India vs China Hockey Final: हॉकीमधील आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी २०२४ चे जेतेपद भारतीय संघाने पटकावले आहे. पहिल्यांदाच चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत धडक मारलेल्या चीनचा भारताने ०-२ अशा फरकाने पराभव करत विक्रमी पाचव्यांदा जेतेपद पटकावले. तत्पूर्वी, पाकिस्तानने कांस्यपदकाच्या सामन्यात दक्षिण कोरियाचा ५-२ असा पराभव केला. पण भारताविरूद्धच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानी खेळाडू मास्क लावून चीनचा ध्वज हातात घेऊन भारताविरूद्ध उभे होते.
चीनमधील मोकी हॉकी प्रशिक्षण बेस येथे हा अंतिम सामना खेळवला गेला. या अंतिम सामन्यात पाकिस्तानचा संघ चीनचा ध्वज हाती घेऊन त्यांना सपोर्ट करताना दिसला. विशेष म्हणजे याच चीनने पेनल्टी शूटआऊटमध्ये पाकिस्तानचा २-० असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला होता. उपांत्य फेरीतील पराभवानंतर पाकिस्तानचे खेळाडू त्याच संघाला पाठिंबा देत आहेत ज्यांनी त्यांना जेतेपदाच्या शर्यतीतून बाहेर काढले होते.
उपांत्य फेरीत यजमान चीनविरुद्ध पराभव पत्करावा लागल्यानंतर पाकिस्तानसाठी कांस्यपदक सामन्यात विजय मिळवणे महत्त्वाचे होते. कांस्यपदकासाठी खेळल्या गेलेल्या सामन्यात पाकिस्तानच्या सुफियान खान, हन्नान शाहिद आणि रुमान यांनी गोल केले, तर कोरियाच्या जंगजुन लीआणि जिहुन यांग यांनी गोल केले.
हेही वाचा –
Rohit Sharma: “मजा घेऊ द्या त्यांनाही…”, रोहित शर्माने इंग्लंडचं उदाहरण देत बांगलादेशला दिला इशारा
खराब सुरुवातीनंतर, पाकिस्तानने उत्तरार्धात शानदार पुनरागमन करत, नियंत्रण मिळवले आणि विजय मिळवला. पाकिस्तानच्या हन्नान शाहिदने केलेल्या बचावात्मक चुकांचा फायदा घेत कोरियाने १६व्या मिनिटाला जंगजुन लीच्या माध्यमातून पहिला गोल केला. लीने वर्तुळाच्या शीर्षस्थानी जबरदस्त रनअप घेतला आणि गोल करत कोरियाला१-० अशी आघाडी मिळवून दिली. मात्र, यानंतर पाकिस्तानने जोरदार पुनरागमन करत एकामागून एक गोल केले.
हेही वाचा – Video: पाकिस्तानमध्ये विराटची जबरदस्त क्रेझ, बाबर आझमच्या सामन्यात चाहत्याने दाखवली किंग कोहलीची जर्सी
पाकिस्तानी खेळाडूंनी चीनचा ध्वज हातात घेऊन त्यांना सपोर्ट केल्यामुळे भारतीय चाहते विशेषतः पाकिस्तानी खेळाडूंवर जोरदार टीका करत आहेत आणि ट्रोल करत आहेत. पाकिस्तानकडून यापेक्षा जास्त अपेक्षा करणे चुकीचे आहे असे काही जणांनी कमेंटमध्ये म्हटले आहे. तर कोणी याला पूर्णपणे खेळाच्या भावनेविरुद्ध म्हटले आहे.