World Cup 2023, India vs Australia Highlights Score Today: एकदिवसीय विश्वचषक २०२३ मध्ये भारताचा पहिला सामना ऑस्ट्रेलियाशी सुरु आहे. दोन्ही संघांना त्यांच्या विश्वचषक मोहिमेची सुरुवात विजयाने केली. चेन्नईच्या मैदानात फिरकी गोलंदाजांना मदत मिळते, तसच काहीसं आजच्या सामन्यात झालं. भारताच्या गोलंदाजीने ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना मोठी धावसंख्या करण्यापासून रोखले. टीम इंडियाच्या फिरकी तिकडीपुढे कांगारू अक्षरशः ढेपाळले. वन डे विश्वचषक २०२३ स्पर्धेत रविवारी (८ऑक्टोबर) भारत आणि ऑस्ट्रेलिया या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, भारतीय गोलंदाजांनी त्यांचा हा निर्णय चुकीचा ठरवत शानदार कामगिरी केली. ऑस्ट्रेलियाचा डाव १९९ धावांवर सीमित राहिला. भारताने हा सामना सहा गडी राखून जिंकला.
भारताने ऑस्ट्रेलियाचा सहा गडी राखून पराभव करत विश्वचषक स्पर्धेतील विजयी सुरुवात केली. या सामन्यात भारताच्या विजयाचे नायक लोकेश राहुल आणि विराट कोहली होते. मात्र, दोन्ही फलंदाजांचे शतक हुकले. राहुलने ९७ धावांची नाबाद खेळी तर कोहलीने ८५ धावांची खेळी खेळली. या दोघांशिवाय फक्त हार्दिक पांड्याला खाते उघडता आले. त्याने ११ धावा केल्या. ऑस्ट्रेलियातर्फे जोश हेझलवूडने तीन आणि मिचेल स्टार्कने एक विकेट घेतली. ऑस्ट्रेलियाकडून स्टीव्ह स्मिथने सर्वाधिक ४६ धावा केल्या. वॉर्नरनेही ४१ धावांची खेळी खेळली. अखेरीस स्टार्कने २८ धावांचे योगदान दिले. भारताकडून रवींद्र जडेजाने तीन विकेट घेतल्या. कुलदीप यादव आणि जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. सिराज, हार्दिक आणि अश्विनने प्रत्येकी एक विकेट घेतली. या सामन्यातील विजयासह भारताने दोन महत्त्वाचे गुण मिळवले आहेत. टीम इंडिया पॉइंट टेबलमध्ये पाचव्या स्थानावर आली आहे. भारताचा पुढील सामना ११ ऑक्टोबरला अफगाणिस्तानशी होणार आहे.
ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बुमराहने आपल्या दुसऱ्याच षटकात मिचेल मार्शला बाद केले. त्याला खातेही उघडता आले नाही. यानंतर स्मिथ आणि वॉर्नरने ६९ धावांची भागीदारी करत ऑस्ट्रेलियाचा डाव सांभाळला, मात्र कुलदीपने वॉर्नरला बाद करून ही भागीदारी मोडीत काढली. वॉर्नरने ४१ धावा केल्या. स्मिथ आणि लाबुशेनने ३६ धावांची भर घातली, पण जडेजाने स्मिथला ४६ आणि लाबुशेनला २७ धावांवर बाद केले. त्यांनी अॅलेक्स कॅरीला खातेही उघडू दिले नाही आणि ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ ११९ धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला. १५ धावांच्या वैयक्तिक स्कोअरवर कुलदीपने मॅक्सवेलला बोल्ड केले. लवकरच ग्रीनही आठ धावांवर अश्विनचा बळी ठरला. कमिन्स १५ धावा करून बाद झाला तर झाम्पा सहा धावा करून बाद झाला. अखेरीस मिचेल स्टार्कने २८ धावा करत संघाची धावसंख्या १९९ धावांपर्यंत नेली. भारताकडून रवींद्र जडेजाने तीन विकेट घेतल्या. कुलदीप यादव आणि जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. सिराज, हार्दिक आणि अश्विनने प्रत्येकी एक विकेट घेतली.
मात्र, ऑस्ट्रेलियाचा चेन्नईतील रेकॉर्ड उत्कृष्ट असून विश्वचषकात ऑस्ट्रेलियाला पराभूत करणे सोपे जाणार नाही. विश्वचषक २०२३ ही स्पर्धा जिंकून भारताचा दशकभराचा आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न असेल. अशा स्थितीत कर्णधार रोहित शर्माने स्पष्ट केले आहे की, कोणत्याही खेळाडूची वैयक्तिक पसंती असू नये. फक्त संघ महत्त्वाचा आणि संघाचे ध्येय महत्त्वाचे.
