World Cup 2023, India vs Australia Highlights Score Today: एकदिवसीय विश्वचषक २०२३ मध्ये भारताचा पहिला सामना ऑस्ट्रेलियाशी सुरु आहे. दोन्ही संघांना त्यांच्या विश्वचषक मोहिमेची सुरुवात विजयाने केली. चेन्नईच्या मैदानात फिरकी गोलंदाजांना मदत मिळते, तसच काहीसं आजच्या सामन्यात झालं. भारताच्या गोलंदाजीने ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना मोठी धावसंख्या करण्यापासून रोखले. टीम इंडियाच्या फिरकी तिकडीपुढे कांगारू अक्षरशः ढेपाळले. वन डे विश्वचषक २०२३ स्पर्धेत रविवारी (८ऑक्टोबर) भारत आणि ऑस्ट्रेलिया या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, भारतीय गोलंदाजांनी त्यांचा हा निर्णय चुकीचा ठरवत शानदार कामगिरी केली. ऑस्ट्रेलियाचा डाव १९९ धावांवर सीमित राहिला. भारताने हा सामना सहा गडी राखून जिंकला.
भारताने ऑस्ट्रेलियाचा सहा गडी राखून पराभव करत विश्वचषक स्पर्धेतील विजयी सुरुवात केली. या सामन्यात भारताच्या विजयाचे नायक लोकेश राहुल आणि विराट कोहली होते. मात्र, दोन्ही फलंदाजांचे शतक हुकले. राहुलने ९७ धावांची नाबाद खेळी तर कोहलीने ८५ धावांची खेळी खेळली. या दोघांशिवाय फक्त हार्दिक पांड्याला खाते उघडता आले. त्याने ११ धावा केल्या. ऑस्ट्रेलियातर्फे जोश हेझलवूडने तीन आणि मिचेल स्टार्कने एक विकेट घेतली. ऑस्ट्रेलियाकडून स्टीव्ह स्मिथने सर्वाधिक ४६ धावा केल्या. वॉर्नरनेही ४१ धावांची खेळी खेळली. अखेरीस स्टार्कने २८ धावांचे योगदान दिले. भारताकडून रवींद्र जडेजाने तीन विकेट घेतल्या. कुलदीप यादव आणि जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. सिराज, हार्दिक आणि अश्विनने प्रत्येकी एक विकेट घेतली. या सामन्यातील विजयासह भारताने दोन महत्त्वाचे गुण मिळवले आहेत. टीम इंडिया पॉइंट टेबलमध्ये पाचव्या स्थानावर आली आहे. भारताचा पुढील सामना ११ ऑक्टोबरला अफगाणिस्तानशी होणार आहे.
ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बुमराहने आपल्या दुसऱ्याच षटकात मिचेल मार्शला बाद केले. त्याला खातेही उघडता आले नाही. यानंतर स्मिथ आणि वॉर्नरने ६९ धावांची भागीदारी करत ऑस्ट्रेलियाचा डाव सांभाळला, मात्र कुलदीपने वॉर्नरला बाद करून ही भागीदारी मोडीत काढली. वॉर्नरने ४१ धावा केल्या. स्मिथ आणि लाबुशेनने ३६ धावांची भर घातली, पण जडेजाने स्मिथला ४६ आणि लाबुशेनला २७ धावांवर बाद केले. त्यांनी अॅलेक्स कॅरीला खातेही उघडू दिले नाही आणि ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ ११९ धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला. १५ धावांच्या वैयक्तिक स्कोअरवर कुलदीपने मॅक्सवेलला बोल्ड केले. लवकरच ग्रीनही आठ धावांवर अश्विनचा बळी ठरला. कमिन्स १५ धावा करून बाद झाला तर झाम्पा सहा धावा करून बाद झाला. अखेरीस मिचेल स्टार्कने २८ धावा करत संघाची धावसंख्या १९९ धावांपर्यंत नेली. भारताकडून रवींद्र जडेजाने तीन विकेट घेतल्या. कुलदीप यादव आणि जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. सिराज, हार्दिक आणि अश्विनने प्रत्येकी एक विकेट घेतली.
