India vs England ODI Updates, 14 July 2022 : भारत आणि इंग्लंड दरम्यान तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील दुसरा सामना आज (१४ जुलै) लंडनमधील ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट स्टेडियमवरती झाला. हा सामना इंग्लंडने १०० धावांनी जिंकला असून मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. इंग्लंडच्या एकट्या रीस टॉपलीने भारताचे सहा फलंदाजांना बाद केले. त्यामुळे भारताचा सर्व संघ १४६ धावांमध्येच गुंडाळला गेला. त्यापूर्वी, भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारतीय गोलंदाजांनी पुन्हा शानदार कामगिरी करत इंग्लंडला २४६ धावांमध्ये गुंडाळले होते. भारताच्यावतीने युझवेंद्र चहलने सर्वाधिक चार बळी घेतले.

Live Updates

England vs India 2nd ODI Live Update : भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्याचे सर्व अपडेट्स

00:36 (IST) 15 Jul 2022
रीस टॉपलीचा फाइव्ह विकेट हॉल

रीस टॉपलीने 'फाइव्ह विकेट हॉल' मिळवला आहे. युझवेंद्र चहल हा त्याचा आजच्या सामन्यातील पाचवा बळी ठरला आहे.

00:26 (IST) 15 Jul 2022
भारताच्या विजयाच्या आशा मावळल्या

मोहम्मद शमी आणि रविंद्र जडेजा एका पाठोपाठ बाद झाल्याने भारताच्या विजयाच्या आशा मावळल्या आहेत.

23:49 (IST) 14 Jul 2022
हार्दिक पंड्याच्या रुपात भारताचा सहावा गडी बाद

भारताचा सहावा गडी बाद झाला आहे. मोईन अलीने लिव्हिंगस्टोनकरवी हार्दिक पंड्याला माघारी धाडले. भारताची अवस्था सहा बाद १०१ अशी झाली आहे.

23:44 (IST) 14 Jul 2022
भारतीय संघाचा धावफलक शंभरीपार

२७व्या षटकामध्ये भारतीय संघाच्या १०० धावा पूर्ण झाल्या.

23:39 (IST) 14 Jul 2022
२५ षटकांमध्ये भारताच्या पाच बाद ९१ धावा

२५ षटकांमध्ये भारताच्या पाच बाद ९१ धावा झाल्या आहेत. हार्दिक पंड्या आणि रविंद्र जडेजा डाव सावरण्याचा प्रयत्न करत आहेत.

23:21 (IST) 14 Jul 2022
भारताची फलंदाजी ढेपाळली

सूर्यकुमार यादवच्या रुपात भारताला पाचवा धक्का बसला आहे. तो रीस टॉपलीच्या गोलंदाजीवर त्रिफळाचित झाला. त्याने २९ चेंडूत २७ धावा केल्या. भारताची अवस्था पाच बाद ७३ अशी झाली आहे.

23:17 (IST) 14 Jul 2022
२०षटकांमध्ये भारताच्या चार बाद ७३ धावा

२०षटकांमध्ये भारताच्या चार बाद धावा झाल्या आहेत. सूर्यकुमार यादव २७ तर पंड्या १६ धावांवर खेळत आहेत.

22:54 (IST) 14 Jul 2022
१५ षटकांमध्ये भारताच्या चार बाद ५४ धावा

भारताची सलामीची फळी ढेपाळल्यानंतर सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पंड्या डाव सावरण्याचा प्रयत्न करत आहेत.

22:40 (IST) 14 Jul 2022
विराट कोहली पुन्हा एकदा अपयशी

विराट कोहली पुन्हा एकदा मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला आहे. डेव्हिड विलीच्या गोलंदाजीवर तो बाद झाला. भारताची अवस्था चार बाद ३१ अशी झाली आहे.

22:35 (IST) 14 Jul 2022
ऋषभ पंत शून्यावर बाद

कर्णधार रोहित शर्माप्रमाणे यष्टीरक्षक ऋषभ पंत देखील शून्यावर बाद झाला आहे. भारताची अवस्था तीन बाद २९ अशी झाली आहे.

22:30 (IST) 14 Jul 2022
१०षटकांमध्ये भारताच्या दोन बाद २८ धावा

२४७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. १०षटकांमध्ये भारताच्या दोन बाद २८ धावा झाल्या आहेत. ऋषभ पंत आणि विराट कोहली मैदानावर उपस्थित आहेत.

22:25 (IST) 14 Jul 2022
शिखर धवनच्या रुपात भारताचा दुसरा गडी बाद

भारताचा दुसरा सलामीवीर शिखर धवन ९ धावा करून बाद झाला आहे. भारताची अवस्था दोन बाद २७ अशी आहे.