IND vs AUS Cricket World Cup 2023 Highlights Score In Marathi: विश्वचषक २०२३ भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया हायलाईट्स अपडेट्स
५ धावांवर ऑस्ट्रेलियन संघाची पहिली विकेट पडली. जसप्रीत बुमराहने मिचेल मार्शला विराट कोहलीकरवी झेलबाद केले. मार्शने ६ चेंडूंचा सामना केला, पण त्याला खातेही उघडता आले नाही. आता स्टीव्ह स्मिथ वॉर्नरसोबत क्रीजवर आहे. भारताने चांगली सुरुवात केली आहे.
ऑस्ट्रेलिया १५-१
BOOM! ?
— BCCI (@BCCI) October 8, 2023
Jasprit Bumrah gets Mitchell Marsh! ?
Virat Kohli takes a sharp catch diving to his left ??
Follow the Match ▶️ https://t.co/ToKaGif9ri#CWC23 | #INDvAUS | #TeamIndia | #MeninBlue pic.twitter.com/gK7lg3RoYQ
एकदिवसीय विश्वचषक २०२३ मध्ये भारताचा पहिला सामना ऑस्ट्रेलियाशी आहे. दोन्ही संघांना त्यांच्या विश्वचषक मोहिमेची सुरुवात विजयाने करायची आहे. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रगीता दरम्यान भारतीय खेळाडू भावूक झाले. रोहित शर्मा, हार्दिक पांड्या यांच्या डोळ्यात पाणी आले.
That's how 2 faces carrying hopes of 1.4 billion looks like pic.twitter.com/COEZp3MGbQ
— David. (@CricketFreakD3) October 8, 2023
ऑस्ट्रेलिया: डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्हन स्मिथ, मार्नस लॅबुशेन, कॅमेरॉन ग्रीन, अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), ग्लेन मॅक्सवेल, पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, जोश हेझलवूड, अॅडम झाम्पा.
भारत: रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, के.एल. राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
CWC 2023. INDIA XI: R Sharma(c), I Kishan, V Kohli, S Iyer, KL Rahul(WK), H Pandya, R Jadeja, R Ashwin, K Yadav, M Siraj, J Bumrah. https://t.co/ToKaGif9ri #INDvAUS #CWC23
— BCCI (@BCCI) October 8, 2023
चेन्नईची खेळपट्टी कोरडी असल्याने येथे फिरकी गोलंदाजांना मोठी मदत होईल. रवी शास्त्री आणि हरभजन सिंग यांच्या मते, भारतीय कर्णधाराला तीन फिरकी गोलंदाजांसह जायला आवडेल. त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया झम्पासोबत आणखी एका फिरकी गोलंदाजालाही संधी देऊ शकते. मोहम्मद शमीला भारतीय संघात खेळणे कठीण आहे.
Take a look at #TeamIndia's Playing XI against Australia ??
— BCCI (@BCCI) October 8, 2023
Follow the Match ▶️ https://t.co/ToKaGif9ri#CWC23 | #INDvAUS | #MeninBlue pic.twitter.com/PDcGkolGz3
प्रथम फलंदाजीसाठी पोषक असलेल्या चेन्नईच्या चेपॉक मैदानवर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भारतीय संघ किती लवकर कांगारूंना बाद करतो हे पाहणे उत्सुकतेचे असणार आहे. शुबमन गिल भारताकडून हा सामना खेळत नाही. त्याच्या जागी इशान किशनचा संघात समावेश करण्यात आला आहे.
CWC 2023. Australia won the toss and elected to bat. https://t.co/ToKaGif9ri #INDvAUS #CWC23
— BCCI (@BCCI) October 8, 2023
एकूण सामने
२३
प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने विजय मिळवला
१४
धावांचा पाठलाग करणारा संघ जिंकला
८
पहिल्या डावाची सरासरी धावसंख्या
२३३
संघाची सर्वोच्च धावसंख्या
३३७
संघाचा किमान स्कोअर
६९
नाणेफेक जिंकणारा संघ किती वेळा जिंकला?
१६
नाणेफेक हरलेला संघ किती वेळा जिंकला?
६
अनिर्णायक
१
? MA Chidambaram Stadium, Chennai
— ICC (@ICC) October 8, 2023
The @bookingcom official venue as India and Australia kick-off their #CWC23 campaigns ?️ pic.twitter.com/bjbSdjl1Xz
ऑस्ट्रेलियाप्रमाणेच भारताकडूनही एका खेळाडूच्या खेळण्यावर शंका आहे. स्टार सलामीवीर शुबमन गिल आजारी असून मीडिया रिपोर्ट्सनुसार त्याला डेंग्यू झाला आहे. त्याच्या खेळावर साशंकता कायम आहे. मात्र, प्रशिक्षक राहुल द्रविड आणि कर्णधार रोहित शर्मा या दोघांनीही आपल्या पत्रकार परिषदेत शुबमनच्या खेळण्याबाबतचा निर्णय नाणेफेकीपूर्वी घेतला जाईल, असे सांगितले होते, परंतु मिळालेल्या माहितीनुसार, शुबमन अद्याप यातून सावरलेला नाही.
