IND vs BAN Men’s T20 Match Highlights Score Today : भारताने दुसऱ्या टी-२० सामन्यात बांगलादेशचा ८६ धावांनी पराभव केला आहे. यासह टीम इंडियाने तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत २-० अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. या सामन्यात नितीश कुमार रेड्डी आणि रिंकू सिंग भारतासाठी चमकले. नितीशने ७४ धावांची अर्धशतकी खेळी तर रिंकूने ५३ धावांची अर्धशतकी खेळी साकारली. त्यानंतर भारताने गोलंदाजीतही आपली ताकद दाखवत पाहुण्या संघाला केवळ १३५ धावांवर रोखले. घरच्या मैदानावर भारताचा हा सलग सातवा मालिका विजय आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
India vs Bangladesh 2nd T20 Match Highlights Score, 09 October 2024 : भारत आणि बांगलादेश यांच्यात आतापर्यंत १६ टी-२० सामने झाले आहेत. ज्यामध्ये टीम इंडियाने १५ आणि बांगलादेशने एक सामना जिंकला आहे. अशा प्रकारे टीम इंडियाने बांगलादेशवर टी-२० मध्ये वर्चस्व राखले आहे.
भारत आणि बांगलादेश यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील दुसरा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात भारताने तिन्ही क्षेत्रात दमदार प्रदर्शन करत बांगलादेशचा ८६ धावांनी पराभव केला. त्याचबरोबर मालिका २-० ने खिशात घातली. या सामन्यात अगोदर भारताने रिंकू आणि नितीश यांच्या अर्धशतकांच्या जोरावर २२१ धावांचा डोंगर उभारला. यानंतर भारतीय गोलंदाजांनी शानदार कामगिरी केल्याने बांगलादेशचा ९ बाद १३५ धावांवरच मर्यादित राहिला.
https://twitter.com/BCCI/status/1844060265610084797 बांगलादेशकडून महमुदुल्लाहने सर्वाधिक धावा केल्या, तो ३९ चेंडूंत तीन षटकारांच्या मदतीने ४१ धावा करून बाद झाला. भारताकडून नितीश रेड्डीने बॅट आणि बॉलने चांगली कामगिरी करत दोन विकेट्स घेतल्या. त्याचवेळी गेल्या सामन्यात छाप पाडणारा फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्तीनेही दोन विकेट्स घेतल्या. विशेष म्हणजे भारताच्या प्रत्येक गोलंदाजाला एक विकेट मिळाली. नितीश आणि वरुणशिवाय अर्शदीप सिंग, वॉशिंग्टन सुंदर, अभिषेक शर्मा, मयंक यादव आणि रियान पराग यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
नितीश रेड्डीला मिळाली पहिली आंतरराष्ट्रीय विकेट
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिले अर्धशतक झळकावल्यानंतर आता नितीश रेड्डी यांनीही पहिली विकेट घेतली आहे. बांगलादेशने 120 धावांत 8 विकेट गमावल्या आहेत. या सामन्यात भारतासाठी एकूण सात गोलंदाजांनी गोलंदाजी केली आणि त्या सर्वांना यश मिळाले.
१५ षटकांनंतर बांगलादेशची धावसंख्या सात गड्यांच्या मोबदल्यात 102 धावा आहे. टीम इंडियाचा विजय निश्चित आहे. महमुदुल्लाह 26 चेंडूत 30 धावांवर खेळत आहे. त्याने दोन षटकार मारले आहेत. तंझीमसोबत हसन शाकिबही दोन धावांवर खेळत आहे.
बांगलादेशची सातवी विकेट 93 धावांवर पडली. वरुण चक्रवर्तीने रिशाद हुसेनला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. हार्दिक पांड्याने अप्रतिम झेल घेतला. वरुण चक्रवर्तीचे हे दुसरे यश आहे. या अगोदर मयंकने झाकीर अलीला एका धावेवर पॅव्हेलियनमध्ये पाठवले.
