India Vs Australia WTC Final 2023 Live Streaming : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा फायनलचा सामना ७ जूनपासून सुरु होणार आहे. लंडनच्या ओव्हल मैदानात हा सामना खेळवला जाणार असून ११ जूनला या फायनलचा अंतिम दिवस असणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या लीग टेबलमध्ये १५२ गुण मिळवून ऑस्ट्रेलियाने अव्वल स्थान गाठलं आहे. तर भारताने १२७ गुण मिळवून दुसऱ्या क्रमांकावर भरारी घेतली आहे. ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये पदार्पण केलं असून भारत दुसऱ्यांदा या फायनलमध्ये पोहोचला आहे. २०२१ मध्ये झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल सामन्यात न्यूझीलंडने भारताचा ८ विकेट्सने पराभव केला होता. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीत भारताने २-१ ने बाजी मारत किताब जिंकला होता. त्यानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये भारताने प्रवेश केला.
WTC फायनलचा सामना कुठे पाहाल?
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलचे लाईव्ह प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्क होणार आहे. सामना ७ जूनला दुपारी ३ वाजता सुरु होणार आहे. डिज्ने स्टार इंडिया गाईडनुसार, या फायनलच्या सामन्याचे लाईव्ह प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स २, स्टार स्पोर्ट्स ३, स्टार स्पोर्ट्स १ हिंदी, स्टार्स स्पोर्ट्स वन एचडी, स्टार स्पोर्ट्स २ एचडी, स्टार स्पोर्ट्स वन हिंदी एचडी, स्टार स्पोर्ट्स वन तामिळ, स्टार स्पोर्ट्स वन तेलुगु आणि स्टार स्पोर्ट्स वन कन्नडा
भारतात WTC फायनलचं लाईव्ह स्ट्रिमिंग
या फायनलचे लाईव्ह प्रक्षेपण डिज्ने प्लस हॉटस्टार अॅपवर आणि वेबसाईटवर पाहता येईल. इंडियन प्रीमियर लीग २०२३ साठी जिओ सिनेमाला मोफत लाईव्ह प्रक्षेपण पाहता येत होतं. परंतु, WTC फायनल पाहण्यासाठी तुम्हाला सबस्क्रिप्शन खरेदी करावं लागणार आहे. डीज्ने प्लस हॉटस्टार वेगवेगळ्या प्रकारेच प्लॅन्स ऑफर करतात. यामध्ये प्रिमियम (रु २९९/महिना आणि १४९९/ वर्ष), सुपर (रु ८९९/वर्ष) आणि सुपर प्लस अॅड फ्री (रु १०९९ / वर्ष)