22:08 (IST) 14 Jul 2022
भारताची संथ सुरुवात

भारताने पहिल्या पाच षटकांमध्ये एक बाद १० धावा केल्या आहेत. सलामीवीर शिखर धवन आणि विराट कोहली मैदानावरती उपस्थित आहेत.

22:01 (IST) 14 Jul 2022
रोहित शर्मा शून्यावर माघारी

भारतीय संघाला डावाच्या सुरुवातीलाच मोठा झटका बसला आहे. कर्णधार रोहित शर्मा शून्यावर माघारी परतला आहे.

21:56 (IST) 14 Jul 2022
भारताच्या डावाची सुरुवातीची दोन षटके निर्धाव

इंग्लंडच्या गोलंदाजांनी भारताच्या डावाची सुरुवातीची दोन षटके निर्धाव टाकली आहेत. त्यामुळे दोन षटके होऊनही भारताचे अद्याप खाते उघडलेले नाही.

21:49 (IST) 14 Jul 2022
भारतीय फलंदाजीला सुरुवात

भारतीय फलंदाजीला सुरुवात झाली असून रोहित शर्मा आणि शिखर धवन सलामीसाठी मैदानात उतरले आहेत.

21:22 (IST) 14 Jul 2022
२४६ धावांवर आटोपला इंग्लंडचा डाव

इंग्लंडने भारताला विजयासाठी २४७ धावांचे लक्ष्य दिले आहे.

21:12 (IST) 14 Jul 2022
इंग्लंडचा नववा गडी माघारी

इंग्लंडचा नववा गडी बाद झाला आहे. ब्रायडन कार्स दोन धावा करून पायचित झाला.

21:07 (IST) 14 Jul 2022
इंग्लंडचा आठवा गडी बाद

डेव्हिड विलीच्या रुपात इंग्लंडचा आठवा गडी बाद झाला आहे. इंग्लंडच्या ४७ षटकांमध्ये २३७ धावा झाल्या आहेत.

20:54 (IST) 14 Jul 2022
४५ षटकांमध्ये इंग्लंडच्या सात बाद २२२ धावा

४५ षटकांमध्ये इंग्लंडच्या संघाने सात गडी गमावून २२२ धावा केल्या आहेत.

20:43 (IST) 14 Jul 2022
मोईन अलीच्या रुपात इंग्लंडला सातवा झटका

खेळपट्टीवर जम बसवलेला मोईन अली बाद झाला आहे. युझवेंद्र चहलने जडेजाकरवीअलीला माघारी धाडले. त्याने ६४ चेंडूंमध्ये ४७ धावा केल्या.

20:30 (IST) 14 Jul 2022
मोईन अली आणि विलीची ५० धावांची भागीदारी

मोईन अली आणि डेव्हिड विली इंग्लंडचा डाव सावरण्याचा प्रयत्न करत आहे. दोघांनी ५० धावांची भागीदारी पूर्ण केली आहे.

20:14 (IST) 14 Jul 2022
३५ षटकांमध्ये इंग्लंडच्या सहा बाद १६७ धावा

३५ षटकांमध्ये इंग्लंडच्या सहा बाद धावा झाल्या आहेत. डेव्हिड विली (८) आणि मोईन अली (२३) मैदानावरती उपस्थित आहेत.

19:57 (IST) 14 Jul 2022
३०षटकांमध्ये इंग्लंडच्या सहा बाद १५१ धावा

३०षटकांमध्ये इंग्लंडच्या सहा बाद १५१ धावा झाल्या आहेत.

19:56 (IST) 14 Jul 2022
इंग्लंडचा सहावा गडी बाद

लियाम लिव्हिंगस्टोनच्या रुपात इंग्लंडचा सहावा गडी बाद झाला आहे. हार्दिक पंड्याच्या चेंडूबर बदली क्षेत्ररक्षक आलेल्या श्रेयस अय्यरने त्याचा झेल घेतला.

19:44 (IST) 14 Jul 2022
२७ षटकांमध्ये इंग्लंडच्या पाच बाद १२९ धावा

इंग्लंडच्या डावाची सुरुवात फारच वाईट झाली आहे. सुरुवातीचे पाच फलंदाज बाद झाले असून आता लिव्हिंगस्टोन आणि मोईन अली डाव सावरण्याच्या प्रयत्न करत आहेत. २७ षटकांमध्ये इंग्लंडच्या पाच बाद १२९ धावा झाल्या आहेत.

19:20 (IST) 14 Jul 2022
इंग्लंडची फलंदाजी पुन्हा ढेपाळली

लