IND vs ENG 1st T20I Highlights : अभिषेक शर्माच्या वादळी खेळीच्या जोरावर भारताने पहिल्या टी-२० सामन्यात इंग्लंडला ७ विकेट्सनी धूळ चारली. त्याचबरोबर पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-० ने आघाडी घेतली. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने १३३ धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात भारताने १२.५ षटकांत लक्ष्य गाठले. टीम इंडियाकडून अभिषेक शर्माने ७९ धावांची अप्रतिम खेळी केली. याआधी वरुण चक्रवर्तीने शानदार गोलंदाजी करत ३ बळी घेतले होते. अर्शदीप सिंग, अक्षर पटेल आणि हार्दिक पंड्या यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. या सामन्यातील शानदार कामगिरीसाठी वरुण चक्रवर्तीला प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात आला.

Live Updates

India vs England T20I Highlights : दोन्ही संघांतील हेड टू हेड रेकॉर्डबद्दल बोलायचे तर दोन्ही संघांत आतापर्यंत एकूण २५ टी-२० सामने खेळले गेले आहेत. यापैकी भारताने १४ टी-२० जिंकले आहेत, तर इंग्लिश संघाने ११ जिंकले आहेत.

22:15 (IST) 22 Jan 2025
IND vs ENG Live : अभिषेक शर्माच्या वादळी खेळीच्या जोरावर भारताने इंग्लंडला ७ विकेट्सनी चारली धूळ

अभिषेक शर्माच्या वादळी खेळीच्या जोरावर भारताने पहिल्या टी-२० सामन्यात इंग्लंडला ७ विकेट्सनी धूळ चारली. त्याचबरोबर पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-० ने आघाडी घेतली. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने १३३ धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात भारताने १२.५ षटकांत लक्ष्य गाठले. टीम इंडियाकडून अभिषेक शर्माने ७९ धावांची अप्रतिम खेळी केली. याआधी वरुण चक्रवर्तीने शानदार गोलंदाजी करत ३ बळी घेतले होते. अर्शदीप सिंग, अक्षर पटेल आणि हार्दिक पंड्या यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.

https://twitter.com/BCCI/status/1882105003919487167

इंग्लंडच्या १३३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा ही सलामीची जोडी मैदानात आली होती. या दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी ४१ धावांची जलद भागीदारी पाहायला मिळाली. सॅमसन २६ धावा करून बाद झाला, तर अभिषेकने एका टोकाकडून डाव सांभाळून वेगवान धावा करत इंग्लंडला पुनरागमनाची कोणतीही संधी दिली नाही. अभिषेकच्या बॅटमधून ७९ धावांची शानदार खेळी पाहायला मिळाली, तर भारतीय संघाने हे लक्ष्य १२.५ षटकांत ३ गडी गमावून पूर्ण केले.

22:03 (IST) 22 Jan 2025

IND vs ENG Live : भारताने इंग्लंडला ७ विकेट्सनी चारली धूळ, अभिषेक शर्माने झळकावले वादळी अर्धतक

सलामीवीर अभिषेक शर्माच्या झंझावाती खेळीच्या जोरावर भारताने पहिल्या टी-२० सामन्यात इंग्लंडचा सात गडी राखून पराभव केला. त्याचबरोबर पाच सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.

https://twitter.com/shivaydv_/status/1882102702970437780

21:57 (IST) 22 Jan 2025

IND vs ENG Live : स्फोटक खेळीनंतर अभिषेक शर्मा बाद

टीम इंडियाला मोठा झटका बसला आहे. अभिषेक शर्मा 79 धावा करून बाद झाला. त्याने 34 चेंडूत 79 धावांची खेळी खेळली. आदिल रशीदने अभिषेकला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. भारताला विजयासाठी 6 धावांची गरज आहे.

https://twitter.com/IShoCricket24X7/status/1882102714357965209

21:47 (IST) 22 Jan 2025

IND vs ENG Live : भारताला विजयासाठी 33 धावांची गरज आहे

टीम इंडियाला विजयासाठी 60 चेंडूत 33 धावांची गरज आहे. भारताने 10 षटकांत 2 गडी गमावून 100 धावा केल्या आहेत. अभिषेक शर्मा 60 धावा करून खेळत आहे. टिळक वर्मा 9 धावा करून खेळत आहे.

