IND vs BAN Men’s T20 Match Live Score Today: भारत वि बांगलादेश यांच्यात तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील तिसरा सामना खेळवला जात आहे. भारतीय संघाने सुरूवातीच्या दोन्ही सामन्यात दणदणीत विजय मिळवत मालिका आपल्या नावे केली आहे. सलग तिसऱ्या सामन्यात विजय मिळवत सूर्यकुमार यादवच्या नेतृत्त्वाखालील संघाची नजर मालिका क्लीन स्वीप करण्याकडे असेल. भारतीय संघाने तिन्ही विभागांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत बांगलादेशला बॅकफूटवर ठेवले. तर तिसऱ्या सामन्यात विजय मिळवण्यावर बांगलादेशचा जोर असेल.

Live Updates

India vs Bangladesh 3rd T20 Match Live Cricket Score Update : भारत वि बांगलादेश तिसऱ्या टी-२० सामन्याचे लाईव्ह अपडेट्स

19:42 (IST) 12 Oct 2024
IND vs BAN: संजू सॅमसनचे झंझावाती अर्धशतक

संजू सॅमसनने अवघ्या २० चेंडूत अर्धशतक झळकावत बांगलादेशच्या गोलंदाजांची धुलाई केली आहे. सूर्या-संजूच्या भागीदारीसह भारताने पॉवरप्लेमध्ये ८२ धावा केल्या. यात संजू सॅमसनचे मोठे योगदान आहे. संजूने ८ चौकार आणि २ षटकारांसह ५३ धावा केल्या आहेत. संजू सॅमसनने बांगलादेशविरूद्ध सर्वात जलद अर्धशतक झळकावले आहे.

19:38 (IST) 12 Oct 2024
IND vs BAN: पॉवरप्ले

भारतीय संघाने पॉवरप्लेमध्ये १ बाद ८२ धावा केल्या आहेत. भारताच्या टी-२० मधील पॉवरप्लेमधील सर्वाधिक धावा आहेत. संजूने १३ चेंडूत ३५ धावा तर सूर्या १९ चेंडूत ३७ धावांवर खेळत आहे.

19:31 (IST) 12 Oct 2024
IND vs BAN: सूर्या-संजूचं वादळ

संजू सॅमसन आणि सूर्यकुमार यादवने चौकार-षटकारांचा पाऊस पाडत अवघ्या ५ षटकांत १ बाद ६३ धावा केल्या आहेत. संजूने एका षटकात चौकारांचा चौकार लगावला. तर सूर्यकुमार संधी मिळेल तिथे मोठे फटके लगावत आहे. सूर्या २१ धावा तर संजू ३७ धावांवर खेळत आहे.

19:18 (IST) 12 Oct 2024
IND vs BAN: भारताला बसला पहिला धक्का

भारताला तिसऱ्या षटकातील पहिल्याच चेंडूवर पहिला धक्का बसला. तन्झीमच्या षटकातील पहिल्याच चेंडूवर मोठा फटका खेळताना अभिषेक शर्मा पुन्हा एकदा बाद झाला आहे. या मालिकेत अभिषेक शर्माला मोठी खेळी करता आलेली नाही आणि पुन्हा एकदा सारख्याच पद्धतीने बाद झाला. यासह भारताने पहिल्या विकेटनंतर चांगलं पुनरागमन केलं आणि सूर्याने येताच षटकाराने आपलं खातं उघडलं.

19:05 (IST) 12 Oct 2024
IND vs BAN: भारताच्या डावाला सुरूवात

भारत वि बांगलादेश तिसऱ्या टी-२० सामन्याला सुरूवात झाली असून भारतीय संघाकडून अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसनची जोडी फलंदाजीसाठी उतरली आहे. तर मेहदी हसन मिराजने गोलंदाजीला सुरूवात केली. पहिल्याच षटकात अभिषेकने चौकार मारत ७ धावा धावफलकावर लावल्या आहेत.

