IND vs BAN Men’s T20 Match Live Score Today: भारत वि बांगलादेश यांच्यात तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील तिसरा सामना खेळवला जात आहे. भारतीय संघाने या सामन्यात टी-२० क्रिकेटमधील सर्वात मोठी धावसंख्या उभारली आहे. भारताने प्रथम फलंदाजी करताना ६ बाद २९७ धावा केल्या आहेत. यासह भारताने कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या संघाविरूद्ध सर्वात मोठी धावसंख्या उभारली आहे. संजू सॅमसनने टी-२० क्रिकेटमधील पहिले शतक झळकावले तर सूर्यकुमार यादवने शानदार ७५ धावा केल्या. सूर्यकुमार यादव आणि संजू सॅमसनने उत्कृष्ट भागीदारी रचत भारताला मोठी धावसंख्या उभारण्यात मदत केली. यानंतर हार्दिक पंड्या ४७ धावा आणि रियान पराग ३४ धावा यांनी भारताचा डाव पुढे नेला. तर रिंकू सिंगने अखेरच्या चेंडूवर षटकार खेचत भारताला २९७ धावांवर नेऊन ठेवले.

Live Updates

India vs Bangladesh 3rd T20 Match Live Cricket Score Update : भारत वि बांगलादेश तिसऱ्या टी-२० सामन्याचे लाईव्ह अपडेट्स

21:54 (IST) 12 Oct 2024
IND vs BAN: १० षटकांत बांगलादेश

बांगलादेशने १० षटकांत ३ बाद ९४ धावा केल्या आहेत. तौहिद १९ धावा तर लिटन दास ३७ धावांवर खेळत आहे. बांगलादेशला विजयासाठी ६० चेंडूत २०४ धावांची गरज आहे.

21:44 (IST) 12 Oct 2024
IND vs BAN: भारताच्या खात्यात तिसरी विकेट

रवी बिश्नोईच्या सहाव्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर कर्णधार नजमुल हसन शांतोला बाद करत भारताला सर्वात मोठी विकेट मिळवून दिली आहे. शांतो १४ धावा करत बाद झाला. यासह भारताने ३ बाद ५९ धावा केल्या आहेत.

21:37 (IST) 12 Oct 2024
IND vs BAN: पाच चौकार

लिटन दासने नितीश रेड्डीच्या षटकात ५ चौकार लगावले. यासह बांगलादेशला थोडा दिलासा मिळाला आहे. यासह बांगलादेशची धावसंख्या २ बाद ५९ धावा आहे.

21:33 (IST) 12 Oct 2024
IND vs BAN: दुसरी विकेट

वॉशिंग्टन सुंदरच्या चौथ्या षटकातील पहिल्या चेंडूवर तन्झीद हसनला झेलबाद केले. वरूण चक्रवर्तीने उत्कृष्ट झेल टिपक भारताला दुसरी विकेट मिळवून दिली. ४ षटकांनंतर बांगलादेशची धावसंख्या २ बाद ३९ धावा आहे.

21:09 (IST) 12 Oct 2024
IND vs BAN: पहिल्याच चेंडूवर विकेट

मयंक यादवने पहिल्याच चेंडूवर बांगलादेशचा सलामीवीर परवेजला बाद केले. रियान परागने उत्कृष्ट झेल टिपत पहिली विकेट मिळवून दिली. बांगलादेशने पहिल्या षटकात १ बाद ५ धावा केल्या आहेत. तर बांगलादेशने परवेजबरोबर तन्झीद हसनला सलामीसाठी पाठवले होते. तर परवेज बाद झाल्यानंतर लिटन दास फलंदाजीसाठी आला आहे. पहिल्याच चेंडूवर विकेट घेणाऱ्या भारतीय गोलंदाजांच्या यादीत तो सामील झाला आहे. ज्यामध्ये भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, हार्दिक पंड्या हे गोलंदाज आहेत.

21:06 (IST) 12 Oct 2024
IND vs BAN: बांगलादेशच्या डावाला सुरूवात

भारताने दिलेल्या २९८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशतडून परवेज आणि तन्झीदची जोडी मैदानात आली आहे. भारताकडून मयंकने गोलंदाजीला सुरूवात केली.

20:57 (IST) 12 Oct 2024
IND vs BAN: सर्वात मोठी धावसंख्या

भारताने टी-२० क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठी धावसंख्या उभारली आहे. भारताने बांगलादेशविरूद्ध प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ६ बाद २९७ धावा केल्या आहेत. सूर्यकुमार यादवने ७५ धावा तर संजू सॅमसनने १११ धावा केल्या. या दोघांनीही सर्वात मोठी भागीदारी रचत भारताच्या नावे हा विक्रम नोंदवला आहे. तर सूर्या-संजूनंतर हार्दिकने १७ चेंडूत ४७ धावा करत बाद झाला. भारताने यापूर्वी श्रीलंकेविरूद्ध ५ बाद २६० धावा केल्या होत्या.

20:56 (IST) 12 Oct 2024
IND vs BAN: सलग दोन विकेट

२० षटकांतील तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर तन्झीमने हार्दिक पंड्या आणि नुकत्याच आलेल्या नितीश रेड्डीला झेलबाद करत सलग दोन विकेट घेतले आहेत.

20:49 (IST) 12 Oct 2024
IND vs BAN: रियान पराग बाद

तस्कीन अहमदच्या १९व्या षटकातील चौथ्या चेंडूवर १३ चेंडूत ३४ धावा करत बाद झाला. रियान आणि हार्दिकला एकेकदा जीवदान मिळालं तर भारताची तुफानी फटकेबाजी पाहून बांगलादेशचे गोलंदाजही बिथरले.

20:43 (IST) 12 Oct 2024
IND vs BAN: २५० धावा

भारताने १७ षटकांत २५० धावांचा टप्पा गाठला आहे. १७ षटकांनंतर भारताची धावसंख्या ३ बाद २५२ धावा आहे. हार्दिक पंड्या २३ धावा तर रियान पराग २५ धावांवर खेळत आहे.

20:29 (IST) 12 Oct 2024
IND vs BAN: १५ षटकांत २१३ धावा

सूर्यकुमार यादव आणि संजू सॅमसनच्या विक्रमी १७३ धावांच्या भागीदारीसह भारताने १५ षटकांत ३ बाद २१३ धावांचा टप्पा गाठला आहे. सध्या मैदानात रियान पराग आणि हार्दिक पंड्याची जोडी मैदानात आहे.

20:24 (IST) 12 Oct 2024
IND vs BAN: सूर्या झेलबाद

१५व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर सूर्यकुमार यादव झेलबाद झाला. सूर्याने बाद होण्यापूर्वी ३५ चेंडूत ५ षटकार आणि ८ चौकारांसह ७५ धावा केल्या आहेत.

20:24 (IST) 12 Oct 2024
संजूचे शतक

१४व्या षटकातील चौथ्या चेंडूवर संजू सॅमसनच्या वादळी फलंदाजीला ब्रेक लागला आहे. संजूने ४७ चेंडूत ११ चौकार आणि ६ षटकारांसह १११ धावा करत बाद झाला.

20:17 (IST) 12 Oct 2024
IND vs BAN: संजूचे शतक

संजू सॅमसनने टी-20 क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वात जलद शतक झळकावले आहे. यासह त्याने रोहित शर्माचा एक मोठा विक्रम मोडित काढला आहे. संजूने ८ षटकार आणि ९ चौकारांसह आपले शतक झळकावले.

20:11 (IST) 12 Oct 2024
IND vs BAN: विक्रमी भागीदारी

संजू सॅमसन आणि सूर्यकुमार यादवने आतापर्यंत ५९ चेंडूत १५९ धावांची भागीदारी रचली आहे. भारताकडून कोणत्याही संघाविरूद्ध केलेली ही सर्वात मोठी भागीदारी आहे.