21:39 (IST) 22 Jan 2025

IND vs ENG Live : अभिषेक शर्माकडून आदिल रशीदची धुलाई! षटकारांची केली बरसात

अभिषेक शर्मा स्फोटक फलंदाजी करत आहे. डावाच्या आठव्या षटकात त्याने 16 धावा केल्या. आदिल रशीदच्या षटकात अभिषेकने दोन षटकार आणि एक चौकार लगावला. तो अर्धशतकाच्या जवळ आहे. भारताने 8 षटकात 2 गडी गमावून 83 धावा केल्या आहेत. त्याला विजयासाठी 50 धावांची गरज आहे.

https://twitter.com/Dharmendra97939/status/1882098103693742096

21:33 (IST) 22 Jan 2025

IND vs ENG Live : पॉवरप्लेनंतर टीम इंडियाची धावसंख्या 2 बाद 63 धावा

पॉवरप्लेनंतर भारतीय संघाने 2 गडी गमावून 63 धावा केल्या आहेत. तिलक वर्मा 5 आणि अभिषेक शर्मा 27 धावांसह क्रीजवर उपस्थित आहेत.

21:24 (IST) 22 Jan 2025

IND vs ENG Live : टीम इंडियाला दुसरा धक्का, सूर्या शून्यावर बाद

भारताची दुसरी विकेट सूर्यकुमार यादवच्या रूपाने पडली. त्याला खातेही उघडता आले नाही. आर्चरने त्याला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. आता तिलक वर्मा फलंदाजीला आले आहेत. अभिषेक शर्मा 10 धावा करून खेळत आहे. भारताने 5 षटकात 2 गडी गमावून 45 धावा केल्या आहेत.

https://twitter.com/Goat18xclutch33/status/1882094395568394552

21:19 (IST) 22 Jan 2025

IND vs ENG Live : भारताची पहिली विकेट पडली, सॅमसन बाद

इंग्लंडने भारताला मोठा धक्का दिला आहे. संजू सॅमसन 20 चेंडूत 26 धावा करून बाद झाला. जोफ्रा आर्चरने त्याला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. आता कर्णधार सूर्यकुमार यादव फलंदाजीसाठी आला आहे. भारताने 4.2 षटकात 1 गडी गमावून 41 धावा केल्या आहेत.

21:15 (IST) 22 Jan 2025

IND vs ENG Live : अभिषेक शर्माची दमदार फटकेबाजी

अभिषेक शर्माची दमदार फटकेबाजी

संजू सॅमसननंतर अभिषेक शर्मानेही आक्रमक फटकेबाजी केली. तो एक चौकार आणि एक षटकाराच्या मदतीने 10 धावा केल्यानंतर खेळत आहे. संजू 23 धावा करून खेळत आहे. भारताने 3 षटकात 33 धावा केल्या आहेत.

21:06 (IST) 22 Jan 2025

IND vs ENG Live : सॅमसनने भारताला स्फोटक सुरुवात करून दिली

सॅमसनने भारताला स्फोटक सुरुवात करून दिली

https://twitter.com/tanveermamdani/status/1882089864684019930

संजू सॅमसनने भारताला धमाकेदार सुरुवात करून दिली आहे. डावाच्या दुसऱ्या षटकात त्याने 22 धावा दिल्या. 12 चेंडूत 23 धावा केल्यानंतर सॅमसन खेळत आहे. त्याने 4 चौकार आणि 1 षटकार मारला आहे. इंग्लंडचे दुसरे षटक ॲटकिन्सनने टाकले. त्याने एकूण 22 धावा दिल्या.

20:44 (IST) 22 Jan 2025

IND vs ENG Live : इंग्लंडने भारताला दिले १३३ धावांचे लक्ष्य, बटलरचे अर्धशतक; वरुणने घेतल्या तीन विकेट्स

इंग्लंडने भारताला विजयासाठी 133 धावांचे लक्ष्य दिले आहे. संघाकडून जोस बटलरने कर्णधारपदाला साजेशी खेळी खेळली. त्याने 8 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 68 धावा केल्या. हॅरी ब्रूकने १७ धावांची खेळी केली. याशिवाय इतर कोणत्याही फलंदाजाला विशेष काही करता आले नाही. आर्चर 12 धावा करून बाद झाला.

https://twitter.com/BCCI/status/1882083463244976142

आदिल रशीद 8 धावा करून नाबाद राहिला. अशाप्रकारे 20 षटकांत 132 धावा करून संपूर्ण संघ ऑलआऊट झाला. भारताकडून अर्शदीप सिंग आणि वरुण चक्रवर्ती यांनी अप्रतिम गोलंदाजी केली. चक्रवर्तीने 4 षटकात 23 धावा देत 3 बळी घेतले. अर्शदीप आणि अक्षर पटेलने 2-2 बळी घेतले.