मात्र, ऑस्ट्रेलियाचा चेन्नईतील रेकॉर्ड उत्कृष्ट असून विश्वचषकात ऑस्ट्रेलियाला पराभूत करणे सोपे जाणार नाही. विश्वचषक २०२३ ही स्पर्धा जिंकून भारताचा दशकभराचा आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न असेल. अशा स्थितीत कर्णधार रोहित शर्माने स्पष्ट केले आहे की, कोणत्याही खेळाडूची वैयक्तिक पसंती असू नये. फक्त संघ महत्त्वाचा आणि संघाचे ध्येय महत्त्वाचे.
IND vs AUS Cricket World Cup 2023 Highlights Score In Marathi: विश्वचषक २०२३ भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया हायलाईट्स अपडेट्स
ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलियन संघ भारताविरुद्ध ४९.३ षटकांत १९९ धावांत गारद झाला. विराट कोहली आणि के.एल. राहुल यांनी शानदार खेळी करत टीम इंडियाला विजय मिळवून दिला. भारताने ऑस्ट्रेलियावर सहा गडी राखून दणदणीत विजय मिळवला.
भारत २०१-४
विराट कोहली ११६ चेंडूत ८५ धावा करून बाद झाला. जोश हेझलवूडने त्याला मार्नस लॅबुशेनकरवी झेलबाद केले. कोहलीने आपल्या डावात सहा चौकार लगावले आणि राहुलसोबत १६५ धावांची भागीदारी केली. मात्र, तो सामना पूर्ण करू शकला नाही आणि त्याचे शतकही हुकले, पण टीम इंडियाला विजयाच्या उंबरठ्यावर नेऊन तो बाद झाला. आता भारताला विजयासाठी फक्त ३३ धावांची गरज आहे. राहुलबरोबर हार्दिक क्रिजवर आहे.
भारत १७३-४
भारताच्या धावसंख्येने तीन विकेट गमावून १५० धावा केल्या आहेत. विराट आणि राहुल यांच्यातील उत्कृष्ट भागीदारीने टीम इंडियाला विजयाच्या उंबरठ्यावर नेले आहे. दोघांची भागीदारीही दीडशे धावांवर पोहोचली आहे. कोहली त्याच्या शतकाच्या जवळ जात आहे.
भारत १६५-३
विराट कोहली आणि लोकेश राहुलच्या शानदार भागीदारीमुळे या सामन्यात भारताची पकड मजबूत झाली आहे. २०० धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाने दोन धावांत तीन विकेट्स गमावल्या. त्यानंतर या दोघांनी भारताची धावसंख्या १४० धावांपर्यंत पोहोचवली. आता दोघेही सहज धावा काढत असून सामन्यावर भारताची पकड मजबूत झाली आहे.
भारत १४०-३
विराट कोहली आणि लोकेश राहुल यांच्यात शतकी भागीदारी झाली आहे. या दोघांनी १४६ चेंडूत १०० धावा जोडून टीम इंडियाचे सामन्यात पुनरागमन केले. विराट पाठोपाठ के.एल. राहुलनेही दमदार अर्धशतक झळकावले आहे. भारतीय संघ सध्या मजबूत स्थितीत आहे.
भारत ११७-३
A crucial partnership in the works ??
— BCCI (@BCCI) October 8, 2023
Virat Kohli ? KL Rahul#TeamIndia 87/3 after 22 overs.
Follow the Match ▶️ https://t.co/ToKaGif9ri#CWC23 | #INDvAUS | #TeamIndia | #MeninBlue pic.twitter.com/oiBeA5lFRn
विराट कोहलीने ७५ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले आहे. हे त्याचे वन डेतील ६७वे अर्धशतक आहे. १२ धावांवर त्याला जीवदान मिळाले होते, तेव्हापासून तो अत्यंत सावधपणे खेळला आहे आणि सहज धावा काढत आहे. के.एल. राहुल देखील त्याच्या अर्धशतकानजीक पोहचला आहे.
भारत १००-३
FIFTY for King Kohli! ?
— BCCI (@BCCI) October 8, 2023
A quality half-century in the chase as the ? comes up for #TeamIndia!
Follow the Match ▶️ https://t.co/ToKaGif9ri#CWC23 | #INDvAUS | #TeamIndia | #MeninBlue pic.twitter.com/jaIta4J5JR
विराट कोहली आणि लोकेश राहुल हे दोघेही अर्धशतकाजवळ पोहचले आहेत. दोघांनी अतिशय संयमित खेळी खेळली असून आता सहज धावा काढत आहेत. दोघांची भागीदारी १००च्या जवळ जात असून सामन्यातील भारताची पकड मजबूत होत आहे.
भारत ९७-३
दोन धावांत तीन विकेट्स पडल्यानंतर कोहली आणि राहुलने भारताचा डाव सावरला आहे. भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली आणि के.एल. राहुल यांच्यात अर्धशतकी भागीदारी झाली असून सध्या दोन्ही खेळाडू ऑस्ट्रेलियाच्या जबरदस्त गोलंदाजीपुढे तंबू ठोकून उभे आहेत.
भारत ५६-३
दोन धावांत तीन विकेट्स पडल्यानंतर कोहली आणि राहुलने भारताचा डाव सांभाळला. या दोघांनी मिळून टीम इंडियाची धावसंख्या ३० धावांच्या पुढे नेली आहे. १२ षटकांनंतर भारताची धावसंख्या तीन गड्यांच्या मोबदल्यात ३५ धावा आहे.
भारत ३५-३
१२ धावांवर विराट कोहलीला जीवदान मिळाले. जोश हेजलवूडच्या चेंडूवर कोहलीने पुल शॉट खेळण्याचा प्रयत्न केला आणि चेंडू हवेत गेला. मिचेल मार्श झेल घ्यायला गेला, पण अॅलेक्स कॅरी आणि त्याच्यात गोंधळ झाला आणि त्याने झेल सोडला. अशाप्रकारे विराट क्रीजवर कायम आहे. लोकेश राहुल त्याच्यासोबत आहे.
भारत २१-३
दोन धावांच्या स्कोअरवर भारताने तीन विकेट गमावल्या आहेत. भारताचे तीन महत्त्वाचे फलंदाज खाते न उघडताच बाद झाले आहेत. इशान आणि रोहितनंतर श्रेयस अय्यरही खाते न उघडताच बाद झाला. श्रेयसने डेव्हिड वॉर्नरच्या हाती जोश हेझलवूडकरवी झेलबाद केले. २०० धावांचा पाठलाग करताना टीम इंडिया अडचणीत आली आहे.
या सामन्यात भारताचे पहिले तीन फलंदाज खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतले. भारताच्या पहिल्या चार फलंदाजांपैकी तीन फलंदाजांना वन डे सामन्यात एकही धाव करता आली नसल्याची ही पहिलीच वेळ आहे.
Three ducks to start India's chase! ?#CWC23 pic.twitter.com/dK6U2NWvzH
— cricket.com.au (@cricketcomau) October 8, 2023
ऑस्ट्रेलियाने पलटवार करत टीम इंडियाला अडचणीत आणले आहे. दोन धावांत भारताने तीन
विकेट्स गमावल्या आहेत. भारताचे तीन महत्त्वाचे फलंदाज खाते न उघडताच बाद झाले आहेत. इशान आणि रोहितनंतर श्रेयस अय्यरही खाते न उघडताच बाद झाला. श्रेयसने डेव्हिड वॉर्नरच्या हाती जोश हेझलवूडकरवी झेलबाद केले. भारताला मोठ्या भागीदारीची गरज आहे.
भारत २-३
CWC2023. WICKET! 1.6: Shreyas Iyer 0(3) ct David Warner b Josh Hazlewood, India 2/3 https://t.co/ToKaGif9ri #INDvAUS #CWC23
— BCCI (@BCCI) October 8, 2023
ऑस्ट्रेलियाने ठेवलेल्या २०० धावांच्या माफक लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचे दोन्ही सलामीवीर तंबूत परतले आहेत. इशान किशन पाठोपाठ रोहित शर्माही खाते न उघडता तंबूत परतला आहे. जोश हेझलवूडने त्याला पायचीत केले.
भारत २-२
CWC2023. WICKET! 1.3: Rohit Sharma 0(6) lbw Josh Hazlewood, India 2/2 https://t.co/ToKaGif9ri #INDvAUS #CWC23
— BCCI (@BCCI) October 8, 2023
ऑस्ट्रेलियाने ठेवलेल्या २०० धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाची फलंदाजी सुरू झाली आहे. इशान किशनने रोहित शर्माबरोबर डावाची सुरुवात केली. ऑस्ट्रेलियासाठी मिचेल स्टार्कने पहिले षटक टाकले. मात्र, खराब फटका खेळून इशान किशन बाद झाला. स्टार्कने त्याला कॅमेरून ग्रीनकडे झेलबाद केले.
भारत २-१
CWC2023. WICKET! 0.4: Ishan Kishan 0(1) ct Cameron Green b Mitchell Starc, India 2/1 https://t.co/ToKaGif9ri #INDvAUS #CWC23
— BCCI (@BCCI) October 8, 2023
ऑस्ट्रेलियन संघ भारताविरुद्ध ४९.३ षटकांत १९९ धावांत गारद झाला. हा सामना जिंकण्यासाठी भारताला ३०० चेंडूत केवळ २०० धावा करायच्या आहेत. मात्र, खेळपट्टीवर फलंदाजी करणे सोपे नाही. अशा स्थितीत भारताला थोडी सावधगिरी बाळगावी लागेल. या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून स्टीव्ह स्मिथने सर्वाधिक ४६ धावा केल्या. वॉर्नरनेही ४१ धावांची खेळी खेळली. अखेरीस स्टार्कने २८ धावांचे योगदान दिले. भारताकडून रवींद्र जडेजाने तीन विकेट्स घेतल्या. कुलदीप यादव आणि जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. सिराज, हार्दिक आणि अश्विनने प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.
Innings break!
— BCCI (@BCCI) October 8, 2023
Australia are all out for 199 courtesy of a solid bowling performance from #TeamIndia ??
Ravindra Jadeja the pick of the bowlers with figures of 3/28 ??
Scorecard ▶️ https://t.co/ToKaGif9ri#CWC23 | #INDvAUS | #MeninBlue pic.twitter.com/TSf9WN4Bkz
१८९ धावांच्या स्कोअरवर ऑस्ट्रेलियाची नववी विकेट पडली. हार्दिक पांड्याने अॅडम झाम्पाला विराट कोहलीने झेलबाद केले. झाम्पाने २० चेंडूत ६ धावा केल्या. आता हेजलवूड स्टार्कबरोबर क्रीजवर आहे. ४९ षटकांनंतर ऑस्ट्रेलियाची धावसंख्या नऊ गड्यांच्या मोबदल्यात १९५ धावा आहे.
ऑस्ट्रेलिया १९५-९
ऑस्ट्रेलियाचा विकेट पडण्याचा सिलसिला सुरूच असून भारतीय संघाने सामन्यावर उत्तम पकड मिळवली आहे. भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहने ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सला बाद केले आहे. कमिन्सने २४ चेंडूत १ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने १५ धावा केल्या. आता अॅडम झाम्पा स्टार्कसोबत क्रीजवर आहे.
ऑस्ट्रेलिया १६८-८
Number 8⃣?
— BCCI (@BCCI) October 8, 2023
Jasprit Bumrah with his second breakthrough and Shreyas Iyer with the catch ?
Follow the Match ▶️ https://t.co/ToKaGif9ri#CWC23 | #INDvAUS | #TeamIndia | #MeninBlue pic.twitter.com/o10zumlxqO
ऑस्ट्रेलियानेही १४० धावांवर सातवी विकेट गमावली आहे. रविचंद्रन अश्विनने कॅमेरून ग्रीनला हार्दिक पांड्याकरवी झेलबाद केले. ग्रीनने २० चेंडूत ८ धावा केल्या. आता मिचेल स्टार्क कर्णधार पॅट कमिन्सबरोबर क्रीजवर आहे. त्यामुळे आता कांगारूंना मोठ्या भागीदारीची गरज आहे. भारतीय संघाने सामन्यावर मजबूत पकड बनवली आहे.
ऑस्ट्रेलिया १४२-७
In the air and taken ?
— BCCI (@BCCI) October 8, 2023
Ashwin picks up his first wicket to dismiss Cameron Green ??
Follow the Match ▶️ https://t.co/ToKaGif9ri#CWC23 | #INDvAUS | #TeamIndia | #MeninBlue pic.twitter.com/vDHK6U0jJx
१४० धावांवर ऑस्ट्रेलियाची सहावी विकेट पडली. ग्लेन मॅक्सवेल २५ चेंडूत १५ धावा करून बाद झाला. कुलदीप यादवने त्याला क्लीन बोल्ड केले. त्यामुळे ऑसी संघाची जी शेवटची आशा होती ती सुद्धा मावळली.
