IND vs ENG 1st T20I Highlights : अभिषेक शर्माच्या वादळी खेळीच्या जोरावर भारताने पहिल्या टी-२० सामन्यात इंग्लंडला ७ विकेट्सनी धूळ चारली. त्याचबरोबर पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-० ने आघाडी घेतली. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने १३३ धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात भारताने १२.५ षटकांत लक्ष्य गाठले. टीम इंडियाकडून अभिषेक शर्माने ७९ धावांची अप्रतिम खेळी केली. याआधी वरुण चक्रवर्तीने शानदार गोलंदाजी करत ३ बळी घेतले होते. अर्शदीप सिंग, अक्षर पटेल आणि हार्दिक पंड्या यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. या सामन्यातील शानदार कामगिरीसाठी वरुण चक्रवर्तीला प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Live Updates

India vs England T20I Highlights : दोन्ही संघांतील हेड टू हेड रेकॉर्डबद्दल बोलायचे तर दोन्ही संघांत आतापर्यंत एकूण २५ टी-२० सामने खेळले गेले आहेत. यापैकी भारताने १४ टी-२० जिंकले आहेत, तर इंग्लिश संघाने ११ जिंकले आहेत.

18:24 (IST) 22 Jan 2025

IND vs ENG Live : टी-२० संघाचा प्रशिक्षक म्हणून मॅक्युलमची पहिली मालिका

टी-२० संघाचा प्रशिक्षक म्हणून मॅक्युलमची पहिली मालिका

कसोटीनंतर इंग्लंडने ब्रेंडन मॅक्क्युलमची मर्यादित षटकातील क्रिकेटमध्येही प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. टी-२० संघाचा प्रशिक्षक म्हणून ब्रेंडन मॅक्क्युलमची ही पहिलीच मालिका आहे.

https://twitter.com/BCCI/status/1882046158895460617

18:07 (IST) 22 Jan 2025

IND vs ENG Live Updates : कोलकात्यात इंग्लंडकडून भारताचा झाला आहे पराभव

कोलकात्यात इंग्लंडकडून भारताचा झाला आहे पराभव –

ईडन गार्डन्स, कोलकाता हे अनेक ऐतिहासिक विजयांचे साक्षीदार आहे आणि टी-२० मध्ये भारतासाठी भाग्यवान मैदान आहे. भारताने या मैदानावर आतापर्यंत सात टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत, ज्यामध्ये सहा जिंकले आहेत आणि एक सामना गमावला आहे. विशेष म्हणजे या मैदानावर भारताचा एकमेव टी-२० पराभव इंग्लंडविरुद्ध झाला आहे. २०११ मध्ये झालेल्या सामन्यात इंग्लंडने भारताचा पराभव केला होता. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील संघाला आता इंग्लंडला पराभूत करण्याची संधी असेल.

17:54 (IST) 22 Jan 2025

IND vs ENG Live Updates : भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन

भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन :

संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पंड्या, रिंकू सिंग, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती, मोहम्मद शमी.

17:40 (IST) 22 Jan 2025

IND vs ENG Live Updates : पहिल्या सामन्यासाठी इंग्लंडची प्लेइंग इलेव्हन

पहिल्या सामन्यासाठी इंग्लंडची प्लेइंग इलेव्हन :

बेन डकेट, फिल सॉल्ट (यष्टीरक), जोस बटलर (कर्णधार), हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, जेकब बेथेल, जेमी ओव्हरटन, गस ऍटकिन्सन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, मार्क वुड.

17:25 (IST) 22 Jan 2025

IND vs ENG Live Updates : कोणता संघ कॅच पकडण्यात सर्वोत्तम आहे?

इंग्लंड संघाने २०२४ सालापासून टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ६९ कॅट घेतले आहेत, तर नऊ झेल सोडले आहेत. त्यांची कॅच घेण्याची क्षमता ८८.५० टक्के आहे. या यादीत भारत दहाव्या स्थानावर आहे. भारताने २०२४ पासून टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये १३४ कॅच घेतले आहेत, तर ३६ कॅच सोडले आहेत. त्यांची कॅट घेण्याची क्षमता ७८.८० टक्के आहे.

17:03 (IST) 22 Jan 2025

IND vs ENG Live Updates : भारत विरुद्ध इंग्लंड हेड टू हेड रेकॉर्ड

दोन्ही संघांतील हेड टू हेड रेकॉर्डबद्दल बोलायचे तर दोन्ही संघांत आतापर्यंत एकूण २४ टी-२० सामने खेळले गेले आहेत. यापैकी भारताने १३ टी-२० जिंकले आहेत, तर इंग्लिश संघाने ११ जिंकले आहेत. भारताने कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर सात टी-२० सामने खेळले आहेत. यापैकी भारताने सहा टी-२० सामने जिंकले असून त्यांचा एकमेव पराभव २०११ मध्ये इंग्लंडविरुद्ध झाला होता.

16:56 (IST) 22 Jan 2025
IND vs ENG Live Updates : किती वाजता सामन्याला होणार सुरुवात?

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिला सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरू होईल. याच्या अर्धा तास आधी म्हणजेच संध्याकाळी ६.३० वाजता टॉस होईल. हा सामना ईडन गार्डन्सवर खेळला जाणारा आहे.

https://x.com/BCCI/status/1881913953003127195

India vs England 1st T20I Highlights : भारताने कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर आठ टी-२० सामने खेळले आहेत. यापैकी भारताने सहा टी-२० सामने जिंकले असून त्यांचा एकमेव पराभव २०११ मध्ये इंग्लंडविरुद्ध झाला होता.