20:39 (IST) 22 Jan 2025

IND vs ENG Live : इंग्लंडला बसला नववा धक्का, पड्याने घेतली विकेट

इंग्लंडची नववी विकेट आर्चरच्या रुपाने पडली. हार्दिक पांड्याने जोफ्रा आर्चरला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. आर्चर 12 धावा करून बाद झाला.

20:35 (IST) 22 Jan 2025

IND vs ENG Live : इंग्लंडने 19 षटकांत केल्या 121 धावा

इंग्लंडने 19 षटकांत केल्या 121 धावा

इंग्लंडने 19 षटकांत 8 विकेट गमावून 121 धावा केल्या आहेत. जोफ्रा आर्चर 4 धावा करून खेळत आहे. आदिल रशीद 8 धावा करून खेळत आहे. आता या डावाचे शेवटचे षटक बाकी आहे

20:27 (IST) 22 Jan 2025

IND vs ENG Live : इंग्लंड ऑलआऊटच्या जवळ

इंग्लंड ऑलआऊटच्या जवळ

https://twitter.com/Monish09cric/status/1882080005330784405

इंग्लंडचा संघ ऑलआऊट होण्याच्या जवळ आहे. कर्णधार जोस बटलर 68 धावा करून बाद झाला. त्याने 8 चौकार आणि 2 षटकार मारले आहेत. वरुण चक्रवर्तीने बटलरला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. इंग्लंडने 16.3 षटकात 8 विकेट गमावून 109 धावा केल्या आहेत.

20:16 (IST) 22 Jan 2025

IND vs ENG 1st T20I Live : इंग्लंडला सहावा धक्का, अक्षर पटेलने ओव्हरटनला केले बाद

इंग्लंडला सहावा धक्का, अक्षर पटेलने ओव्हरटनला केले बाद

अक्षर पटेलने भारताला मोठे यश मिळवून दिले आहे. जेमी ओव्हरटन अवघ्या 2 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. बटलर सध्या 60 धावा करून खेळत आहे. इंग्लंडने 13.3 षटकात 6 गडी गमावून 95 धावा केल्या आहेत.

20:07 (IST) 22 Jan 2025
IND vs ENG Live : इंग्लंडचा अर्धा संघ ८३ धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला, हार्दिकने बेथेलला केले बाद

इंग्लंडचा अर्धा संघ 83 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला, हार्दिकने बेथेलला केले बाद

https://twitter.com/alwaysRaviDhfrc/status/1882075276886302808

इंग्लंडची पाचवी विकेट जेकब बेथेलच्या रूपाने पडली. तो 7 धावा करून बाद झाला. हार्दिक पंड्याने बेथेलला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. इंग्लंडने 12 षटकांत 5 गडी गमावून 84 धावा केल्या आहेत. बटलरने आपले अर्धशतक पूर्ण केले आहे. तो 50 धावा केल्यानंतर खेळत आहे.

20:04 (IST) 22 Jan 2025
IND vs ENG Live : जोस बटलरची कर्णधारपदाला साजेशी खेळी, अवघ्या ३४ चेंडूत झळकावले अर्धशतक

जोस बटलरची कर्णधारपदाला साजेशी खेळी, अवघ्या 34 चेंडूत झळकावले अर्धशतक

https://twitter.com/Rionex_/status/1882075299531399598

भारताविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने अर्धशतक झळकावले आहे. बटलरने 34 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. 11 षटकानंतर इंग्लंडची धावसंख्या 4 बाद 83 धावा आहे

20:00 (IST) 22 Jan 2025

IND vs ENG 1st T20I Live : अर्शदीप-वरूणने भारतासाठी केली शानदार गोलंदाजी

अर्शदीप-वरूणने भारतासाठी केली शानदार कामगिरी

https://twitter.com/sarcastic_us/status/1882073108854809007

इंग्लंडने 10 षटकांत 4 गडी गमावून 74 धावा केल्या आहेत. जोस बटलर अर्धशतकाच्या जवळ आहे. तो 47 धावा करून खेळत आहे. जेकब बेथेल 3 धावा करून खेळत आहे. भारताकडून अर्शदीप आणि वरुणने 2-2 विकेट घेतल्या आहेत.

