India national cricket team vs Bangladesh national cricket team match scorecard भारत विरुद्ध बांगलादेश कसोटी सामन्याची सुरुवात भारतीय संघासाठी फारच खराब झाली. रोहित शर्मा, विराट कोहली आणि शुबमन गिलसारखे फलंदाज पहिल्या तासात स्वस्तात बाद होऊन माघारी परतले. खेळपट्टीकडून गोलंदाजांना खूप चांगली मदत मिळत होती, ज्याचा गोलंदाजांनी चांगला फायदा करून घेतला. बांगलादेशच्या संघाने जवळपास भारतीय संघाला बॅकफूटवर आणले होते. भारताने तिन्ही टॉप फलंदाज अवघ्या ३३ धावांत बाद झाले होते. बांगलादेशचा संघ या विकेट्सचा आनंद साजरा करत असताना रोहित शर्माने पॅव्हेलियनमधून मास्टरस्ट्रोक खेळला.

बांगलादेशचा संघ तीन विकेट घेऊन भारतीय क्रिकेटला बॅकफूटवर टाकण्याचा आनंद साजरा करत असताना कर्णधार रोहित शर्माने अशी चाल खेळली की बांगलादेशच्या आनंदावर विरजण पडले आणि भारताचा डाव पुन्हा रूळावर आला. खेळपट्टीवर उजव्या हाताच्या फलंदाजांना फलंदाजी करताना अडचणी येत होत्या आणि डाव्या हाताचे फलंदाज सहज धावा काढत होते.

Ajit Doval
Ajit Doval : अमेरिकेतील न्यायालयाचं भारत सरकार व अजित डोवालांना समन्स, नेमकं प्रकरण काय?
19th rashibhavishya in marathi
१९ सप्टेंबर पंचांग: वृद्धी योग राशीच्या कुंडलीत बदल…
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य पुन्हा येईल, अशी स्थिती…”; शरद पवारांचं वक्तव्य चर्चेत
Who is Jaydeep Apte in Marathi
Jaydeep Apte : जयदीप आपटेला पोलिसांनी हाक मारली, रडत गयावया करु लागला आणि म्हणाला; “मला…”
Rishabh Pant Litton Das Heated Argument In IND vs BAN 1st Test
Rishabh Pant: “मला रोखून चेंडू का मारतो आहेस…”, ऋषभ पंत आणि लिट्टन दास मैदानातच भिडले, पाहा VIDEO
IND vs BAN Shubman Gill Bharat Ka Babar Azam
IND vs BAN : ‘शुबमन भारताचा बाबर आझम…’, बांगलादेशविरुद्ध शून्यावर बाद झाल्याने सोशल मीडियावर ट्रोल
LokPoll Survey Results in Maharashtra
LokPoll Survey: महाराष्ट्रात लोकसभेची पुनरावृत्ती होणार; मविआला १४१ ते १५४ जागा, तर महायुतीला…
Ajit Pawar Amol Kolhe
Amol Kolhe : अजित पवार म्हणाले, “आता आपणच साहेब”, अमोल कोल्हे प्रत्युत्तर देत म्हणाले, “राज्यात दोनच साहेब, एक शरद पवार, दुसरे…”

हेही वाचा – Rishabh Pant: “मला रोखून चेंडू का मारतो आहेस…”, ऋषभ पंत आणि लिट्टन दास मैदानातच भिडले, पाहा VIDEO

ड्रेसिंग रूममधून रोहित शर्माचा मास्टरस्ट्रोक

भारतीय संघाने नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीला उतरला. पण रोहित शर्मा ६ धावा करत शुबमन गिल ७ चेंडूत एकही धाव न घेता बाद झाला तर विराट कोहली एका चौकारासह ६ धावा करत बाद झाला. यशस्वी जैस्वाल मात्र मैदानात पाय रोवून उभा होता. आथा तीन विकेट गेल्यानंतर केएल राहुल पाचव्या नंबरवर फलंदाजीला उतरत होता. पण इथेच रोहितने मास्टरस्ट्रोक खेळत ऋषभ पंतला फलंदाजीला पाठवले.

हेही वाचा – Hasan Mahmud: कोण आहे हसन महमूद? रोहित, विराट, शुबमनला बाद करत टीम इंडियाला टाकलं अडचणीत

ऋषभ पंतला केएल राहुलच्या आधी फलंदाजीला का पाठवलं? रोहित शर्माचा मास्टरस्ट्रोक

भारताचा माजी खेळाडू पार्थिव पटेलने रोहितच्या या निर्णयावर सांगितले की, “मी आश्चर्यचकित झालो. सामन्यांमध्ये सहसा कर्णधार आणि कोच मैदानावर डावखुरा आणि उजव्या हाताचा फलंदाज असं कॉम्बिनेशन ठेवण्याला प्राधान्य देतात. त्यामुळे मैदानावर आधीच डावखुरा फलंदाज यशस्वी जैस्वाल उपस्थित होता आणि उजव्या हाताचा फलंदाज म्हणून केएल राहुल होता. यानंतर केएल राहुल मैदानात येण्याची अपेक्षा होती, पण ऋषभ पंतला आधी का पाठवलं या प्रश्नांची उत्तर पंतने त्याच्या खेळीतून दिली.”

हेही वाचा – IND vs BAN: रोहित शर्मा टी-२० मधून निवृत्तीचा निर्णय मागे घेणार? कर्णधाराने दिले उत्तर

पुढे पार्थिव पटेल म्हणाला, “मला खात्री आहे की राहुलआधी पंतला पाठवणं यामागे काहीतरी रणनिती होती, बांगलादेशचे गोलंदाज डाव्या हाताच्या फलंदाजांना चांगली गोलंदाजी करत नव्हते. मला वाटते की केएल राहुलच्या पुढे ऋषभला पाठवण्यामागे हीच योजना असू शकते.”

एक प्रकारे हा कर्णधार रोहित शर्माचा हा मास्टरस्ट्रोक होता. खरे तर पहिल्या तासात बाद झालेले तीनही भारतीय फलंदाज उजव्या हाताचे फलंदाज होते. सलामीला आलेला यशस्वी जैस्वाल चांगली फलंदाजी करत होता. अशा स्थितीत उजव्या हाताच्या केएल राहुलच्या जागी डावखुरा ऋषभ पंतला पाठवणे फायदेशीर ठरले. तीन गडी बाद झाल्यानंतर थोडे दडपणाखाली असणाऱ्या भारतीय संघाला या दोघांनी संकटातून बाहेर काढले.