बांगलादेशची पाचवी विकेट पडली
11व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर मेहंदी हसन मिराज बाद झाला. रियान परागला षटकार मारण्याच्या प्रयत्नात तो सीमारेषेवर झेलबाद झाला. अशाप्रकारे बांगलादेशचा निम्मा संघ 80 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. मिराज 16 चेंडूत 16 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.
I have again spotted #Xiaomi in the today's T20 match.#XiaomiFans#Redmi13#Giveaway #Cricket#INDvsBAN@XiaomiIndia https://t.co/kMGllyWItd pic.twitter.com/fhC6l9h5ye
— Basant Sahu (@Basant871765) October 9, 2024
बांगलादेशचा धावसंख्या 61/4 धावा
9 षटकांनंतर बांगलादेशची धावसंख्या चार गड्यांच्या मोबदल्यात 61 धावा आहे. मेहंदी हसन मिराज 11 चेंडूत 1 चौकाराच्या मदतीने 12 धावांवर खेळत आहे. महमुदुल्ला सात चेंडूत सहा धावांवर खेळत आहे. सामना पूर्णपणे भारताच्या ताब्यात आहे.
? Abhishek Sharma gets the wicket of Towhid Hridoy.#INDvsBAN pic.twitter.com/MQT3jAiUm9
— Asif Malik (@Asif_Malik83) October 9, 2024
बांगलादेशची चौथी विकेट पडली
सातव्या षटकात अभिषेक शर्माने बांगलादेशला चौथा धक्का दिला. बांगलादेशने 46 धावांत चार विकेट्स गमावल्या आहेत. अभिषेकने तौहीदला बोल्ड केले. त्याला केवळ दोन धावा करता आल्या.
नजमुल हुसेन शांतो पॅव्हेलियनमध्ये परतला
बांगलादेशची दुसरी विकेट 5व्या षटकात 40 धावांवर पडली. वॉशिंग्टन सुंदरने कर्णधार नझमुल हुसेन शांतोला बाद केले. सात चेंडूंत 11 धावा करून तो बाद झाला.
बांगलादेशच्या डावाच्या तिसऱ्या षटकात अर्शदीप सिंगने परवेझ हुसेन इमॉनला क्लीन बोल्ड केले. इमॉनने 12 चेंडूत 16 धावा केल्या. क्रिझवर कर्णधार नझमुल शांतो हा नवा फलंदाज आहे.
भारताने दिलेल्या २२२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या लिटन दास आणि परवेज यांनी आक्रमक सुरूवात केली आहे. अर्शदीपच्या पहिल्याच षटकात परवेजने ३ चौकारांसह १४ धावा केल्या.
टीम इंडियाने खराब सुरुवातीनंतही दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात बांगलादेशला 222 धावांचे लक्ष्य दिले आहे. एके काळी भारताने अवघ्या 41 धावांत तीन विकेट्स गमावल्या होत्या, मात्र त्यानंतर नितीश कुमार रेड्डीने 34 चेंडूत 74 धावा आणि रिंकू सिंगने 29 चेंडूत 53 धावा केल्या. शेवटी हार्दिक पंड्यानेही फटकेबाजी केली. हार्दिकने 19 चेंडूंत 2 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 32 धावा केल्या. भारताने 20 षटकात 9 विकेट गमावत 221 धावा केल्या. बांगलादेशकडून तस्किन अहमदने चार षटकांत केवळ 16 धावा देत दोन बळी घेतले. इतर सर्व गोलंदाजांची चांगली धुलाई झाली.
रियान पराग सहा चेंडूत 15 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.
19व्या षटकात रियान परागने तनझीम हसन शाकिबला सलग दोन षटकार ठोकले, मात्र तिसऱ्या चेंडूवर तो झेलबाद झाला. परागने सहा चेंडूत १५ धावा केल्या. भारताची धावसंख्या 6 विकेटवर 213 धावा.
