India Vs Australia WTC Final 2023: भारतीय क्रिकेट संघाला बुधवारपासून (७ जून) महत्त्वाचा सामना खेळायचा आहे. संघाचा ऑस्ट्रेलिया विरुद्ध आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) २०२३चा अंतिम सामना आहे. मात्र याआधी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. वास्तविक, डब्लूटीसी फायनलसाठी भारतीय संघ जोरदार सराव करत आहे. दरम्यान, कर्णधार रोहित शर्माला दुखापत झाली. वृत्तानुसार, नेट प्रॅक्टिस दरम्यान एक धारदार चेंडू रोहितच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला लागला.

रोहितच्या अंगठ्याला झालेली दुखापत गंभीर नाही

रोहित लगेच बॅट सोडून आत गेला. यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून रोहितने पुढे नेट सराव केला नाही. मात्र, काही वेळाने भारतीय चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमीही समोर आली. रोहित शर्माची दुखापत फारशी गंभीर नसल्याची माहिती संघ व्यवस्थापनाने दिली आहे. तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध अंतिम कसोटी सामना खेळू शकतो. माहितीसाठी की डब्लूटीसी फायनल बुधवारपासून (७ जून) लंडनच्या ओव्हल मैदानावर खेळली जाईल.

आयपीएलनंतर खेळाडूंना विश्रांती मिळाली नाही

वास्तविक, इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२३ हंगाम खेळल्यानंतर भारतीय खेळाडू लगेचच थेट लंडनला आले आहेत. आयपीएलचा अंतिम सामना २९ मे रोजी (रिझर्व्ह-डे) खेळला गेला. ज्यामध्ये चेन्नई सुपर किंग्जने गुजरात टायटन्सचा पराभव करत विजेतेपद पटकावले. मुंबई इंडियन्सने २६ मे रोजी रोहितच्या नेतृत्वाखाली एलिमिनेटर खेळला होता. अशा स्थितीत भारतीय खेळाडूंना विश्रांती मिळालेली नाही. त्यामुळे भारतीय संघातील खेळाडूंची मानसिक स्थिती चांगली असावी यावर संघ व्यवस्थापन अधिक मेहनत घेत आहे.

रोहित शर्मा खराब फॉर्मशी झगडत आहे

भारतीय कर्णधार रोहित शर्मा सध्या खराब फॉर्मशी झगडत आहे. आयपीएलमध्येही त्याने दमदार कामगिरी केली नाही. जरी त्याचा संघ निश्चितपणे प्लेऑफमध्ये पोहोचला. जिथे त्याला एलिमिनेटरमध्ये गुजरात टायटन्सकडून पराभव पत्करावा लागला होता. आयपीएलमध्ये, रोहितने १६ सामने खेळले आणि २०.७५च्या माफक सरासरीने ३३२ धावा केल्या. यादरम्यान त्याला केवळ २ अर्धशतकच करता आले. मात्र, रोहितने यंदा कसोटीत काहीसा चांगला फॉर्म दाखवला आहे. या वर्षी त्याने ४ कसोटी सामने खेळले आणि ४०.३३च्या सरासरीने २४२ धावा केल्या. यादरम्यान त्याने शतकही ठोकले आहे. रोहितने हे सर्व सामने ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतीय भूमीवरच खेळले.

हेही वाचा: WTC Final: टीम इंडियाच्या प्लेईंग ११ मध्ये ‘या’ खेळाडूंना सामील करा, सचिन तेंडुलकरने दिला महत्वाचा सल्ला, म्हणाला…

रोहित गेल्या वर्षी भारतीय संघाचा कर्णधार झाला

दक्षिण आफ्रिकेतील कसोटी मालिकेतील पराभवानंतर रोहितने २०२२ च्या सुरुवातीला विराट कोहलीकडून सर्व फॉरमॅटचे कर्णधारपद स्वीकारले होते. रोहित शर्मा प्रथम टी२०, नंतर वन डे आणि शेवटी कसोटी संघाचा कर्णधार झाला. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने या वर्षाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियाला कसोटी मालिकेत पराभूत केले होते. आता टीम इंडियाला त्याच कांगारू संघाविरुद्ध अंतिम फेरीत खेळायचे आहे.

हेही वाचा: WTC 2023 Final: टीम इंडिया दोन फिरकीपटूंना उतरवणार मैदानात? कांगांरुंना गुंडाळण्यासाठी ‘असं’ असेल प्लेईंग ११ चं समीकरण

प्रत्येक कर्णधाराला भारताला पुढे न्यायचे आहे: रोहित

फायनलच्या एक दिवस आधी, रोहितला सामन्यापूर्वीच्या पत्रकार परिषदेत कर्णधार म्हणून त्याला कोणता वारसा सोडायचा आहे याबद्दल विचारण्यात आले. यावर हिटमॅन म्हणाला, “मी असो किंवा इतर कोणी, अगदी पूर्वीचे कर्णधार असो, त्यांची भूमिका भारतीय क्रिकेटला पुढे नेणे आणि अधिकाधिक सामने जिंकणे आणि अधिकाधिक चॅम्पियनशिप जिंकणे हीच होती.” माझ्यासाठीही तेच असेल. मला सामना जिंकायचा आहे. मला चॅम्पियनशिप जिंकायची आहे. त्यासाठी तुम्ही खेळता.”

Story img Loader