India vs Australia Score Updates, Women’s T20 World Cup 2023 Semifinal: भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान महिला टी-२० विश्वचषकाचा सेमीफायनल सामना केपटाऊन येथे खेळवला जात आहे. या समान्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत भारतासमोर धावांचा डोंगर उभा केला. ऑस्ट्रेलियाने २० षटकांत १७२ धावा केल्या आहेत.

लक्ष्याचा पाठलाग करताना सुरुवातीच्या षटकांमध्ये भारताचे तीन गडी स्वस्तात बाद झाले. त्यानंतर भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर आणि जेमिमाह रॉड्रिग्स या जोडीने भारताचा डाव सावरला. पण जेमिमाह आणि हरमनप्रीत कौर बाद झाल्यानंतर टीम इंडिया दबावात आली. त्यानंतर दीप्ती शर्मा वगळता इतर फलंदाजांना फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. भारताने २० षटकांत १६७ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाने ५ धावांनी भारतावर मात करत महिला टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे.

Live Updates

IND vs AUS Live: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया उपांत्य सामना, प्रत्येक अपडेट एका क्लिकवर...

21:45 (IST) 23 Feb 2023
कर्णधार हरमनप्रीत कौरची झुंज व्यर्थ, ऑस्ट्रेलियाची भारतावर ५ धावांनी मात

ऑस्ट्रेलियाने १७३ धावांचं लक्ष्य दिल्यानंतर, लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या टीम इंडियाने २० षटकांत १६७ धावा केल्या आहेत. महिला टी-२० विश्वचषकाच्या सामन्यात भारत ५ धावांनी पराभूत झाला आहे.

21:42 (IST) 23 Feb 2023
राधा यादव शून्यावर बाद

अखेरच्या षटकांत १६ धावांची गरज असताना दबावात खेळणारी राधा यादव शूनावर बाद झाली आहे. तिने २० व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. मात्र ती झेलबाद झाली.

21:38 (IST) 23 Feb 2023
अखेरच्या षटकात भारताला १६ धावांची गरज

१९ व्या षटकात भारताला आणखी एक झटका बसला आहे. १९ व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर स्नेह राणा त्रिफळाचित झाली आहे. भारताला विजयासाठी १६ धावांची गरज आहे. दीप्ती शर्मा ११ धावांवर खेळत आहे.

21:34 (IST) 23 Feb 2023
फायनलमध्ये जाण्यासाठी भारताला १२ चेंडूत २० धावांची गरज

ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारता महिला टी-२० विश्वचषकाचा उपांत्य सामना चुरशीचा बनवा आहे. फायनलमध्ये जाण्यासाठी भारताला १२ चेंडूत २० धावांची गरज आहे.

21:30 (IST) 23 Feb 2023
भारताला विजयासाठी ३१ धावांची गरज

हरमनप्रीत कौर आणि रिचा घोषच्या विकेट्स पडल्यामुळे भारतीय संघ अडचणीत आला आला. भारताला ३ षटकांत ३१ धावांची गरज आहे. दीप्ती शर्मा ११ चेंडूत ९ धावांवर खेळत आहे.

21:26 (IST) 23 Feb 2023
कर्णधार हरमनप्रीत कौर ५२ धावांवर बाद, भारताची धावसंख्या १३३ वर ५ बाद

कर्णधार हरमनप्रीत कौरने अर्धशतक साजरं केल्यानंतर दुसऱ्याच चेंडून बाद झाली आहे, हरमनप्रीतच्या विकेटमुळे टीम इंडिया अडचणीत सापडली आहे. हरमनप्रीतने ३४ चेंडूत ५२ धावा केल्या आहेत. यामध्ये ४ चौकार आणि १ षटकाराचा समावेश आहे.

21:18 (IST) 23 Feb 2023
कर्णधार हरमनप्रीतचं धडाकेबाज अर्धशतक, ३३ चेंडूत कुटल्या ५१ धावा

कर्णधार हरमनप्रीत कौरने शानदार फटकेबाजी केली आहे. तिने ३३ चेंडून ५१ धावा केल्या आहेत. यामध्ये ६ चौकार आणि १ षटकाराचा समावेश आहे.

21:04 (IST) 23 Feb 2023
भारताला मोठा धक्का, शानदार खेळी करणारी जेमिमाह ४३ धावांवर बाद

सुरुवातीला भारताच्या विकेट्स पडल्यानंतर हरमनप्रीत आणि जेमिमाहने भारताचा खेळ सावरला होता. ऑस्ट्रेलियन गोलंदाज डार्सी ब्राऊनच्या चेंडूवर जेमिमाह बाद झाली आहे. जेमिमाहने २४ चेंडून ६ चौकार लगावत ४३ धावा केल्या आहेत. १०.२ षटकानंतर भारताची धावसंख्या ९७/४ इतकी आहे.

20:45 (IST) 23 Feb 2023
भारताचा डाव सावरला, कर्णधार हरमनप्रीत कौर आणि जेमिमाहची शानदार फटकेबाजी

७ षटकानंतर भारताची धावसंख्या ६५ वर पोहोचली आहे. कर्णधार हरमनप्रीत कौर आणि जेमिमाह रॉड्रिग्सने शानदार फटकेबाजी करत आहेत. हरमनप्रीत १२ चेंडून २१ धावांवर खेळत आहे, तर जेमिमाह १३ चेंडूत २३ धावांवर खेळत आहे.

20:38 (IST) 23 Feb 2023
हरमनप्रित कौर आणि जेमिमाहने डाव सावरला

भारताच्या लागोपाठ तीन विकेट्स पडल्यानंतर, भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर आणि जेमिमाह रॉड्रिंग्सने भारताचा डाव सावरला आहे. ५ षटकानंतर भारताची धावसंख्या ४७/३ इतकी आहे.

20:32 (IST) 23 Feb 2023
भारताला तिसरा झटका, यस्तिका भाटिया ४ धावांवर धावचित

ऑस्ट्रेलियाने दिलेल्या १७३ धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाचे लागोपाठ तिन विकेट्स पडल्या आहेत. स्मृती मंधाना आणि शफाली वर्मानंतर भारताची तिसरी विकेट पडली आहे. यस्तिका भाटिया ४ धावांवर रन आऊट झाली आहे. भारताची धावसंख्या ४.१ षटकांत ३९ इतकी आहे.

20:25 (IST) 23 Feb 2023
स्मृती मंधाना २ धावा करून आऊट

ऑस्ट्रेलियाने भारतासमोर धावांचा डोंगर ठेवल्यानंतर भारताच्या दोन विकेट्स गेल्या आहे. भारताची स्टार फलंदाज स्मृती मंधाना अवघ्या दोन धावांवर परतली आहे. तर शैफाली वर्माला साजेशी कामगिरी करता आली नाही. शैफालीने ६ चेंडूत ९ धावा केल्या तर स्मृतीने ५ चेंडूत २ धावा केल्या.

20:23 (IST) 23 Feb 2023
भारताला दुसरा मोठा झटका, स्मृती मंधाना पायचित

भारताला स्मृती मंधानाच्या रुपात दुसरा मोठा झटका बसला आहे. सध्या भारताच्या १९ धावा झाल्या आहेत. स्मृती मंधाना फक्त दोन धावा करू शकली.

Story img Loader