 Nov 2023
IND vs AUS Final: ऑस्ट्रेलियाचा फायनलपर्यंतचा प्रवास

ऑस्ट्रेलियाचा फायनलपर्यंतचा प्रवास –

वि. भारत- ६ विकेट्सनी पराभूत

वि.दक्षिण आफ्रिका- १३४ धावांनी पराभूत

वि. श्रीलंका- ५ विकेट्सनी विजयी

वि. पाकिस्तान- ६२ धावांनी विजयी

वि. नेदरलँड्स- ३०९ धावांनी विजयी

वि. न्यूझीलंड- ५ धावांनी विजयी

वि. इंग्लंड- ३३ धावांनी विजयी

वि. अफगाणिस्तान- ३ विकेट्सनी विजयी

वि. बांगलादेश- ८ विकेट्सनी विजयी

वि. दक्षिण आफ्रिका- ३ विकेट्सनी विजयी

08:04 (IST) 19 Nov 2023
IND vs AUS Final: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील फायनल सामन्याला दुपारी दोन वाजता होणार सुरुवात

एकदिवसीय विश्वचषक २०२३ चा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार आहे. हा सामना आज दुपारी दोन वाजता सुरू होईल. तत्पूर्वी दुपारी १:३० वाजता दोन्ही कर्णधारांमध्ये नाणेफेक पार पडेल. यानंतर हा सामना जिंकून भारतीय संघाला तिसऱ्यांदा वनडे विश्वचषक जिंकण्याची इच्छा आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया सहाव्यांदा चॅम्पियन होण्याचा प्रयत्न करेल.

World Cup 2023 Final India vs Australia Highlights : ऑस्ट्रेलिया सहाव्यांदा विश्वविजेता ठरला आहे. त्याचवेळी भारताचे तिसऱ्यांदा ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न भंगले. या स्पर्धेत सलग १० सामने जिंकले होते, मात्र ११व्या आणि अंतिम सामन्यात संघ मागे पडला. भारताला दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या फायनलमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले आहे. या अगोदर रिकी पाँटिंगच्या नेतृत्वाखालील संघाने २००३ मध्ये भारताचा पराभव केला होता.