20:04 (IST) 12 Oct 2024
IND vs BAN: सूर्यकुमार यादव

सूर्यकुमार यादवने २२ चेंडूत आपले २९ अर्धशतक झळकावले आहे. भारताची धावसंख्या अशारितीने ११ षटकांनंतर १ बाद १६६ धावांवर जाऊ धडकली आहे.

19:59 (IST) 12 Oct 2024
IND vs BAN: संजू सॅमसनचे ५ षटकार

संजू सॅमसनने १० व्या षटकात सलग पाच षटकार लगावत आपला क्लास दाखवून दिला आहे. संजूने अवघ्या ३५ चेंडूत ९२ धावांचा टप्पा गाठला आहे. संजू सॅमसनने वादळी फलंदाजी करत बांगलादेशच्या गोलंदाजांची बेदम धुलाई केली आहे.

19:42 (IST) 12 Oct 2024
IND vs BAN: संजू सॅमसनचे झंझावाती अर्धशतक

संजू सॅमसनने अवघ्या २० चेंडूत अर्धशतक झळकावत बांगलादेशच्या गोलंदाजांची धुलाई केली आहे. सूर्या-संजूच्या भागीदारीसह भारताने पॉवरप्लेमध्ये ८२ धावा केल्या. यात संजू सॅमसनचे मोठे योगदान आहे. संजूने ८ चौकार आणि २ षटकारांसह ५३ धावा केल्या आहेत. संजू सॅमसनने बांगलादेशविरूद्ध सर्वात जलद अर्धशतक झळकावले आहे.

19:38 (IST) 12 Oct 2024
IND vs BAN: पॉवरप्ले

भारतीय संघाने पॉवरप्लेमध्ये १ बाद ८२ धावा केल्या आहेत. भारताच्या टी-२० मधील पॉवरप्लेमधील सर्वाधिक धावा आहेत. संजूने १३ चेंडूत ३५ धावा तर सूर्या १९ चेंडूत ३७ धावांवर खेळत आहे.

19:31 (IST) 12 Oct 2024
IND vs BAN: सूर्या-संजूचं वादळ

संजू सॅमसन आणि सूर्यकुमार यादवने चौकार-षटकारांचा पाऊस पाडत अवघ्या ५ षटकांत १ बाद ६३ धावा केल्या आहेत. संजूने एका षटकात चौकारांचा चौकार लगावला. तर सूर्यकुमार संधी मिळेल तिथे मोठे फटके लगावत आहे. सूर्या २१ धावा तर संजू ३७ धावांवर खेळत आहे.

19:18 (IST) 12 Oct 2024
IND vs BAN: भारताला बसला पहिला धक्का

भारताला तिसऱ्या षटकातील पहिल्याच चेंडूवर पहिला धक्का बसला. तन्झीमच्या षटकातील पहिल्याच चेंडूवर मोठा फटका खेळताना अभिषेक शर्मा पुन्हा एकदा बाद झाला आहे. या मालिकेत अभिषेक शर्माला मोठी खेळी करता आलेली नाही आणि पुन्हा एकदा सारख्याच पद्धतीने बाद झाला. यासह भारताने पहिल्या विकेटनंतर चांगलं पुनरागमन केलं आणि सूर्याने येताच षटकाराने आपलं खातं उघडलं.

19:05 (IST) 12 Oct 2024
IND vs BAN: भारताच्या डावाला सुरूवात

भारत वि बांगलादेश तिसऱ्या टी-२० सामन्याला सुरूवात झाली असून भारतीय संघाकडून अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसनची जोडी फलंदाजीसाठी उतरली आहे. तर मेहदी हसन मिराजने गोलंदाजीला सुरूवात केली. पहिल्याच षटकात अभिषेकने चौकार मारत ७ धावा धावफलकावर लावल्या आहेत.