19:50 (IST) 22 Jan 2025

IND vs ENG Live : वरुण चक्रवर्तीने हॅरी ब्रुक पाठोपाठ लियाम लिव्हिंगस्टोनलाही दाखवला तंबूचा रस्ता

वरुण चक्रवर्तीने हॅरी ब्रुक पाठोपाठ लियाम लिव्हिंगस्टोनलाही दाखवला तंबूचा रस्ता

https://twitter.com/Gunsharia1/status/1882070180047753581

अर्शदीपनंतर वरुण चक्रवर्तीने शानदार गोलंदाजी करत इंग्लंड संघाला पुन्हा अडचणीत आणले आहे. आठवे षटक टाकायला आलेल्या वरुणने तीन चेंडूत दोन बळी घेतले. त्याने हॅरी ब्रुक पाठोपाठ लियाम लिव्हिंगस्टोनलाही तंबूचा रस्ता दाखवला. इंग्लंडने 9 षटकानंतर 4 बाद 69 धावा केल्या आहेत.

19:39 (IST) 22 Jan 2025

IND vs ENG Live : इंग्लंडने 6 षटकांत केल्या 2 बाद 46 धावा

इंग्लंडने 6 षटकांत केल्या 2 बाद 46 धावा

इंग्लंडने 6 षटकांत 2 गडी गमावून 46 धावा केल्या आहेत. जोस बटलर 34 धावा करून खेळत आहे. हॅरी ब्रूक 6 धावा करून खेळत आहे. पंड्या भारतासाठी आतापर्यंतचा सर्वात महागडा ठरला आहे. त्याने 2 षटकात 27 धावा दिल्या आहेत.

19:33 (IST) 22 Jan 2025

IND vs ENG 1st T20I Live : जोस बटलरने केली हार्दिक पंड्याची धुलाई

जोस बटलरने केली हार्दिक पंड्याची धुलाई -

https://twitter.com/iumvishwesh/status/1882065401619833067

जोस बटलरने हार्दिक पंड्याची चांगलीच धुलाई केली. हार्दिकने डावाच्या चौथ्या षटकात 18 धावा दिल्या आहेत. इंग्लंडने 4 षटकात 2 गडी गमावून 35 धावा केल्या आहेत. बटलर 29 धावा करून खेळत आहे. ब्रुकला अजून खाते उघडता आलेले नाही.

19:27 (IST) 22 Jan 2025
IND vs ENG Live :अर्शदीप सिंगने घडवला इतिहास! भारतासाठी टी-२० क्रिकेटमध्ये हा खास पराक्रम करणारा ठरला पहिलाच गोलंदाज

अर्शदीप सिंगने घडवला इतिहास! भारतासाठी टी-२० क्रिकेटमध्ये 'हा' खास पराक्रम करणारा ठरला पहिलाच गोलंदाज

https://twitter.com/Unique_News70/status/1882064657248333905

टी-२० क्रिकटमध्ये भारतासाठी सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज-

https://twitter.com/cricatif/status/1882071740186234896

९७ अर्शदीप सिंग (६१ )

९६ युझवेंद्र चहल (८०)

९० भुवनेश्वर कुमार (८७)

८९ जसप्रीत बुमराह (७०)

८९ हार्दिक पंड्या (११०)

19:21 (IST) 22 Jan 2025

IND vs ENG Live : इंग्लंडला दुसरा धक्का, डकेट ४ धावा करून बाद

इंग्लंडला दुसरा धक्का, डकेट ४ धावा करून बाद

https://twitter.com/Omkarugale2811/status/1882063339209326953

इंग्लंडची दुसरी विकेट बेन डकेटच्या रुपाने पडली. फिलिप सॉल्टनंतर बेन डकेटही बाद झाला. ४ धावा करून तो निघून गेला. अर्शदीप सिंगने त्याला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. अर्शदीपची ही दुसरी विकेट होती. आता हॅरी ब्रूक फलंदाजीसाठी मैदानात पोहोचला आहे. इंग्लंडने ३ षटकात २ गडी गमावून १७ धावा केल्या आहेत.

19:14 (IST) 22 Jan 2025

IND vs ENG 1st T20I Live : अर्शदीपने भारताला चांगली सुरुवात करून दिली

अर्शदीपने भारताला चांगली सुरुवात करून दिली

https://twitter.com/INSIDDE_OUT/status/1882059674184491520

अर्शदीप सिंगने भारताला चांगली सुरुवात करून दिली आहे. त्याने पहिल्या षटकात फक्त 3 धावा दिल्या आणि 1 बळी घेतला. बटलर 2 धावा करून इंग्लंडकडून खेळत आहे. डकेटला अजून खाते उघडता आलेले नाही.

