भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने कोलकाता कसोटी सामन्यात ऐतिहासिक खेळी केली आहे. आपला पहिला दिवस-रात्र कसोटी सामना खेळणाऱ्या विराट कोहलीने शतक झळकावलं. दिवस-रात्र कसोटीत शतक झळकावणारा विराट पहिला भारतीय कर्णधार ठरला आहे. विराटने १९४ चेंडूत १८ चौकारांसह १३६ धावा केल्या. त्याच्या या खेळीचं बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुलीने कौतुक केलं आहे.

“विराट कोहली उत्कृष्ट खेळाडू आहे, माझ्यासाठी तो एक रनमशिन आहे. आपण सर्वांनी त्याला गुलाबी चेंडूवर खेळताना पाहिलं आहे, पारंपरिक चेंडूपेक्षा गुलाबी चेंडूवर खेळणं अधिक सोपं आहे.” विराट कोहलीच्या शतकी खेळीवर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर सौरव गांगुली बोलत होता.

अवश्य वाचा – IND vs BAN : ऐतिहासिक कसोटीत विराटचं शतक ! रिकी पाँटींगशी केली बरोबरी

दरम्यान, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कर्णधार या नात्याने विराट कोहलीचं हे ४१ वं शतक ठरलं. या कामगिरीसह विराट कोहलीने माजी ऑस्ट्रेलियन कर्णधार रिकी पाँटींगशी बरोबरी केली आहे. पहिल्या दिवशी चेतेश्वर पुजाराने अर्धशतक झळकावल्यानंतर, उप-कर्णधार अजिंक्य रहाणेनेही अर्धशतकी खेळी करत विराटला साथ दिली. अजिंक्यने ६९ चेंडूत अजिंक्यची ७ चौकारांसह ५१ धावांची खेळी केली.

Story img Loader