ऑस्ट्रेलिया १४०-६
Cleaned ?
— BCCI (@BCCI) October 8, 2023
Kuldeep Yadav knocks over the leg-stump as Glenn Maxwell departs!
Australia 6⃣ down after 36 overs.
Follow the Match ▶️ https://t.co/ToKaGif9ri#CWC23 | #INDvAUS | #TeamIndia | #MeninBlue pic.twitter.com/zAns4he9sl
ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ ११९ धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. रवींद्र जडेजाने तीन चेंडूत दोन विकेट घेतल्या आहेत. स्टीव्ह स्मिथनंतर त्याने पुढच्याच षटकात लाबुशेनला बाद केले आणि अवघ्या दोन चेंडूंनंतर अॅलेक्स कॅरीला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. कॅरीला खातेही उघडता आले नाही. तो विकेट्ससमोर यष्टिचीत (LBW) झाला. आता कॅमेरून ग्रीन ग्लेन मॅक्सवेलला साथ देण्यासाठी क्रीजवर आला आहे.
ऑस्ट्रेलिया ११९-५
And now the wicket of Alex Carey who is out L.B.W ☝️
— BCCI (@BCCI) October 8, 2023
Ravindra Jadeja gets his third wicket ?#CWC23 | #INDvAUS | #TeamIndia | #MeninBlue https://t.co/sENFdrH6Jm
स्टीव्ह स्मिथपाठोपाठ रवींद्र जडेजानेही मार्नस लाबुशेनला बाद केले आहे. लाबुशेनने ४१ चेंडूत २७ धावा केल्या. त्याच्या बॅटमधून फक्त एक चौकार आला. लोकेश राहुलने त्याला विकेटच्या मागे झेलबाद केले. ऑस्ट्रेलियाची धावसंख्या चार विकेट्सच्या मोबदल्यात ११९ धावा अशी झाली आहे. मॅक्सवेलला साथ देण्यासाठी अॅलेक्स कॅरी क्रीजवर आला आहे.
ऑस्ट्रेलिया ११९-४
Two big wickets in quick succession, courtesy of Ravindra Jadeja ?
— BCCI (@BCCI) October 8, 2023
Follow the Match ▶️ https://t.co/ToKaGif9ri#CWC23 | #INDvAUS | #TeamIndia | #MeninBlue pic.twitter.com/9ySvtLIPxH
११० धावांवर ऑस्ट्रेलियाची तिसरी विकेट पडली. रवींद्र जडेजाने स्टीव्ह स्मिथला क्लीन बोल्ड केले. स्मिथने ७१ चेंडूत ४६ धावा केल्या. त्याचे अर्धशतक हुकले. आता ग्लेन मॅक्सवेल मार्नस लाबुशेनसह क्रीजवर आहे. २८ षटकांनंतर ऑस्ट्रेलियाची धावसंख्या ११२/३ आहे.
ऑस्ट्रेलिया ११६-३
TIMBER! ?
— BCCI (@BCCI) October 8, 2023
Ravindra Jadeja with a beauty of a delivery to dismiss Steve Smith ??
Follow the Match ▶️ https://t.co/ToKaGif9ri#CWC23 | #INDvAUS | #TeamIndia | #MeninBlue pic.twitter.com/jY11lsLxVj
दोन गडी गमावून ऑस्ट्रेलियाच्या धावसंख्येने १०० धावांचा टप्पा ओलांडला आहे. स्टीव्ह स्मिथ आणि मार्नस लाबुशेन क्रीजवर आहेत. दोघेही चांगली फलंदाजी करत ऑस्ट्रेलियाला मोठ्या धावसंख्येकडे घेऊन जात आहेत. दोघांमध्ये चांगली भागीदारी आहे. स्टीव्ह स्मिथ त्याच्या अर्धशतकाच्या जवळ आहे. २७ षटकांनंतर भारताची धावसंख्या ११०/२ आहे.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना सुरू असताना टीम इंडियाची जर्सी घालून एक चाहता दोनवेळा थेट मैदानात घुसला आणि सुरक्षा रक्षकांची तारांबळ उडाली. 'जार्व्हो ६९' या नावाने ओळखला जाणारा हा चाहता जेव्हा मैदानावर आला तेव्हा त्याने विराट कोहलीची भेट घेतली, त्यानंतर तो लोकेश राहुलकडे गेला, टीम इंडियाच्या या यष्टिरक्षकाने त्याला बाहेरचा रस्ता दाखवला. दरम्यान अंपायर्सने देखील मध्यस्थी केली.
