बांगलादेशविरुद्ध दुसऱ्या टी-२० सामन्यात भारताने ८ गडी राखून विजय मिळवला. बांगलादेशने विजयासाठी दिलेलं १५४ धावांचं आव्हान रोहितच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर सहज पूर्ण केलं. रोहितने ४३ चेंडूत ८५ धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीत ६ चौकार आणि ६ षटकारांचा समावेश होता.

अवश्य वाचा – IND vs BAN : माझी स्पर्धा माझ्याशीच ! रोहित शर्मा ठरतोय षटकारांचा बादशहा

फिरकीपटू मोसादक हुसेनच्या गोलंदाजीवर रोहितने लागोपाठ ३ चेंडूत ३ षटकार ठोकले. यादरम्यान रोहितला ६ चेंडूत ६ षटकार ठोकायचे होते. मोसादक हुसेन टाकत असलेल्या १० व्या षटकात पहिल्या ३ चेंडूवर रोहितने उत्तुंग षटकार खेचले, मात्र चौथ्या चेंडूवर त्याची संधी हुकली. यानंतर ‘Chahal TV’ कार्यक्रमात बोलत असताना रोहितने मला मोसादकच्या षटकात सहा षटकार मारायचे होते असं कबूल केलं. मात्र रोहितची संधी वाया गेल्यामुळे त्याचा एक विक्रम हुकला.

दुसऱ्या टी-२० सामन्यात बाजी मारत भारताने मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. त्यामुळे १० तारखेला नागपूरच्या मैदानावर होणाऱ्या अखेरच्या सामन्यात कोणता संघ बाजी मारतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अवश्य वाचा – IND vs BAN : रोहित सचिनसारखा खेळतोय, विराटलाही हे जमणार नाही !

Story img Loader