17व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर रिंकू सिंग बाद झाला. भारताच्या पाच विकेट 185 धावांवर पडल्या आहेत. रिंकू सिंग 29 चेंडूत 53 धावा करून बाद झाला. त्याच्या बॅटमधून 5 चौकार आणि 3 षटकार आले.
T20 का यही खिलाड़ी है Rinku Singh#IndvsBan #Rinkusingh pic.twitter.com/5H1t08s6q3
— Ajeet Yadav (@ajeetkumarAT) October 9, 2024
रिंकू सिंगने षटकार ठोकत झळकावले वादळी अर्धशतक
रिंकू सिंगने अवघ्या 26 चेंडूत अर्धशतक झळकावले आहे. त्याने 5 चौकार आणि 3 षटकार मारले आहेत. 16 षटकांनंतर टीम इंडियाची धावसंख्या चार विकेटवर 182 धावा आहे. हार्दिक पांड्या 9 चेंडूत 16 धावांवर खेळत आहे. त्याने एक चौकार आणि एक षटकार मारला आहे.

नितीश रेड्डीने दिल्लीत अर्धशतक झळकावून धमाका केला. नितीश रेड्डीने 34 चेंडूत 74 धावा केल्या. तो झेलबाद झाला. त्याच्या बॅटमधून 4 चौकार आणि 7 षटकार आले. मुस्तफिजुर रहमानने नितीशला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. 14 षटकांनंतर भारताची धावसंख्या चार गड्यांच्या मोबदल्यात 152 धावा आहे.
11 षटकांनंतर टीम इंडियाची धावसंख्या तीन विकेटवर 114 धावा आहे. नितीश रेड्डी 23 चेंडूत 44 धावांवर खेळत आहे. त्याने दोन चौकार आणि चार षटकार मारले आहेत. रिंकू सिंग 16 चेंडूत 31 धावांवर खेळत आहे. आतापर्यंत त्याच्या बॅटमधून 3 चौकार आणि 2 षटकार आले आहेत.
The no Ball change total game, Into a massive entertainment
— Satya (@satyamaariwada) October 9, 2024
Nitish Kumar Reddy is a serious talent.
The intent, impact, the shots. This boy is absolutely fire ?.#INDvsBAN pic.twitter.com/86uMTY2rOb
नितीश रेड्डी यांनी चौकार-षटकार मारला
नितीश रेड्डीने 9व्या षटकात महमुदुल्लाला एक षटकार आणि एक चौकार लगावला. 9 षटकांनंतर टीम इंडियाची धावसंख्या तीन गड्यांच्या मोबदल्यात 77 धावा आहे. या षटकात एकूण 15 धावा आल्या. नितीश रेड्डी 16 चेंडूत 23, तर रिंकू सिंग 11 चेंडूत 17 धावांवर खेळत आहे.
7 षटकांनंतर टीम इंडियाची धावसंख्या तीन गड्यांच्या मोबदल्यात 51 धावा आहे. नितीश रेड्डी 9 चेंडूत 10 धावांवर खेळत आहे. त्याने चौकार मारला आहे. तर रिंकू सिंग पाच चेंडूत सहा धावांवर खेळत आहे. त्याने एक चौकारही मारला आहे.
Suryakumar Yadav dismissed for 8 in 10 balls. #INDvsBAN #istanbulconventionkeepsalive #PakistanCricket #PAKvENG #HOWEAWARDS2024xWIN #Ukraine #HaryanaElectionResult pic.twitter.com/Z8NcrIjWwR
— Cricket lover ??? (@I_am_Unkar007) October 9, 2024
भारताची टॉप ऑर्डर ढासळली आहे. सलामीची जोडी पॅव्हेलियनमध्ये परतल्यानंतर आता कर्णधार सूर्यकुमार यादवने मैदान सोडले आहे. संघाने केवळ 41 धावांत 3 विकेट गमावल्या आहेत.
भारताला दुसरा धक्का बसला
तिसऱ्या षटकात भारताला दुसरा मोठा धक्का बसला आहे. अभिषेक शर्माला तनझिम हसनने आपला शिकार बनवले आहे. तिसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर अभिषेक शर्माची विकेट गेली. अभिषेकने 11 चेंडूत 15 धावा केल्या.
https://twitter.com/EnPeyarDinesh/status/1844012765649981509
भारताला पहिला धक्का दुसऱ्याच षटकात बसला. तस्किन अहमदने संजू सॅमसनला आपला शिकार बनवले आहे. संजूने 10 धावांचे योगदान दिले.
Nhi nhi justice for Sanju Samson ???? #INDvsBAN #BCCI https://t.co/ve9Q2f1OvN
— Dr.Deepak Jain (@Deepakjain1827) October 9, 2024
सॅमसनने पहिल्याच षटकात दोन चौकार मारले
संजू सॅमसन सलामीवीर म्हणून चमकदार कामगिरी करत आहे. सॅमसनने पहिल्याच षटकात दोन चौकार मारले. तो चार चेंडूत 9 धावांवर आहे. तर अभिषेक शर्मा दोन चेंडूत सहा धावांवर खेळत आहे. एका षटकानंतर टीम इंडियाची धावसंख्या एकही विकेट न पडता 15 धावा आहे.
T20 के सरपंच साहब सूर्या पूरी तरह तैयार!!!
— Ankit chaprana ? (@Ankitchaprana6) October 9, 2024
???#indvsban pic.twitter.com/QRClQ6N4Qr
बांगलादेश संघात एक बदल
बांगलादेशचा कर्णधार नझमुल हुसेन शांतो याने भारताविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यासाठी बांगलादेशने संघात एक बदल केला आहे. पाहुण्या संघात शौरीफुल इस्लामच्या जागी शकीबचा समावेश करण्यात आला आहे. दुसरीकडे, भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेक दरम्यान सांगितले की, भारतीय संघाने प्लेइंग-11 मध्ये कोणताही बदल केलेला नाही.
2nd T20I. Bangladesh Playing XI: L. Das (wk), N. Hossain Shanto (c), P. Hossain Emon, T. Hridoy, M.Riyad, J. Ali, M. Hasan Miraz, R. Hossain, T. Ahmed, M. Rahman, T.Sakib. https://t.co/u89lLNwmd8 #INDvBAN @IDFCFIRSTBank
— BCCI (@BCCI) October 9, 2024
भारत: संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), नितीश रेड्डी, हार्दिक पांड्या, रियान पराग, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, मयंक यादव.
#TeamIndia remain unchanged for the 2nd T20I ?
— BCCI (@BCCI) October 9, 2024
A look at our Playing XI ?
Live – https://t.co/Otw9CpO67y#INDvBAN | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/bgcJ7M8dJu
बांगलादेश : परवेझ हुसेन इमॉन, लिटन दास (यष्टीरक्षक), नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), तौहीद हरदोय, महमुदुल्लाह, झाकीर अली, मेहदी हसन मिराज, रिशाद हुसेन, तस्किन अहमद, तन्झिम हसन साकीब, मुस्तफिजुर रहमान.
बांगलादेशचा कर्णधार नझमुल हसन शांतोने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
2nd T20I.Bangladesh won the toss and Elected to Field.https://t.co/u89lLNwmd8 #INDvBAN @IDFCFIRSTBank
— BCCI (@BCCI) October 9, 2024
हर्षित राणा पदार्पण करणार?
