IND vs BAN 1st Test Day 2 Live Updates, 20 September 2024: भारत आणि बांगलादेश यांच्यात चेन्नईत सुरू असलेल्या कसोटी सामन्याचा आज दुसरा दिवस आहे. गुरुवारी पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने ६ गडी गमावून ३३९ धावा केल्या होत्या. तर दुसऱ्या दिवशी भारतीय संघ ३७६ धावा करत सर्वबाद झाला. यानंतर फलंदाजीला उतरलेल्या भारतीय संघाने आतापर्यंत बांगलादेशचा निम्मा संघ तंबूत धाडला आहे.

हेही वाचा – IND vs BAN: “तो बांगलादेशचा संघ आहे, त्यामुळे…”, सेहवागचा ‘तो’ सल्ला अश्विन-जडेजाने मानला अन् बांगलादेशी गोलदाजांची केली धुलाई

Virat Kohli chanted om namah shivay Gautam Gambhir listened Hanuman Chalisa
कोहलीने कोणत्या सीरिजमध्ये प्रत्येक चेंडूपूर्वी ओम नम: शिवाय म्हटलं? गंभीरसाठी हनुमान चालिसा कशी ठरली किमयागार?
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Virat Kohli Jersey Flaunts by Fan During Babar Azam Match in Pakistan Champions Cup video
Video: पाकिस्तानमध्ये विराटची जबरदस्त क्रेझ, बाबर आझमच्या सामन्यात चाहत्याने दाखवली किंग कोहलीची जर्सी
Bangladesh Captain Big Statement Ahead of IND vs BAN test Series
IND vs BAN: “ते क्रमवारीत पुढे असले तरी…”, कसोटी मालिकेआधी बांगलादेशच्या कर्णधाराचं भारतीय संघाला आव्हान, नेमकं काय म्हणाला?
Virat Kohli Breaks Wall of Chepauk Dressing Room During Practice Session In Chennai
Virat Kohli: कोहलीचा विषय लय हार्डय! विराट कोहलीच्या एका शॉटने भिंतीला पाडलं भगदाड, VIDEO व्हायरल
How Divya Deshmukh Wins with Match Winning Move in Just 17 seconds left on clock in Chess Olympiad
Chess Olympiad 2024: १७ सेकंद शिल्लक असताना दिव्या देशमुखने कशी मारली बाजी? निसटलेल्या सामन्यात अनपेक्षित चाल खेळून मिळवला विजय
IND vs BAN Team India squad announced for 1st match against bangladesh
IND vs BAN : बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी भारतीय संघ जाहीर! यश दयालसह ‘या’ खेळाडूंना मिळाली संधी
PAK vs BAN Mohammed Rizwan Broke Rishabh Pant and Andy Flower Record
PAK vs BAN: मोहम्मद रिझवानने मोडला ऋषभ पंतचा विक्रम, पराभूत कसोटी सामन्यात ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिला पाकिस्तानी यष्टिरक्षक

IND vs BAN 1st Test: बांगलादेश ऑल आऊट

४८ व्या षटकातील पहिल्या चेंडूवर मोहम्मद सिराजने नाहिद राणाला क्लीन बोल्ड करत बांगलादेशला ऑल आऊट केले. यासह बांगलादेशचा संघ १४९ धावा करत गारद झाला आहे. तर भारतीय संघाकडे भक्कम २२७ धावांची आघाडी आहे. भारतीय संघ आता दुसऱ्या डावासाठी फलंदाजीला उतरणार आहे.

IND vs BAN 1st Test: बांगलादेशला नववा धक्का

बांगलादेश संघाला १३० धावांवर नववा धक्का बसला. बुमराहने उत्कृष्ट यॉर्कर टाकत तस्किन अहमदला क्लीन बोल्ड केले. तस्किन ११ धावा करू शकला. सध्या नाहिद राणा आणि मेहदी हसन मिराज क्रीजवर आहेत. बुमराहला मिळालेले हे चौथे यश आहे.

IND vs BAN 1st test: फॉलोऑन

भारत वि बांगलादेशमधील पहिल्या डावात बांगलादेशला फॉलोऑनपासून वाचण्यासाठी ६५ धावांची आवश्यकता आहे. तर भारतीय संघाला बांगलादेशला ऑलआऊट करण्यासाठी २ विकेट्सची आवश्यकता आहे. ३८ षटकांनंतर बांगलादेशची धावसंख्या ८ बाद ११६ धावा आहे.

विराटने हसन महमूदला बाद करत घेतला बदला

जसप्रीत बुमराहच्या ३७व्या षटकातील पाचव्या चेंडूवर बुमराहने हसन महमूदला विराट कोहलीकरवी झेलबाद केले. बुमराहने टाकलेल्या चेंडूने हसन महमूदच्या बॅटची कड घेत स्लिपमध्ये उभ्या असलेल्या कोहलीच्या हातात गेला. यासह बांगलादेशची धावसंख्या ८ बाद ११२ धावा आहे. मेहदी हसन मिराज १२ धावा करत मैदानावर असून सध्या टी ब्रेक झाला आहे.

जडेजाच्या खात्यात दुसरी विकेट

लिट्टन दासनंतर जडेजाने पुढच्याच षटकात शकिब अल हसनलाही बाद केले. ३२ धावा करत मैदानात असलेल्या शकिबला ऋषभ पंतकरवी झेलबाद करत जडेजाने टीम इंडियाला मोठी विकेट मिळवून दिली आहे. सध्या बांगलादेशची धावसंख्या ७ बाद ९२ धावा आहे.

जडेजाने तोडली लिट्टन दास-शाकिबची भागीदारी

बांगलादेशाचे अनुभवी खेळाडू लिट्टन दास आणि शाकीब अल हसन या दोघांनीही बांगलादेशचा डाव पुढे नेला होता. दोघेही फलंदाज चांगले मैदानात सेट झाले होते आणि संधी मिळेल तसे मोठे फटकेही लगावत होते. यादरम्यानच २९वे षटक टाकण्यासाठी जडेजा आला आणि षटकातील दुसऱ्या चेंडूवर लिट्टन दास स्वीप शॉट मारायला गेला आणि चेंडू हवेत उडाला आणि सीमारेषेच्या दिशेन जात होता. तिथे बुमराहच्या जागी मैदानात आलेल्या ध्रुव जुरेलने एक शानदार झेल टिपला आणि भारताला सहावी विकेट मिळाली.

बुमराहच्या खात्यात दुसरी विकेट

बुमराहने १३व्या षटकात मुश्फिकरला भेदक गोलंदाजी करत संपूर्ण षटकात त्रास दिला अन् अखेर पाचव्या चेंडूवर त्याला स्लिपमध्ये केएल राहुलकरवी झेलबाद केले. अशारितीने बांगलादेशने ४० धावांमध्ये ५ विकेट्स गमावल्या आहेत. सध्या मैदानावर शाकिब अल हसन आणि लिट्टन दास ही जोडी आहे. २० षटकांनंतर बांगलादेशची धावसंख्या ५ बाद ६७ धावा आहे.

सिराजची पहिली विकेट

मोहम्मद सिराजने १२ व्या षटकातील पहिल्या चेंडूवर बांगलादेशचा कर्णधार नजमुल शांतोला २० धावांवर विराट कोहलीकरवी झेलबाद करत बांगलादेशला मोठा धक्का दिला.

हेही वाचा – ENG vs AUS: ट्रेव्हिस हेडने विक्रमी खेळीसह मोडला रोहित शर्माचा वनडेमधील मोठा विक्रम, ‘बॅझबॉल’चाही उडवला धुव्वा

आकाशदीपच्या एकाच षटकात दोन विकेट

आकाशदीपने ९व्या षटकात दोन विकेट्स घेत लंचपूर्वी बांगलादेशला मोठे धक्के दिले. आकाशदीपने पहिल्या चेंडूवर झकीर हुसेनला क्लीन बोल्ड केले तर तिसऱ्या चेंडूवर मोमिनुलला गोल्डन डकवर क्लीन बोल्ड करत दोन विकेट्स मिळवल्या. अशारितीने लंचपूर्वी भारताची धावसंख्या २ बाद २६ धावा आहे.

पहिली विकेट

भारताने पहिल्या डावात केलेल्या ३७६ धावांचे लक्ष्य समोर ठेवत बांगलादेशचा संघ फलंदाजीसाठी उतरला. पहिले षटक भारताकडून जसप्रीत बुमराह टाकत होता. तर बांगलादेशकडून शादमना इस्लाम आणि झकीर हुसेन हे सलामीला उतरले होते. बुमराहच्या षटकात शादमानने दोन धावा काढून फलंदाजी करत होता. तर पहिल्या षटकातील अखेरच्या चेंडूवर बुमराहने टाकलेला चेंडू शादमानने सोडला अन् चेंडू थेट विकेटवर जाऊन आदळला. अशारितीने पहिल्याच षटकात भारताला पहिले यश मिळाले.

हेही वाचा – IND vs BAN : ‘माझा मुलगा आज नक्कीच…’, अश्विनच्या वडिलांनी आधीच केले होते भाकीत; दिनेश कार्तिकचा खुलासा

भारताचा डाव ३७६ धावांवर आटोपला

रविचंद्रन अश्विन (१०२) आणि रवींद्र जडेजा (८६) आज आपला डाव पुढे नेण्यासाठी मैदानात उतरले होते. पण जडेजा आपली शतकी खेळी पूर्ण न करता ८६ धावांवरच माघारी परतला. तर अश्विनने ११३ धावा केल्या. भारताच्या या दोन्ही फलंदाजांनी ७व्या विकेटसाठी १९९ धावांची भागीदारी केली. पहिल्या दिवशी शतक झळकावणारा रविचंद्रन अश्विन ११३ धावा करत बाद झाला. तत्पूर्वी मैदानात आलेल्या आकाशदीपने झटपट १७ धावा करत चांगली कामगिरी केली आणि संघाच्या धावांमध्ये भर घातली. तर बुमराहने एका चौकारासह १७ धावा केल्या. हसन महमूदने बुमराहला झेलबाद करत या सामन्यातील पाचवी विकेट घेतली. यासह भारतीय संघ ३७६ धावा करत बाद झाला.

दोन्ही संघांची प्लेईंग इलेव्हन

भारतीय संघ :
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, आकाश दीप, मोहम्मद सिराज.

बांगलादेश संघ :
शादमान इस्लाम, झाकीर हसन, नझमुल हुसेन शांतो (कर्णधार), मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, शकीब अल हसन, लिटन दास (यष्टीरक्षक), मेहदी हसन मिराज, तस्किन अहमद, हसन महमूद, नाहिद राणा.