19:07 (IST) 22 Jan 2025

IND vs ENG Live : फिल सॉल्ट पहिल्याच षटकात ठरला अर्शदीप सिंगचा बळी

फिल सॉल्ट पहिल्याच षटकात ठरला अर्शदीप सिंगचा बळी

वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने पहिल्याच षटकात इंग्लंडला धक्का दिला आहे. यष्टिरक्षक फिल सॉल्ट खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. सॉल्टने अर्शदीपच्या चेंडूवर फटका मारण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू मागे गेला आणि सॅमसनने त्याचा झेल घेतला.

https://twitter.com/2012Yugantham/status/1882059652768366874

18:53 (IST) 22 Jan 2025

IND vs ENG 1st T20I Live : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीचा अहवाल आणि हवामान

ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीचा अहवाल आणि हवामान -

इंडियन प्रीमियर लीग २०२४ सीझनमध्ये ईडनची खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल आहे. गेल्या मोसमात पंजाब किंग्जने केकेआरविरुद्ध ८ चेंडू बाकी असताना २६२ धावांचा पाठलाग करून इतिहास रचला होता. खरंतर, राजस्थान रॉयल्सने २०२४ मध्ये केकेआरविरूद्ध २२४ धावांचा पाठलाग करताना विजय मिळवला. त्यामुळे खेळपट्टी ही सारखीच राहण्याची अपेक्षा आहे. मात्सं रध्याकाळी दव पडल्यामुळे गोष्टी बदलू शकतात. संपूर्ण भारतात हिवाळा आहे आणि दवामुळे सामन्याच्या दुसऱ्या डावात गोलंदाजांसाठी गोलंदाजी करणं कठीण होईल अशी अपेक्षा आहे.

18:49 (IST) 22 Jan 2025

IND vs ENG Live : सूर्याने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय का घेतला?

सूर्याने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय का घेतला?

टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादव म्हणाला की, "दव पाहता प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भारताने अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन तसेच तिलक वर्माचा प्लेईंग इलेव्हनमध्ये समावेश केला आहे."

18:39 (IST) 22 Jan 2025
IND vs ENG 1st T20I Live : पहिल्या सामन्यासाठी पाहा दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

पहिल्या सामन्यासाठी पाहा दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन -

भारत: अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, रिंकू सिंग, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल (उप-कर्णधार), रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती.

https://twitter.com/BCCI/status/1882052133761224799

इंग्लंड: बेन डकेट, फिल सॉल्ट (यष्टीरक्षक), जोस बटलर (कर्णधार), हॅरी ब्रूक (उप-कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, जेकब बेथेल, जेमी ओव्हरटन, गस ऍटकिन्सन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, मार्क वुड.

18:36 (IST) 22 Jan 2025
IND vs ENG Live Updates : भारताचा प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय

भारताचा प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय

https://twitter.com/BCCI/status/1882052247707877647

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात नाणेफेक जिंकून भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

https://twitter.com/fpjindia/status/1882052039179743360

18:29 (IST) 22 Jan 2025

IND vs ENG Live Updates : संजू-अभिषेक टीम इंडियासाठी सलामी देणार

संजू-अभिषेक टीम इंडियासाठी सलामी देणार

गेल्या वर्षी टी-२० विश्वचषकात विजेतेपद पटकावल्यानंतर या फॉरमॅटमध्ये संघात अनेक बदल करण्यात आले आहेत. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांची टी-२० इंटरनॅशनलमधून निवृत्ती आणि शुबमन गिलला वगळल्यामुळे टॉप ऑर्डरमध्ये बदल झाला आहे. गेल्या काही मालिकांपासून संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा डावाची सुरुवात करत आहेत आणि हीच जोडी इंग्लंडविरुद्धही डावाची सुरुवात करू शकते.

https://twitter.com/cricbuzz/status/1881902522874638448

India vs England 1st T20 LIVE Score Updates in Marathi

India vs England 1st T20I Highlights : भारताने कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर आठ टी-२० सामने खेळले आहेत. यापैकी भारताने सहा टी-२० सामने जिंकले असून त्यांचा एकमेव पराभव २०११ मध्ये इंग्लंडविरुद्ध झाला होता.

Story img Loader