मयंक यादव आणि नितीश कुमार रेड्डी यांनी ग्वाल्हेरमध्ये भारतीय टी-२० संघात पदार्पण केले होते. आता असे मानले जात आहे की आणखी वेगवान गोलंदाज दुसऱ्या टी-२० मध्येही पदार्पण करू शकतो. हर्षित राणा त्याच्या घरच्या मैदानावर भारतासाठी पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळू शकतो. आता प्रश्न असा येतो की हर्षित राणाच्या पदार्पणासाठी कोणत्या खेळाडूला वगळले जाईल? यामध्ये पहिले नाव समोर येत आहे ते म्हणजे नितीश कुमार रेड्डी. तो फक्त एकच सामना खेळला आहे, पण संघ व्यवस्थापन त्याला हर्षितसाठी बाहेर ठेऊ शकते. त्याच्या जागी चौथ्या क्रमांकावर रियान पराग फलंदाजी करू शकतो. पहिल्या सामन्यात त्याला फलंदाजीची संधी मिळाली नव्हती.
दिल्लीच्या खेळपट्टीचा अहवाल
इतिहास साक्षी आहे की अरुण जेटली स्टेडियमची खेळपट्टी बहुतांशी फलंदाजीसाठी अनुकूल आहे. या मैदानाच्या सीमारेषा लहान असल्याने चौकार-षटकार मारणे सोपे जाते. आयपीएल २०२४ मध्ये, या मैदानावर खेळल्या गेलेल्या शेवटच्या ५ सामन्यांपैकी ८ डावांमध्ये २०० किंवा त्याहून अधिक धावा झाल्या आहेत. दुसरीकडे, जसजसा सामना पुढे सरकतो, तसतशी फिरकी गोलंदाजांना खेळपट्टीकडून मदत मिळू लागते. आंतरराष्ट्रीय सामन्यांबद्दल बोलायचे झाले तर या मैदानावर पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या १३९ धावांची आहे. प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला १३ सामन्यांत केवळ ४ वेळा विजय मिळवता आला आहे.
Gwalior ✈️ Delhi#TeamIndia have arrived for the 2nd #INDvBAN T20I ??@IDFCFIRSTBank pic.twitter.com/jBWuxzD0Qe
— BCCI (@BCCI) October 8, 2024
बांगलादेशला आपली सर्वोत्तम कामगिरी करावी लागेल
भारतीय संघात वॉशिंग्टन सुंदर देखील आहे जो रवींद्र जडेजाच्या T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर या फॉरमॅटमध्ये अष्टपैलू खेळाडूसाठी आपला दावा मजबूत करण्याचा प्रयत्न करेल. बांगलादेशचा विचार करता, मालिका जिवंत ठेवायची असेल तर त्यांना सर्वोत्तम कामगिरी करावी लागेल. या सामन्याची नाणेफेक साडेसहाला होणार असून सामनाला सुरु होईल.
? Delhi
— BCCI (@BCCI) October 9, 2024
Heading into the 2nd #INDvBAN T20I with energy, excitement and some banter ?#TeamIndia | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/dUyk2W0DE8
भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये काही बदल होणार का?
पहिल्या सामन्यात सहज विजयाची नोंद करणाऱ्या भारतीय संघात कोणताही बदल होण्याची शक्यता नाही. वेगवान गोलंदाज मयंक यादव आणि अष्टपैलू नितीश कुमार रेड्डी यांनी पहिला सामना खेळताना ग्वाल्हेरमध्ये आपला प्रभाव सोडला होता. अर्शदीप सिंगने वेगवान गोलंदाजीची भूमिका चांगल्या प्रकारे पार पाडली तर फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्तीने तीन वर्षांनंतर यशस्वी पुनरागमन केले.
3⃣, 2⃣, 1⃣ & Let's Play!
— BCCI (@BCCI) October 6, 2024
Action Time in Gwalior ?
Live – https://t.co/Q8cyP5jXLe#INDvBAN | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/oewhxDke6F
India vs Bangladesh 2nd T20 Match Highlights Cricket Score Updates : भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील दुसरा टी-२० सामना रविवारी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात भारताने ८६ धावांनी विजय मिळत घरच्या मैदानावर सलग सातवी मालिका जिंकली.