18:40 (IST) 12 Oct 2024
IND vs BAN: बांगलादेश (प्लेइंग इलेव्हन):

परवेझ हुसेन इमॉन, लिटन दास (यष्टीरक्षक), नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), तन्झिद हसन, तौहिद हृदयॉय, महमुदुल्ला, महेदी हसन, तस्किन अहमद, रिशाद हुसेन, मुस्तफिजुर रहमान, तन्झिम हसन साकिब

18:34 (IST) 12 Oct 2024
IND vs BAN: भारत (प्लेइंग इलेव्हन):

संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), नितीश रेड्डी, हार्दिक पंड्या, रियान पराग, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, मयंक यादव

18:31 (IST) 12 Oct 2024
IND vs BAN: नाणेफेक

भारत-बांगलादेश तिसऱ्या टी-२० सामन्याची नाणेफेक भारताने जिंकली आहे आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर बांगलादेशचा संघ गोलंदाजीने सामन्याला सुरूवात करणार आहे. दोन्ही संघांनी प्लेईंग इलेव्हनमध्ये बदल केले आहेत. भारताच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये एक मोठा बदल करण्यात आला आहे. सूर्यकुमार यादवने अर्शदीपच्या जागी रवी बिश्नोईला संघात संधी दिली आहे.

18:18 (IST) 12 Oct 2024
IND vs BAN: हैदराबादमधील हवामान

भारत-बांगलादेश तिसऱ्या टी-२० सामना हैदराबादमध्ये खेळवला जात आहे. सामना सुरू होण्यापूर्वी पावसाने हजेरी लावली होती. पण आता पाऊस थांबला असून मैदानावरील कव्हर हटवण्यात येत आहेत. त्यामुळे सामन्याची नाणेफेक वेळेत होणार आहे.

18:00 (IST) 12 Oct 2024
IND vs BAN: बिष्णोई-हर्षितला संधी मिळणार?

फिरकीपटू रवी बिश्नोई आणि वेगवान गोलंदाज हर्षित राणा यांना तिसऱ्या टी-२० सामन्यात प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी मिळू शकते. दोघांनी अद्याप या मालिकेत एकही सामना खेळलेला नाही.

17:35 (IST) 12 Oct 2024
IND vs BAN: बांगलादेश खेळाडूचा अखेरचा टी-२० सामना

बांगलादेशचा दिग्गज खेळाडू महमुदुल्लाहचा हा शेवटचा टी-२० आंतरराष्ट्रीय सामना असेल. त्याने संघासाठी सर्वाधिक १४१ टी-२० सामने खेळले आहेत. भारत बांगलादेश दुसऱ्या टी-२० सामन्यापूर्वी महमुदुल्लाहने पत्रकार परिषदेत निवृत्ती घेणार असल्याचे जाहीर केले.

17:33 (IST) 12 Oct 2024
IND vs BAN: पावसाचे सावट

३ सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघ २-० ने आघाडीवर आहे. त्यामुळे भारताचे लक्ष्य निर्भेळ विजयावर असेल. पण या दुसऱ्या टी-२० सामन्यावर पावसाचे सावट आहे. ४० टक्के पावसाची शक्यता आहे.

17:29 (IST) 12 Oct 2024
IND vs BAN: तिसरा टी-२० सामना

भारत-बांगलादेशमधील तिसरा टी-२० सामना हैदराबादमध्ये खेळवला जाणार आहे. तिलक वर्मा आणि नितीशकुमार रेड्डी हे दोघेही मूळचे हैदराबादचे असून त्यांच्या घरच्या मैदानावर हा सामना खेळवला जाणार आहे.

IND vs BAN 3rd T20I

India vs Bangladesh 3rd T20 Match Live Score, 12 October 2024: भारत वि बांगलादेशमधील तिसरा टी-२० सामना आज हैदराबादमध्ये खेळवला जात आहे. भारतीय संघाची नजर मालिका क्लीन स्वीप करण्याकडे असेल.