IND W vs AUS W T20 World Cup 2024: महिला टी-२० विश्वचषक २०२४ आता अंतिम टप्प्यावर येऊन पोहोचला आहे. अखेरचे गट सामने बाकी असून उपांत्य फेरीसाठी संघ निश्चित होणार आहे. न्यूझीलंडने श्रीलंकेवर १५ चेंडू राखून विजय मिळवल्यानंतर ‘अ’ गटाच्या संघांना उपांत्य फेरी गाठण्यासाठी काय करावे लागेल हे स्पष्ट झाले आहे. अ गटात आता फक्त दोनच सामने बाकी आहेत. रविवारी (१३ ऑक्टोबर) भारताचा सामना ऑस्ट्रेलियाशी तर सोमवारी (१४ ऑक्टोबर) न्यूझीलंडचा सामना पाकिस्तानशी होईल. न्यूझीलंडचा नेट रन रेट (NRR) सध्या ०.२८२ आहे. भारताच्या ०.५७६ च्या नेट रन रेटपेक्षा हा नक्कीच कमी आहे. पण भारताला जर उपांत्य फेरी गाठायची असेल तर काय करावे लागेल, जाणून घ्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारत, न्यूझीलंड आणि पाकिस्तानचे उपांत्य फेरी गाठण्याचे समीकरण

भारत आणि न्यूझीलंड दोन्ही संघ आपले सामने जिंकल्यास या दोघांशिवाय ऑस्ट्रेलियाचेही ६ गुण असतील. सर्वोत्तम नेट रनरेट असलेले दोन संघ उपांत्य फेरीत पोहोचतील. भारत आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ पराभूत झाल्यास पाकिस्तानही उपांत्य फेरीत पोहोचू शकतो. भारत, न्यूझीलंड आणि पाकिस्तानमधील सर्वोत्तम नेट रन रेट असलेला संघ उपांत्य फेरीत पोहोचेल. भारत किंवा न्यूझीलंड यापैकी एकाने अंतिम सामना गमावला तर जो संघ विजयी होईल तो संघ सहा गुणांसह ऑस्ट्रेलियासह उपांत्य फेरीत धडक मारेल.

हेही वाचा – IND vs BAN: टीम इंडियाचा रेकॉर्डब्रेक सामना, एकामागून एक भारताने मोडले टी-२० मधील मोठे विक्रम, वाचा विक्रमांची यादी

भारत आणि न्यूझीलंड दोन्ही संघ जिंकल्यास काय होईल?

दोन्ही संघांनी प्रथम फलंदाजी केल्यास न्यूझीलंडला ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताच्या विजयाच्या फरकाने किमान १७ ते १८ धावांनी विजय मिळवावा लागेल. हे समीकरण गुणांवर अवलंबून असेल. उदाहरणार्थ, जर भारताने ऑस्ट्रेलियाला १० धावांनी हरवले तर न्यूझीलंडला किमान २७ ते २८ धावांनी पाकिस्तानला हरवावे लागेल.

मात्र, ऑस्ट्रेलियाला भारताविरुद्ध मोठा पराभव पत्करावा लागल्यास ते बाहेर पडण्याची शक्यता फारच कमी आहे. भारताने १५० धावा केल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा ६१ किंवा त्याहून अधिक धावांनी पराभव केल्यास, ऑस्ट्रेलियाचा नेट रन रेट भारतापेक्षा खाली जाईल. जर भारताने ६१ धावांनी विजय मिळवला. तर प्रथम फलंदाजी करणाऱ्या न्यूझीलंडला पाकिस्तानचा ७७ किंवा त्याहून अधिक धावांनी पराभव करावा लागेल. लक्ष्याचा पाठलाग केल्यास त्याला किमान ५८ चेंडू शिल्लक असताना जिंकावे लागेल.

हेही वाचा – Hardik Pandya: “अखेर मला असा कोणीतरी भेटला…”, म्हणत ‘या’ भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीने शेअर केले हार्दिक पंड्याबरोबरचे फोटो

जर भारताने ऑस्ट्रेलियाविरूद्ध प्रथम फलंदाजी केली आणि न्यूझीलंडने पाकिस्तानविरूद्ध लक्ष्याचा पाठलाग केला, तर न्यूझीलंडला १४ ते १६ चेंडू शिल्लक असताना विजय मिळवावा लागेल. जर भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध लक्ष्याचा पाठलाग केला आणि शेवटच्या चेंडूवर विजय मिळवला, तर न्यूझीलंडला पाकिस्तानविरूद्ध प्रथम फलंदाजी करावी लागल्यास त्यांना १९ ते २० धावांनी विजय मिळवावा लागेल. तर न्यूझीलंडनेही लक्ष्याचा पाठलाग केल्यास त्यांना १४ ते १५ चेंडू शिल्लक असताना विजय मिळवावा लागेल.

हेही वाचा – IND vs BAN : सूर्याने रोहित शर्माला मागे टाकत केला मोठा पराक्रम, ‘ही’ खास कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय खेळाडू

भारत-न्यूझीलंड दोन्ही संघ पराभूत झाले तर…

जर भारत ऑस्ट्रेलियाविरूद्ध सामना हरला तर आणि जर भारताने प्रथम फलंदाजी केली असेल तर त्यांना १५ ते १६ चेंडू शिल्लक असताना पराभूत होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. लक्ष्याचा पाठलाग केल्यास १८ पेक्षा जास्त धावांनी हरणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. जर भारताने वरील समीकरणाची काळजी बाळगली आणि सामन्याच्या शेवटच्या चेंडूवर किंवा फक्त एका धावेने पाकिस्तानविरूद्ध न्यूझीलंडचा पराभव झाला, तर हरमनप्रीत कौरचा संघ नेट रन रेटच्या आधारावर उपांत्य फेरीत पोहोचेल.

हेही वाचा – IND vs BAN: “संघापेक्षा कोणीही मोठं नाही…”, भारताच्या मालिका विजयानंतर सूर्यकुमार यादवचं मोठं वक्तव्य, कर्णधार असं नेमकं का म्हणाला?

हे दोन्ही संघ हरले तर पाकिस्तानलाही उपांत्य फेरी गाठण्याची संधी असेल, पण खराब नेट रनरेट लक्षात घेता असे होण्याची शक्यता कमी आहे. भारत केवळ एका धावेने पराभूत झाला तर प्रथम फलंदाजी करणाऱ्या पाकिस्तानला ५८ किंवा त्याहून अधिक धावांनी विजय मिळवावा लागेल. पाकिस्तानने धावांचा पाठलाग केल्यास त्यांची उपांत्य फेरी गाठण्याची शक्यता आणखी कमी होईल. स्कोअरवर अवलंबून, त्यांना अंदाजे ६३ किंवा त्याहून अधिक चेंडू शिल्लक असताना जिंकावे लागेल. जर भारत ३० किंवा त्याहून अधिक चेंडू शिल्लक असताना हरला, तर पाकिस्तानला त्यांचा नेट रन रेट सुधारण्यासाठी किमान ३० धावांनी किंवा किमान २४ चेंडू शिल्लक असताना जिंकावे लागेल.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India vs australia womens t20 world cup 2024 semifinal scenario for team india need big win by 60 runs bdg