ICC Champions Trophy 2025 Semi-Final, India vs Australia Live Cricket Score: चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या उपांत्य फेरीतील पहिला सामना भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया या संघांमध्ये आज ४ मार्च रोजी खेळवला जात आहे. रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघ या स्पर्धेत अपराजित राहिला आहे. तर स्टीव्ह स्मिथच्या संघाने २ सामने जिंकले असून पावसामुळे दक्षिण आफ्रिकेविरूद्धचा सामना रद्द करण्यात आला होता. आपआपल्या गटातून उपांत्य फेरीसाठी हे दोन्ही संघ सर्वात आधी पात्र ठरले होते. ऑस्ट्रेलिया हा भारताचा आयसीसी स्पर्धांमधील कट्टर प्रतिस्पर्धी असून कांगारू संघाने भारताला मोठ्या सामन्यांमध्ये मात दिली आहे. त्यामुळे हा सामना भारतासाठी मोठा असणार आहे.
IND vs AUS Live: ट्रॅव्हिस हेड बाद
सुरूवातीच्या षटकांमध्ये धावा न काढलेल्या ट्रॅव्हिस हेडने मधल्या षटकांमध्ये मोठी फटकेबाजी केली आणि ३३ धावा केल्या. अखेर रोहितने वरूण चक्रवर्तीला गोलंदाजीला बोलावत त्याने ९व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर भारताला ट्रॅव्हिस हेडची मोठी विकेट मिळवून दिली. वरूणच्या गोलंदाजीवर गिलने सीमारेषेजवळ उत्कृष्ट झेल टिपला.
IND vs AUS Live: भारतीय संघ हातावर काळी पट्टी बांधून का उतरला आहे?
ट्रॅव्हिस हेडने मोहम्मद शमीच्या पाचव्या षटकात सलग तीन चौकार लगावत चौकारांची हॅटट्रिक लगावली आहे. ट्रॅव्हिस हेड ३ वेळा बाद होता होता वाचला, पहिल्या षटकात शमीकडून झेल सुटला, त्यानंतर जडेजाच्या थ्रोवर धावबाद होता होता वाचला, तर शमीच्या षटकात स्टंपला चेंडू लागता लागता वाचून चौकार गेला. यासह ऑस्ट्रेलियाने ५ षटकांत १ बाद ३१ धावा केल्या आहेत.
ऑस्ट्रेलियाचा नवा सलामीवीर कुपर कोनॉली मोहम्मद शमीच्या गोलंदाजीसमोर एकही धाव घेऊ शकला नाही आणि ९ चेंडूत खातेही न उघडता झेलबाद झाला. मोहम्मद शमीने योग्य लाईन आणि लेंग्थसह गोलंदाजी करत त्रास दिला. शेवटी कोनॉलीच्या बॅटची कड घेत चेंडू थेट विकेटच्या मागे गेला आणि केएल राहुलने एक कमालीचा झेल टिपला. यासह ऑस्ट्रेलियाने ४ धावांवर पहिली विकेट गमावली.
भारत-ऑस्ट्रेलिया सामन्याला सुरूवात झाली असून ऑस्ट्रेलियाकडून ट्रॅव्हिस हेड आणि नवा सलामीवीर कुपर कोनॉली ही जोडी उतरली आहे. तर भारताकडून मोहम्मद शमीने गोलंदाजीला सुरूवात केली. यासह पहिलाच चेंडू वाईड टाकला आणि त्यानंतर पहिल्याच चेंडूवर हेड झेलबाद होऊ शकला असता पण लगेच समोरच्या दिशेने मारलेला चेंडू शमीच्या हाताला लागून गेला पण जर झेल टिपला असता तर हेड पहिल्याच चेंडूवर बाद झाला असता.
नाणेफेकीनंतर आता सामन्यापूर्वी राष्ट्रगीतासाठी दोन्ही संघ मैदानात उतरले आहेत. ऑस्ट्रेलियाचे राष्ट्रगीत सुरूवातीला झाले, यानंतर भारताचे राष्ट्रगीत झाले.
भारताने प्लेईंग इलेव्हनमध्ये बदल न करता संघ ४ फिरकीपटूंसह मैदानात उतरणार आहे.
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, वरुण चक्रवर्ती, मोहम्मद शमी आणि कुलदीप यादव.