ऑस्ट्रेलिया ९८-२
Jarvo 69 is back, Last time when he invaded the field, Rohit Sharma scored match winning hundred? pic.twitter.com/z6yYQi7AqG
— David. (@CricketFreakD3) October 8, 2023
डावखुरा फिरकी गोलंदाज कुलदीप यादवने भारताला दुसरे यश मिळवून दिले. त्याने १७व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरला बाद केले. वॉर्नरने ५२ चेंडूत ४१ धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत सहा चौकार मारले. बाद होण्यापूर्वी वॉर्नरने स्टीव्ह स्मिथसोबत दुसऱ्या विकेटसाठी ६९ धावांची भागीदारी केली. ऑस्ट्रेलियाने १७ षटकात २ बाद ७४ धावा केल्या आहेत. स्टीव्ह स्मिथ ३३ धावांवर नाबाद आहे.
ऑस्ट्रेलिया ७७-२
Caught and bowled! ?
— BCCI (@BCCI) October 8, 2023
Kuldeep Yadav breaks the partnership ?
David Warner departs for 41.
Follow the Match ▶️ https://t.co/ToKaGif9ri#CWC23 | #INDvAUS | #TeamIndia | #MeninBlue pic.twitter.com/rMXDAzkqko
डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्ह स्मिथ यांच्यात अर्धशतकी भागीदारी झाली आहे. दोघेही चांगली फलंदाजी करत आहेत आणि ऑस्ट्रेलियाला चांगल्या धावसंख्येकडे घेऊन जात आहेत. १४ षटकांनंतर ऑस्ट्रेलियाची धावसंख्या ६६/१ आहे.
ऑस्ट्रेलियाच्या धावसंख्येने एक विकेट गमावत ५० धावा ओलांडल्या आहेत. डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्ह स्मिथ क्रीजवर आहेत. दोघांमध्ये चांगली भागीदारी झाली आहे. या दोघांनाही मोठी खेळी खेळून ऑस्ट्रेलियाला चांगल्या धावसंख्येपर्यंत नेण्याची इच्छा आहे.
ऑस्ट्रेलिया ६३-१
प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने पॉवरप्लेमध्ये एक गडी गमावून ४३ धावा केल्या. मिचेल मार्श लवकर बाद झाल्यानंतर स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नरने डावाची धुरा सांभाळली. दोघेही चांगली फलंदाजी करत आहेत.
ऑस्ट्रेलिया ४३-१
भारतीय वेगवान गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियन फलंदाजांवर दडपण आणले आहे. मिचेल मार्शला शून्यावर बाद केल्यानंतर बुमराह आणि सिराजच्या जोडीने स्मिथ आणि वॉर्नरला बरोबरीत रोखले आहे. सहा षटकांनंतर ऑस्ट्रेलियाची धावसंख्या एका विकेटवर १६ धावा अशी होती.
ऑस्ट्रेलिया ३५-१
एकदिवसीय विश्वचषकात क्षेत्ररक्षक म्हणून विराट कोहलीच्या नावावर भारताकडून सर्वाधिक झेल घेण्याचा विक्रम केला आहे. मिचेल मार्शचा झेल घेत त्याने २८२ सामन्यात भारतासाठी १४६ झेल घेतले आहेत.
ऑस्ट्रेलिया १६-१
Milestone Unlocked! ?
— BCCI (@BCCI) October 8, 2023
Virat Kohli now has most catches for India in ODI World Cups as a fielder ?#CWC23 | #INDvAUS | #TeamIndia | #MeninBlue pic.twitter.com/HlLTDqo7iZ

भारताने ऑस्ट्रेलियाचा सहा गडी राखून पराभव करत विश्वचषक स्पर्धेतील विजयी सुरुवात केली. या सामन्यात भारताच्या विजयाचे नायक लोकेश राहुल आणि विराट कोहली होते. मात्र, दोन्ही फलंदाजांचे शतक हुकले. राहुलने ९७ धावांची नाबाद खेळी तर कोहलीने ८५ धावांची खेळी खेळली.