ऑस्ट्रेलियाने अॅडलेड ओव्हल मैदानावर झालेल्या पहिल्या सराव सामन्यात भारताचा १०६ धावांनी दणदणीत पराभव केला. विश्वचषकापूर्वी झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सराव लढतीत भारतीय गोलंदाजांनी आणि फलंदाजांनीही निराशाजनक कामगिरी केली. ऑस्ट्रेलियाने ४८.२ षटकात ३७१ धावा केल्या. तर भारताचा डाव २६५ धावांवर आटोपला.
भारताकडून शिखर धवन, अजिंक्य रहाणे आणि अंबाती रायुडू यांनी अर्धशतकी खेळी केली. धवन ५९ धावांवर, रहाणे ६६ धावांवर आणि राय़ुडू ५३ धावांवर माघारी परतले. पण या तिघांचा अपवाद सोडला तर भारताच्या एकाही फलंदाजाला मोठी धावसंख्या रचण्यात अपयश आले. ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिंसने ३० धावांच्या मोबदल्यात भारताच्या तीन फलंदाजांना माघारी धाडले. तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाचा कर्णधार जॉर्ज बेलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी दमदार फलंदाजी केली. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेविड वॉर्नरने शानदार शतक झळकावत जबरदस्त फॉर्ममध्ये असल्याचे दाखवून दिले. तर ग्लेन मॅक्सवेलने १२२ धावांची खेळी केली. मात्र त्याला दुखापतीमुळे सामना अर्धवट सोडावा लागला. अखेर ऑस्ट्रेलियाचा डाव ३७१ धावांत संपुष्टात झाला. भारताकडून मोहम्मद शमीने सर्वाधिक तीन विकेट्स काढल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा