बॉर्डर-गावस्कर मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ भारत दौऱ्यावर आला आहे. ही मालिका सुरू होण्याच्या आधीपासूनच कांगारुंना भारतीय खेळाडूंऐवजी इथल्या खेळपट्ट्यांची भीती असल्याचं जाणवत आहे. नागपूर कसोटीत (पहिली कसोटी) भारताने ऑस्ट्रेलियावर एक डाव आणि १३२ धावांनी विजय मिळवला. सामन्याच्या आधीपासून आणि नंतरही ऑस्ट्रेलियन माध्यमं भारतीय खेळपट्टीवर टीका करत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कांगारुंची खेळपट्टीबद्दलची भीती अजूनही कायम असल्याचं दिसत आहे. दुसऱ्या कसोटीत देखील त्यांना नागपूरसारख्या खेळपट्टीवर खेळावं लागेल अशी भीती ऑस्ट्रेलियन खेळाडूंना जाणवतेय. त्यामुळे दिल्लीत पोहोचल्यावर ऑस्ट्रेलियाचे खेळाडू सर्वात आधी अरूण जेटली स्टेडियमवर दाखल झाले. त्यानंतर सर्वच ऑस्ट्रेलियन खेळाडू खेळपट्टीचं निरीक्षण करताना दिसले.

कांगारुंना आपण नागपूरमधल्या खेळपट्टीचा अभ्यास करताना पाहिलं होतं. त्याच चित्राची दिल्लीत पुनरावृत्ती पाहायला मिळाली. ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथ तर अगदी गुडघे टेकून जवळून खेळपट्टीचं निरीक्षण करताना दिसला. हा क्षण माध्यमांच्या प्रतिनिधींनी लगेच टिपला. हा फोटो पाहून सोशल मीडियावर नेटीझन्स कांगारूंची थट्टा करू लागले आहेत.

नागपूर-दिल्लीच्या खेळपट्टीत काय फरक?

दिल्लीतली खेळपट्टी नागपूरमधल्या खेळपट्टीपेक्षा वेगळी आहे. नागपूरच्या खेळपट्टीवर थोडं तरी गवत होतं. परंतु दिल्लीतली खेळपट्टी चकाचक आहे. त्यामुळे गोलंदाज खेळपट्टीच्या दोन्ही बाजूने, राऊंड द विकेट अथवा ओव्हर द विकेट कोणत्याही प्रकारची गोलंदाजी करत असला तरी त्याला दिसणार मिळणार नाही.

गुडघ्यावर बसून स्मिथने केलं खेळपट्टीचं निरिक्षण

हे ही वाचा >> कपिलपासून सचिन-विराटपर्यंत, १०० वी कसोटी भारतीयांसाठी ठरलीय अनलकी, पुजारा दुष्काळ संपवणार?

दिल्लीत जास्त धोका?

दिल्लीतली खेळपट्टी साफ आहे, या खेळपट्टीवर धोका अधिक आहे. नागपूरमध्ये थोडं तरी गवत होतं. पण दिल्लीतली खेळपट्टी एकदम चकाचक आहे. नागपूरमध्ये किमान तीन दिवस सामना झाला. दिल्लीत त्यापेक्षा गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे ऑस्ट्रेलियन खेळाडू थोडे चिंतेत असतील. ऑस्ट्रेलियन संघाला असं वाटतंय की ही खेळपट्टी फिरकीला अनुकूल ठरेल.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India vs australia steve smith checking delhi pitch ahead of 2nd test delhi pic goes viral asc