18:40 (IST) 12 Oct 2024
IND vs BAN: बांगलादेश (प्लेइंग इलेव्हन):

परवेझ हुसेन इमॉन, लिटन दास (यष्टीरक्षक), नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), तन्झिद हसन, तौहिद हृदयॉय, महमुदुल्ला, महेदी हसन, तस्किन अहमद, रिशाद हुसेन, मुस्तफिजुर रहमान, तन्झिम हसन साकिब

18:34 (IST) 12 Oct 2024
IND vs BAN: भारत (प्लेइंग इलेव्हन):

संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), नितीश रेड्डी, हार्दिक पंड्या, रियान पराग, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, मयंक यादव

18:31 (IST) 12 Oct 2024
IND vs BAN: नाणेफेक

भारत-बांगलादेश तिसऱ्या टी-२० सामन्याची नाणेफेक भारताने जिंकली आहे आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर बांगलादेशचा संघ गोलंदाजीने सामन्याला सुरूवात करणार आहे. दोन्ही संघांनी प्लेईंग इलेव्हनमध्ये बदल केले आहेत. भारताच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये एक मोठा बदल करण्यात आला आहे. सूर्यकुमार यादवने अर्शदीपच्या जागी रवी बिश्नोईला संघात संधी दिली आहे.

18:18 (IST) 12 Oct 2024
IND vs BAN: हैदराबादमधील हवामान

भारत-बांगलादेश तिसऱ्या टी-२० सामना हैदराबादमध्ये खेळवला जात आहे. सामना सुरू होण्यापूर्वी पावसाने हजेरी लावली होती. पण आता पाऊस थांबला असून मैदानावरील कव्हर हटवण्यात येत आहेत. त्यामुळे सामन्याची नाणेफेक वेळेत होणार आहे.

18:00 (IST) 12 Oct 2024
IND vs BAN: बिष्णोई-हर्षितला संधी मिळणार?

फिरकीपटू रवी बिश्नोई आणि वेगवान गोलंदाज हर्षित राणा यांना तिसऱ्या टी-२० सामन्यात प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी मिळू शकते. दोघांनी अद्याप या मालिकेत एकही सामना खेळलेला नाही.

17:35 (IST) 12 Oct 2024
IND vs BAN: बांगलादेश खेळाडूचा अखेरचा टी-२० सामना

बांगलादेशचा दिग्गज खेळाडू महमुदुल्लाहचा हा शेवटचा टी-२० आंतरराष्ट्रीय सामना असेल. त्याने संघासाठी सर्वाधिक १४१ टी-२० सामने खेळले आहेत. भारत बांगलादेश दुसऱ्या टी-२० सामन्यापूर्वी महमुदुल्लाहने पत्रकार परिषदेत निवृत्ती घेणार असल्याचे जाहीर केले.

17:33 (IST) 12 Oct 2024
IND vs BAN: पावसाचे सावट

३ सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघ २-० ने आघाडीवर आहे. त्यामुळे भारताचे लक्ष्य निर्भेळ विजयावर असेल. पण या दुसऱ्या टी-२० सामन्यावर पावसाचे सावट आहे. ४० टक्के पावसाची शक्यता आहे.

17:29 (IST) 12 Oct 2024
IND vs BAN: तिसरा टी-२० सामना

भारत-बांगलादेशमधील तिसरा टी-२० सामना हैदराबादमध्ये खेळवला जाणार आहे. तिलक वर्मा आणि नितीशकुमार रेड्डी हे दोघेही मूळचे हैदराबादचे असून त्यांच्या घरच्या मैदानावर हा सामना खेळवला जाणार आहे.

India vs Bangladesh 3rd T20 Match Live Score, 12 October 2024: भारत वि बांगलादेशमधील तिसरा टी-२० सामना आज हैदराबादमध्ये खेळवला जात आहे. भारतीय संघाची नजर मालिका क्लीन स्वीप करण्याकडे असेल.