IND vs BAN Men’s T20 Match Highlights: भारत वि बांगलादेश यांच्यात तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील तिसरा सामना खेळवला जात आहे. भारतीय संघाने या सामन्यात टी-२० क्रिकेटमधील सर्वात मोठी धावसंख्या उभारली आहे. भारताने प्रथम फलंदाजी करताना ६ बाद २९७ धावा केल्या आहेत. यासह भारताने कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या संघाविरूद्ध सर्वात मोठी धावसंख्या उभारली आहे. संजू सॅमसनने टी-२० क्रिकेटमधील पहिले शतक झळकावले तर सूर्यकुमार यादवने शानदार ७५ धावा केल्या. सूर्यकुमार यादव आणि संजू सॅमसनने उत्कृष्ट भागीदारी रचत भारताला मोठी धावसंख्या उभारण्यात मदत केली. यानंतर हार्दिक पंड्या ४७ धावा आणि रियान पराग ३४ धावा यांनी भारताचा डाव पुढे नेला. तर रिंकू सिंगने अखेरच्या चेंडूवर षटकार खेचत भारताला २९७ धावांवर नेऊन ठेवले. त्यानंतर बांगलादेशचा संघ १३३ धावांवर सर्वबाद झाला. भारताकडून रवी बिश्नोईने सर्वाधिक ३ विकेट घेतले. संजू सॅमसनला सामनावीर आणि हार्दिक पंड्याला संपूर्ण मालिकेत उत्कृष्ट कामगिरी केल्यामुळे मालिकावीराचा पुरस्कार मिळाला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा