India vs Bangladesh Live Telecast, Cricket World Cup 2023: आयसीसी विश्वचषक २०२३ चा १७ वा सामना भारत आणि बांगलादेश यांच्यात होणार आहे. भारताने या स्पर्धेत आतापर्यंत ३ सामने खेळले असून तिन्ही जिंकले आहेत. बांगलादेशने ३ पैकी फक्त एकच सामना जिंकला आहे. त्यांनी आपली शेवटचे दोन्ही सामने गमावले आहेत. एकदिवसीय सामन्यांमध्ये बांगलादेशचा भारताविरुद्धचा विक्रम चांगला नाही. दोन्ही एकमेकाविरुद्धची आकडेवारी कशी आहे आणि हा सामना कधी, कुठे विनामूल्य पाहता येणार जाणून घेऊया.

दोन्ही संघात आतापर्यंत ४० सामने खेळले गेले आहेत.यापैकी भारताने ३१ जिंकले आहेत, तर ८ गमावले आहेत. एक सामना अनिर्णित राहिला. एवढेच नाही तर बांगलादेश संघाला वनडे फॉरमॅटमध्ये कधीही भारताला मायदेशात हरवता आलेले नाही. टीम इंडिया आणि बांगलादेश यांच्यात आतापर्यंत ३ सामने भारतात झाले असून तिन्ही सामने जिंकले आहेत.

AUS vs PAK Fans Make Fun Of Mohammad Rizwan As He Holds Pat Cummins' Hand
AUS vs PAK : ‘प्लीज मला हरवू नकोस हां…’, पॅट कमिन्सच्या हातावर हात ठेवल्याने मोहम्मद रिझवान ट्रोल, मीम्सना उधाण
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
IND vs SA T20I Series Full Schedule With Date and Time with IST And Squads India South Africa
IND vs SA: भारत-दक्षिण आफ्रिका टी-२० मालिकेचं कसं असणार वेळापत्रक? भारतीय वेळेनुसार किती वाजता असणार सामना?
The New Zealand team defeated the Indian team in the test match sport news
सपशेल अपयशाची नामुष्की; फिरकीपुढे भारताची पुन्हा दाणादाण
India cancel intra-squad match With Team India A team to focus on net practice before Border-Gavaskar Trophy IND vs AUS
IND vs AUS: भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या वेळापत्रकात मोठा बदल, ‘हा’ सामना केला रद्द, काय आहे कारण?
Mukesh Kumar sensational 6 for 46 helps India A bowl Australia A out for 195 Runs INDA vs AUSA
INDA vs AUSA: मुकेश कुमारने ६ विकेट्स घेत केला कहर, ऑस्ट्रेलिया अ १९५ वर ऑलआऊट; भारतीय अ संघाने दुसऱ्या दिवशीच घेतला बदला
ruturaj gaikwad
India A vs Aus A: युवा टीम इंडियाचा १०७ धावांत खुर्दा; यजमानांचीही डळमळीत सुरुवात
IND vs NZ Harshit Rana called up to India Test squad, likely to make debut in Mumbai against New Zealand Mumbai Test
IND vs NZ: मुंबई कसोटीपूर्वी टीम इंडियात मोठा बदल, या वेगवान गोलंदाजाची भारतीय संघात होणार एन्ट्री, पदार्पणाची मिळणार संधी

२५ डिसेंबर १९९० रोजी दोघांमधील पहिला एकदिवसीय सामना खेळला गेला होता. तो सामना भारताने ९ विकेटने जिंकला होता. भारताने १४ मे १९९८ रोजी घरच्या मैदानावर बांगलादेश विरुद्ध दुसरा एकदिवसीय सामना खेळला आणि ५ गडी राखून जिंकला होता. भारताने २५ मे १९९८ रोजी घरच्या मैदानावर बांगलादेशविरुद्ध शेवटचा एकदिवसीय सामना खेळला होका. भारतीय संघाने हा सामना ५ विकेटने जिंकला.

हेही वाचा – IND vs BAN: ‘बांगलादेशने भारताला हरवले तर…’, पाकिस्तानी अभिनेत्रीने बांगलादेशी खेळाडूंना दिली खास ऑफर

आता १९ ऑक्टोबरला भारतीय क्रिकेट संघ घरच्या मैदानावर बांगलादेशशी २५ वर्षांनी एकदिवसीय फॉर्मेटमध्ये सामना करणार आहे, तेव्हा ते आपला विजयी विक्रम ४-० ने सुधारण्याचा प्रयत्न करण्याचा निर्धाराने मैदानात उतरतील. हा सामना कधी आणि कुठे पाहता येणार जाणून घेऊया.

भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील आयसीसी विश्वचषक २०२३ मधील सामना कोणत्या तारखेला आहे?

भारत आणि बांगलादेश यांच्यात विश्वचषकातील सामना १९ ऑक्टोबर रोजी होणार आहे.

भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील विश्वचषकातील सामना किती वाजता सुरू होईल?

भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील विश्वचषकातील सामना भारतीय वेळेनुसार दुपारी ०२:०० वाजता सुरू होईल.

भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील विश्वचषकातील सामना कोणत्या मैदानावर खेळवला जाईल?

भारत आणि बांगलादेश यांच्यातील विश्वचषकातील सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर होणार आहे.

हेही वाचा – IND vs BAN: सराव सत्रात पावसाची हजेरी, सामन्यात ठरणार का अडथळा? जाणून घ्या हवामान आणि खेळपट्टीचा अहवाल

भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील सामना कोणत्या टीव्ही चॅनेलवर प्रसारित केला जाईल?

भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील आयसीसी विश्वचषक २०२३ च्या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स १ एचडी आणि स्टार स्पोर्ट्स १ हिंदीवर केले जाईल.

भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग कोठे उपलब्ध असेल?

भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील आयसीसी विश्वचषक २०२३ सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग डिज्नी प्लस हॉटस्टार अॅप आणि वेबसाइटवर उपलब्ध असेल.

भारत विरुद्ध बांगलादेश सामना भारतात विनामूल्य कुठे पाहता येणार?

चाहते डिज्नी प्लस हॉटस्टार अॅप आणि वेबसाइटवर भारत विरुद्ध बांगलादेश सामना विनामूल्य लाइव्ह पाहू शकतात.

हेही वाचा – World Cup 2023: ‘हा संघ फलंदाजी करताना…’; सौरव गांगुलीच पाकिस्तान संघाच्या विश्वचषकातील भवितव्याबद्दल मोठं वक्तव्य

परदेशात भारत विरुद्ध बांगलादेश सामन्याचे थेट प्रक्षेपण कसे पहावे?

भारत: डिज्नी प्लस हॉटस्टार अॅप आणि वेबसाइट
पाकिस्तान: पीटीव्ही स्पोर्ट्स
ऑस्ट्रेलिया: 9 नाऊ आणि फॉक्स स्पोर्ट्स
यूएस आणि कॅनडा: इएसपीएन प्लस
यूके: स्काय स्पोर्ट्स आणि माय5
न्यूझीलंड: स्काय स्पोर्ट्स आणि स्काय गो