भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये चार सामन्यांचं बॉर्डर गावस्कर चषक सुरु आहे. भारताने दोन कसोटी सामने जिंकले आहेत. तर, इंदोरमध्ये खेळण्यात आलेला तिसरा कसोटी सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला आहे. शेवटचा सामना ९ मार्चला अहमदाबादमध्ये होणार आहे. अशातच ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज झ्ये रिचर्डसनला दुखापत झाल्याने संघातून बाहेर गेला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मिळालेल्या माहितीनुसार, झ्ये रिचर्डसन बिग बैश लीगदरम्यान (BBL) जखमी झाला होता. रिचर्डसनला हैमस्ट्रिंग ( मांडीच्या स्नायूंना दुखापत ) चा सामना करावा लागला. त्यानंतर रिचर्डसन BBL मध्ये खेळला नाही. पण, १७ मार्च पासून भारताविरोधात होणाऱ्या एकदिवशीय सामन्यासाठी ऑस्ट्रेलियन रिचर्डसनला संघात स्थान देण्यात आलं होतं. पण, अद्यापही रिचर्डसनची प्रकृती ठिक झाली नसल्याने त्याच्याजागी ऑस्ट्रेलियन नॅथन एलिसला संघात संधी देण्यात आली आहे.

हेही वाचा : चौथ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी पीएम मोदी राहणार उपस्थित, सोबत ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधानही असणार

तर, झ्ये रिचर्डसनची दुखापत मुंबई इंडियन्ससाठीही मोठा धक्का आहे. कारण, डिसेंबर महिन्यात झालेल्या लिलावात मुंबई इंडियन्सने रिचर्डसनला १.५० कोटी रुपयांना विकत घेतलं होतं. पण, रिचर्डसन बरा होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे रिचर्डसन आयपीएलमध्ये खेळण्याची शक्यता धूसर झाली आहे.

हेही वाचा : बॅटवर धोनीचं नाव लिहून झळकावले अर्धशतक, जाणून घ्या कोण आहे किरण नवगिरे?

दरम्यान, २०१७ साली रिचर्डसनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आहे. पण, २०१९ मध्ये खांद्याच्या दुखापतीमुळे तो बराच वेळ संघाबाहेर राहिला. रिचर्डसनने तिन्ही प्रकारच्या फॉरमॅटमध्ये ऑस्ट्रेलियन संघासाठी ३६ सामने खेळले असून, ५७ विकेट त्याच्या नावावर आहेत.