शुबमन खेळला नाही तर रोहितसह ईशान किशनला सलामीची जबाबदारी दिली जाऊ शकते. त्याचबरोबर श्रेयस अय्यर आणि सूर्यकुमार यादव यांच्यापैकी एकाला मधल्या फळीत संधी मिळू शकते. श्रेयस चांगली फिरकी खेळतो, त्यामुळे त्याला सूर्यापेक्षा प्राधान्य दिले जाऊ शकते.
एम.ए. चिदंबरम स्टेडियम हे त्याच्या संतुलित खेळपट्टीसाठी ओळखले जाते, ज्यामध्ये फलंदाज आणि गोलंदाज दोघांनाही काहीतरी मदत आहे. ही खेळपट्टी सहसा कोरडी असते आणि फिरकीपटूंना मदत करतेे. जसजसा सामना पुढे सरकतो तसतसा खेळपट्टी थोडी मंदावते, त्यामुळे दुसऱ्या डावात स्ट्रोक खेळणे थोडे कठीण होते. त्यामुळे बहुतेक संघ नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतात.
चेन्नईतील प्रतिष्ठित एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर आतापर्यंत २२ एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. या मैदानावर भारतीय संघाने ७ सामने जिंकले आहेत. तर २०१४ मध्ये त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते.
एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतील पाचवा सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात रविवारी (८ ऑक्टोबर) होणार आहे. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने येतील. भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या नजरा विजयाने स्पर्धेची सुरुवात करण्याकडे आहेत. मात्र, पावसामुळे त्यांच्या आशा पल्लवित होऊ शकतात. चेन्नईमध्ये गेल्या काही तासांत जोरदार पाऊस झाला. आकाशात काळे ढग दिसत आहेत. अशा परिस्थितीत पावसामुळे सामन्यात व्यत्यय येण्याची भीती चाहत्यांना आहे.
चेन्नईत दुपारी दोन वाजता सामना सुरू होईल. त्याआधी अर्धा तास टॉस होणार आहे. Accuweather.com नुसार चेन्नईमध्ये दुपारी तापमान ३३ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. पावसाची शक्यता नाही, परंतु ढगाळ वातावरण असू शकते. ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता २१ टक्के आहे. त्याच वेळी, जर आपण संध्याकाळबद्दल बोललो तर ३९ टक्के अंदाज आहे की आकाशात ढग दिसतील. त्याच वेळी, ते रात्री २९ टक्क्यांपर्यंत कमी होते. मात्र, चेन्नईतील पावसाबाबत कोणीही काही सांगू शकत नाही. गेल्या काही दिवसांच्या वातावरणाने चाहत्यांना धास्तावले आहे.
तुम्ही Disney + Hotstar अॅपवर विश्वचषक सामने ऑनलाइन पाहू शकता. तुम्हाला मोबाईलवर सामना मोफत पाहता येणार आहे. लॅपटॉप किंवा स्मार्ट टीव्हीवर पाहण्यासाठी तुम्हाला पैसे द्यावे लागतील आणि सदस्यता घ्यावी लागेल. Loksatta.com वर वर्ल्ड कपशी संबंधित बातम्याही तुम्ही वाचू शकता.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विश्वचषकात भारताने आतापर्यंत केवळ चार सामने जिंकले आहेत. त्याचबरोबर आठ वेळा पराभवाचा सामना करावा लागला आहे. चार विजयांबद्दल बोलायचे झाल्यास, भारताने १९८३, १९८७, २०११ आणि २०१९ मध्ये पाच वेळा चॅम्पियन संघाचा पराभव केला आहे. २००३च्या विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना आणि २०१५च्या विश्वचषकाचा उपांत्य सामना देखील या दोघांमध्ये खेळला गेला होता. या दोन्ही सामन्यात टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला.
एकदिवसीय विश्वचषकात भारताचा पहिला सामना ऑस्ट्रेलियाशी आहे. हा सामना जिंकून टीम इंडिया आपल्या विश्वचषक मोहिमेची विजयी सुरुवात करू इच्छित आहे. ही स्पर्धा जिंकून भारताचा दशकभराचा ICC ट्रॉफीचा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न असेल. अशा स्थितीत कर्णधार रोहित शर्माने स्पष्ट केले आहे की, कोणत्याही खेळाडूची वैयक्तिक पसंती असू नये. फक्त संघ महत्त्वाचा आणि संघाचे ध्येय महत्त्वाचे.
The wait is over and Match Day is here! ?#TeamIndia take on Australia in their opening game of #CWC23 ?️
— BCCI (@BCCI) October 8, 2023
? Chennai
⏰ 2 PM IST
? https://t.co/Z3MPyeL1t7 pic.twitter.com/IhkWN9jVPn

भारताने ऑस्ट्रेलियाचा सहा गडी राखून पराभव करत विश्वचषक स्पर्धेतील विजयी सुरुवात केली. या सामन्यात भारताच्या विजयाचे नायक लोकेश राहुल आणि विराट कोहली होते. मात्र, दोन्ही फलंदाजांचे शतक हुकले. राहुलने ९७ धावांची नाबाद खेळी तर कोहलीने ८५ धावांची खेळी खेळली.