५१३ धावांचा पाठलाग करताना बांगलादेश दिवसअखेर ६ बाद २७२; पदार्पणात झाकीरचे शतक

चट्टोग्राम : बांगलादेशचा सलामीवीर झाकीर हसनने कसोटी पदार्पणात शतक झळकावले. मात्र, अक्षर पटेलच्या नेतृत्वाखाली फिरकीपटूंनी भारताला पुनरागमन करून दिले. त्यामुळे बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतीय संघ विजयासमीप पोहोचला आहे. भारताने दिलेल्या ५१३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशची चौथ्या दिवसअखेर ६ बाद २७२ अशी धावसंख्या होती. विजयासाठी त्यांना अजूनही २४१ धावांची गरज आहे.

चौथ्या दिवशी बांगलादेशचे सलामीवीर झाकीर (२२४ चेंडूंत १०० धावा) आणि नजमुल हुसेन शांटो (१५६ चेंडूंत ६७) यांनी पहिल्या गडय़ासाठी १२४ धावांची भागीदारी रचली. मात्र, अखेरच्या दोन सत्रांत भारताला पुनरागमन करण्यात यश आले. भारताकडून अक्षर पटेलने ५० धावांत तीन बळी बाद केले. त्याला उमेश यादव, रविचंद्रन अश्विन आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी एक-एक बळी मिळवत उत्तम साथ दिली.

IND vs ENG Saqib Mahmood Triple Maiden Wicket Over
IND vs ENG: कानामागून आला, भारी पडला! व्हिसा दिरंगाई बाजूला सारत मेहमूदने भारताची उडवली दाणादाण, ३ चेंडूत ३ विकेट
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Usman Khawaja becomes first Australian to score a Test double century in Sri Lanka at Galle
Usman Khawaja Double Century : उस्मान ख्वाजाचे ऐतिहासिक द्विशतक! श्रीलंकेत ‘हा’ खास पराक्रम करणारा ठरला पहिला ऑस्ट्रेलियन
Hardik Pandya knock put pressure on other India batters say Parthiv Patel after Team India defeat against England
IND vs ENG : ‘त्याच्या संथ खेळीमुळे इतर फलंदाजांवर दबाव वाढला,’ माजी खेळाडूने भारताच्या पराभवाचे खापर हार्दिकवर फोडले
IND vs ENG I dont think the toss went against us says Varun Chakravarthy after England defeat India at at Rajkot
IND vs ENG : नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा टीम इंडियाचा निर्णय महागात पडला का? वरुण चक्रवर्तीने दिले ‘हे’ उत्तर
We always learn from a T20I Game Says Suryakumar Yadav after defeat against England in 3rd T20I
IND vs ENG : ‘…म्हणून पराभव पदरी पडला’, सूर्यकुमार यादवने सांगितला राजकोट सामन्यातील टर्निंग पॉइंट
England Beat India by 26 Runs Varun Chakravarthy Fifer Ben Duckett fifty IND vs ENG
IND vs ENG: टीम इंडियाची हुकली विजयाची हॅट्ट्रिक! इंग्लंडचं टी-२० मालिकेत दणक्यात पुनरागमन; वरूण चक्रवर्तीच्या कामगिरीवर फेरलं पाणी
Tilak Verma and Suryakumar Yadav victory celebration video goes viral after India won Chepauk
Tilak Verma : तिलकच्या वादळी खेळीने जिंकलं सूर्याचं मन, वाकून सलाम करतानाचा VIDEO होतोय व्हायरल

भारताला पहिल्या सत्रात एकही बळी मिळवता आला नाही, मात्र दुसऱ्या सत्रात भारतीय गोलंदाजांनी तीन बळी मिळवले. यादरम्यान भारताने केवळ ५७ धावा दिल्या. चौथ्या दिवशी बांगलादेशने बिनबाद ४२ धावांच्या पुढे खेळताना उपाहारापर्यंत ११९ धावसंख्येपर्यंत मजल मारली. बांगलादेशने तिसऱ्या सत्रात ९६ धावा केल्या. या सत्रात कर्णधार शाकिब अल हसनने (नाबाद ४०) आक्रमक खेळ करत बांगलादेशच्या धावसंख्येत भर घातली. खेळ थांबला तेव्हा शाकिबसह मेहदी हसन मिराज (नाबाद ९) खेळपट्टीवर होता. झाकीरने पहिल्या दोन सत्रांत बांगलादेशची एक बाजू सांभाळली. मात्र, शतक पूर्ण झाल्यानंतर त्याची एकाग्रता भंग पावली. अक्षरच्या गोलंदाजीवर चौकार मारत त्याने आपले शतक पूर्ण केले, पण पुढील षटकात अश्विनने त्याला माघारी पाठवले.

त्यापूर्वी उमेश यादवने शांटोला बाद करत भारताला पहिले यश मिळवून दिले. यानंतर अक्षरने यासिर अलीला (५) माघारी पाठवत बांगलादेशला दुसरा धक्का दिला. यानंतर कुलदीपने लिटन दासला (१९) बाद केले. अक्षरने मुशफिकूर रहीम (२३) आणि नुरुल हसनला (३) माघारी पाठवत बांगलादेशच्या अडचणीत भर घातली.

संक्षिप्त धावफलक 

भारत (पहिला डाव) : ४०४

बांगलादेश (पहिला डाव) : १५०

भारत (दुसरा डाव) : २ बाद २५८ डाव घोषित

बांगलादेश (दुसरा डाव) : १०२ षटकांत ६ बाद २७२ (झाकीर हसन १००, नजमुल हुसेन शांटो ६७, शाकिब अल हसन नाबाद ४०; अक्षर पटेल ३/५०, उमेश यादव १/२७)

Story img Loader