IND vs BAN Men’s T20 Match Highlights: भारत आणि बांगलादेश यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिला सामना भारताने ७ विकेट्सने आणि ४९ चेंडू शिल्लक ठेवत जिंकला आहे. भारताच्या गोलंदाजांनी प्रथम फलंदाजी करणाऱ्या बांगलादेशला १२७ धावांवर सर्वबाद केले. भारतीय संघात कमबॅक केलेल्या वरूण चक्रवर्तीने ३ विकेट्स घेत दमदार कमबॅक केले आहे. तर पदार्पणवीर मयांक यादवने मेडेन विकेट घेत आपले पदार्पण अधिक खास केले. तर बांगलादेशच्या १२८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा यांनी चांगली सुरूवात केली पण अभिषेक लवकर बाद झाला. नंतर आलेल्या सूर्यकुमार यादवे संजूबरोबर झटपट धावा केल्या. हे दोघेही बाद झाल्यानंतर हार्दिक आणि पदार्पणवीर नितीश रेड्डीने भारताचा डाव सावरत ४९ चेंडू शिल्लक असताना भारताला विजय मिळवून दिला.
India vs Bangladesh T20 Match Highlights: भारत वि बांगलादेश टी-२० मालिकेतील पहिला सामना भारताने ७ विकेट्सने आणि ४९ चेंडू शिल्लक ठेवत जिंकला आहे.
हार्दिक पंड्याने १२व्या षटकात सलग दोन चौकार आणि एक षटकार लगावत भारताला ७ विकेट्सने विजय मिळवून दिला. भारताने तब्बल ४९ चेंडू शिल्लक ठेवत हा मोठा विजय मिळवला आहे.
भारताला पहिला टी-२० सामना जिंकण्यासाठी १० षटकांत २२ धावा करायच्या आहेत. मैदानात हार्दिक पंड्या आणि नितीश रेड्डीची जोडी कायम आहे.
सूर्यकुमार यादव पाठोपाठ संजू सॅमसनही झेलबाद झाला आहे. संजूही २९ धावा करत बाद झाला. ८ षटकांनंतर भारताला ७२ चेंडूत ४३ धावांची गरज आहे.
तुफान फटकेबाजी करणाऱ्या सूर्यकुमार यादवच्या रूपात भारताला दुसरा धक्का बसला आहे. मुस्तफिजूरच्या सहाव्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर दणदणीत षटकार खेचला. तर तिसऱ्याच चेंडूवर झाकेर अलीकडून सीमारेषेजवळ झेलबाद झाला. सूर्यकुमार यादव १४ चेंडूत २ चौकार आणि ३ षटकारांसह २९ धावा करत बाद झाला.
सूर्यकुमार यादव संजू सॅमसनची जोडी मैदानात ताबडतोड फकेबाजी करत आहे. या दोघांनी ५ षटकांत मिळून ५८ धावा केल्या. संजू १८ धावा तर सूर्या २३ धावा करत मैदानात आहेत.
दोन चौकार आणि एका षटकारासह आपला फॉर्म दाखवणाऱ्या अभिषेक शर्माच्या रूपात भारताला मोठा धक्का बसला आहे. दुसऱ्या षटकातील अखेरच्या चेंडूवर संजूने चेंडू खेळला आणि अभिषेक नॉन स्ट्राईकर एंडवरून धावायला गेला अन् तितक्यात चेंडू थ्रो केल्याने अभिषेक परत येण्यापूर्वी धावबाद झाला. ७ चेंडूत १६ धावा करत अभिषेक बाद झाला.
बांगलादेशने दिलेल्या १२८ धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या टीम इंडियाकडून नवी सलामी जोडी उतरली आहे. अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन जोडी मैदानात आहे.
बांगलादेशचा संघ १२७ धावा करत ऑल आऊट झाला आहे. अर्शदीप सिंगने २० व्या षटकातील पाचव्या चेंडूवर मुस्तफिजूर रहमानला क्लीन बोल्ड केले आहे. अर्शदीपने विकेट घेत भारताला पहिला ब्रेकथ्रू मिळवून दिला तर अखेरची विकेट घेत बांगलादेशला ऑलआऊट केलं. यासह भारताला विजयासाठी १२८ धावांचे लक्ष्य मिळाले आहे.
हार्दिक पंड्याच्या १८व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर तस्कीन अहमद धावबाद झाला. अर्शदीपने चांगला थ्रो केल्याने हार्दिकने तस्किनला धावबाद केले. तर याच षटकातील पाचव्या चेंडूवर हार्दिकने शोरिफुल इस्लामला क्लीन बोल्ड केलं. यासह बांगलादेशने ९ विकेट्स गमावत ११७ धावा केल्या आहेत.
वरूण चक्रवर्तीने त्याच्या स्पेलमधील चौथ्या षटकात तिसरी विकेट मिळवत शानदार कमबॅक केले. १४व्या षटकातील पाचव्या चेंडूवर हार्दिक पंड्याने रिशाद हुसेनला झेलबाद करत तिसरी विकेट मिळवली. १४ षटकांनंतर बांगलादेशने ७ बाद ९५ धावा केल्या आहेत.
वॉशिंग्टन सुंदरने त्याच्या पहिल्याच षटकात अखेरच्या चेंडूवर कर्णधार नजमुल हसन शांतोला स्वतच झेलबाद केले. शांतो २५ चेंडूत २७ धावा करत तो बाद झाला. यासह बांगलादेशने १२ षटकांत ६ बाद ७५ धावा केल्या आहेत.
१०व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर वरूण चक्रवर्तीने झाकेर अलीला क्लीन बोल्ड करत दुसरी विकेट मिळवली. यासह १० षटकांनंतर ५ बाद ६४ धावा बांगलादेशने केल्या आहेत.
मयांक यादवने मेडन ओव्हरनंतर त्याच्या स्पेलमधील दुसऱ्या षटकात पहिली आंतरराष्ट्रीय टी-२० विकेट मिळवली आहे. मयांकने आठव्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर अनुभवी फलंदाज महमुदुल्लाहला झेलबाद करवत भारताला महत्त्वाची विकेट मिळवून दिली. यासह ८ षटकांनंतर बांगलादेशने ४ बाद ४५ धावा केल्या आहेत.
सातव्या षटकातील चौथ्या चेंडूवर वरूण चक्रवर्तीच्या खात्यात पहिली विकेट मिळाली आहे. विस्फोटक फलंदाजी करत असलेल्या तौहिद ह्रदयला त्याने हार्दिक पंड्याकरवी झेलबाद केले. तौहिदने १८ चेंडूत २ चौकारांसह १२ धावा केल्या,.
पॉवरप्लेमधील अखेरचे षटक टाकण्याची जबाबदारी पदार्पणवीर मयांक यादवला देण्यात आली. आपल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर मयांकने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिलेच षटक मेडन टाकत चांगली सुरूवात केली आहे. यासह बांगलादेशने पॉवरप्लेमध्ये २ बाद ३९ धावा केल्या आहेत.
अर्शदीप सिंगने त्याच्या दुसऱ्या षटकातील पहिल्याच चेंडूवर बांगलादेशचा दुसरा सलामीवीर हुसेनला क्लीन बोल्ड केले. यासह भारताला तिसऱ्या षटकात दुसरी विकेट मिळाली. ३ षटकांनंतर बागंलादेशची धावसंख्या २ बाद १६ धावा आहे.
अर्शदीप सिंगच्या खात्यात पहिल्याच षटकात पहिली विकेट भारताला मिळाली आहे. अर्शदीपच्या पहिल्या षटकातील पाचव्या चेंडूवर लिटन दास मोठा फटका खेळायला गेला पण चेंडू हवेत उंच उडाला आणि रिंकू सिंगने धावत येत तो चेंडू टिपला
भारत वि बांगलादेश पहिल्या टी-२० सामन्याला राष्ट्रगीतानंतर सुरूवात झाली आहे. भारताकडून अर्शदीप सिंगने गोलंदाजीला सुरूवात केली आहे. तर बांगलादेशकडून लिटन दास आणि परवेज हुसेन सलामीला उतरले आहेत.
अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव (कर्णधार), नितीश रेड्डी, हार्दिक पांड्या, रियान पराग, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, मयंक यादव
लिटन दास (यष्टीरक्षक), परवेझ होसेन इमॉन, नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), तौहीद हृदोय, महमुदुल्ला, जाकेर अली, मेहिदी हसन मिराझ, रिशाद हुसेन, तस्किन अहमद, मुस्तफिजुर रहमान, शरीफुल इस्लाम
भारतीय संघाकडून दोन खेळाडूंना पदार्पणाची संधी मिळाली आहे. यामध्ये मयांक यादव आणि नितीश रेड्डी यांच्या नावाचा समावेश आहे.मयांक यादवला मुरली कार्तिकने तर पार्थिव पटेलने नितीश रेड्डीला पदार्पणाची कॅप दिली आहे.
भारतीय संघाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर बांगलादेशचा संघ फलंदाजीने सामन्याला सुरूवात करणार आहे.
टी-20 मध्ये भारत आणि बांगलादेश यांच्यात एकूण १३ सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी भारताने १२ सामने जिंकले आहेत, तर बांगलादेश संघ फक्त एक सामना जिंकू शकला आहे
मयांक यादव व्यतिरिक्त, दिल्लीचा वेगवान गोलंदाज हर्षित राणा आणि अष्टपैलू नितीश कुमार यांनाही बांगलादेशविरुद्धच्या T20 मालिकेत भारताकडून पदार्पण करण्याची संधी मिळू शकते.
अष्टपैलू शिवम दुबे दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी तिलक वर्माचा संघात समावेश करण्यात आला आहे.
भारत वि बांगलादेशमधील टी-२० मालिकेतील पहिला टी-२० सामना आज खेळवला जात आहे. हा सामना ग्वाल्हेरमध्ये प्रथमच खेळला जाणार आहे.