१९ वर्षांखालील विश्वचषकाचा दुसरा उपांत्य सामना बुधवारी अँटिग्वा येथील कूलिज क्रिकेट मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार आहे. बांगलादेशचा पराभव करून भारताने तर पाकिस्तानचा पराभव करत ऑस्ट्रेलियाने उपांत्य फेरीत प्रवेश केला. भारताने विक्रमी १०व्यांदा उपांत्य फेरी गाठली. स्पर्धेतील सराव सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. अंडर-१९ वर्ल्ड कपमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आतापर्यंत ७ वेळा सामना झाला आहे.
यापैकी भारताने ५ सामने जिंकले आहेत. तर ऑस्ट्रेलियाचा संघ २ सामने जिंकू शकला आहे. २००० ते २०२० या दोन संघांमधील शेवटच्या ५ सामन्यांवर नजर टाकली तर प्रत्येक वेळी टीम इंडियाने विजय मिळवला आहे. अशा स्थितीत पुन्हा भारताचे पारडे जड आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अंडर-१९ विश्वचषक २०२२ उपांत्य फेरीचा सामना कुठे खेळला जाईल?
हा उपांत्य सामना अँटिग्वा येथील कूलिज क्रिकेट मैदानावर खेळवला जाईल.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अंडर-१९ विश्वचषक २०२२चा उपांत्य सामना किती वाजता सुरू होईल?
हा उपांत्य सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ६.३० वाजता सुरू होईल.
हेही वाचा – संघाला दिशा दर्शवण्यासाठी तत्पर! ; कर्णधारपदावरून पायउतार झालेला कोहली फलंदाज म्हणून छाप पाडण्यासही उत्सुक
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अंडर-१९ विश्वचषक २०२२चा उपांत्य फेरीचा सामना कोणत्या चॅनेलवर पाहता येईल?
हा उपांत्य सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येईल.
लाइव्ह स्ट्रीमिंगद्वारे मोबाईलवर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया अंडर-१९ विश्वचषक २०२२ उपांत्य फेरीचा सामना कसा पाहता येईल?
हा उपांत्य सामना डिस्ने हॉटस्टारवर (Disney Hotstar App) मोबाईलवर लाइव्ह स्ट्रीमिंगद्वारे पाहता येईल.
दोन्ही संघ
भारत: यश धुल (कर्णधार), शेख रशीद, आराध्या यादव, दिनेश बाना, राज बावा, अनिश्वर गौतम, राजवर्धन हेंगरगेकर, हरनूर सिंग, मानव पारख, विकी ओसवाल, अंगक्रिश रघुवंशी, रवी कुमार, गर्व सांगवान, सिद्धार्थ यादव, निशांत सिंध, कौशल तांबे.
ऑस्ट्रेलिया: कूपर कोनोली (कर्णधार), हरकीरत बाजवा, एडन काहिल, जोशुआ गार्नर, आयझॅक हिंगिस, कॅम्पबेल केलावे, कोरी मिलर, जॅक निस्बेट, निवेथन राधाकृष्णन, विल्यम शुल्झमन, लचलान शॉ, जॅक सेनफेल्ड, टॉम विलेनेल, टोबियास स्नेल.