ऑस्ट्रेलियाच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये दोन बदल करण्यात आले आहेत. दुखापतग्रस्त मॅथ्यू शॉर्टच्या जागी कुपर कोनॉलीला संधी मिळाली आहे. तर स्पेन्सर जॉन्सनच्या जागी फिरकीपटू तन्वीर संघाला संधी देण्यात आली आहे. अशारितीने ऑस्ट्रेलिया संघात चार फिरकीपटू आहेत.
कूपर कॉनोली, ट्रॅव्हिस हेड, स्टीव्हन स्मिथ (कर्णधार), मार्नस लबुशेन, जोश इंग्लिस (यष्टीरक्षक), ॲलेक्स कॅरी, ग्लेन मॅक्सवेल, बेन ड्वार्शुइस, नॅथन एलिस, ॲडम झाम्पा, तन्वीर संघा
चॅम्पियन्स ट्रॉफी सामन्याची नाणेफेक ऑस्ट्रेलियाने जिंकली आहे आणि ऑस्ट्रेलिया संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर भारतीय संघ गोलंदाजीसाठी उतरणार आहे. ऑस्ट्रेलिया संघात दोन मोठे बदल करण्यात आले आहेत.
टीम इंडियाने दुबईच्या मैदानावर तीन सामने खेळले आहेत आणि तिन्ही सामने जिंकले. उपांत्य फेरीचा सामना कोणत्या खेळपट्टीवर होणार हा प्रश्न आहे. रिपोर्ट्सच्या मते हा सामना नव्या खेळपट्टीवर खेळवला जाणार आहे. मात्र, सामन्यात फिरकीपटूंनाच अधिक मदत मिळणार आहे.
ट्रॅव्हिस हेड भारतासाठी डोकेदुखी
ट्रॅव्हिस हेडची बॅट भारताविरूद्धच्या सर्व सामन्यांमध्ये कायमच तळपली आहे. त्यामुळे ट्रॅव्हिस हेड ही भारतासाठी मोठी डोकेदुखी असणार आहे.
IND vs AUS : टीम इंडियासमोर ट्रॅव्हिस हेडची डोकेदुखी; मोठी स्पर्धा-मोठे सामने-मोठी खेळी करणाऱ्या किमयागाराला कसं रोखणार?
चॅम्पियन्स ट्रॉफी उपांत्य फेरीतील भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन -
रोहित शर्मा, शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, वरुण चक्रवर्ती, मोहम्मद शमी आणि कुलदीप यादव.
ट्रॅव्हिस हेड, कूपर कोनॉली, स्टीव्ह स्मिथ, मार्नस लबुशेन, जोश इंग्लिस, ग्लेन मॅक्सवेल, ॲलेक्स कॅरी, बेन डुर्वाशुईस, तन्वीर संघा, स्पेन्सर जॉन्सन आणि नॅथन एलिस.
ऑस्ट्रेलियाने दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर आतापर्यंत ६ एकदिवसीय सामने खेळले आहेत. ज्यामधील ऑस्ट्रेलियाने ४ सामने जिंकले असून केवळ १ सामन्यात त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. २०१९ मध्ये ऑस्ट्रेलियाने दुबईत शेवटचा एकदिवसीय सामना खेळला होता.
आयसीसी एकदिवसीय स्पर्धेच्या हेड टू हेड रेकॉर्डबद्दल बोलायचे तर, दोन्ही संघांमध्ये १८ सामने खेळले गेले आहेत. यादरम्यान ऑस्ट्रेलियाने १० सामने जिंकले असून टीम इंडियाने ७ सामने जिंकले आहेत. तर एक सामना अनिर्णित राहिला.
IND vs AUS SF Live Score: भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या गट टप्प्यातील सर्व सामने जिंकले आहेत. या स्पर्धेतील पहिला सामना बांगलादेशविरुद्ध जिंकला होता. भारताने हा सामना ६ विकेटने जिंकला. यानंतर पाकिस्तान विरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात टीम इंडियाने ६ विकेट्सने विजय मिळवला. तर न्यूझीलंड संघावर फिरकी गोलंदाजीच्या जोरावर भारताने ४४ धावांनी सामना जिंकला.
भारत वि. ऑस्ट्रेलिया
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये टीम इंडिया आपला सेमीफायनल सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार आहे. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होत आहे. हा सामना २.३० वाजता सुरू होईल तर २ वाजता नाणेफेक होईल.
IND vs AUS ICC Champions Trophy 2025 Semi-Final Match Live Updates: भारत वि. ऑस्ट्रेलिया यांच्यात चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मधील पहिला उपांत्य सामना खेळवला जात आहे. या सामन्यात जिंकणारा संघ अंतिम फेरीत प्रवेश करेल.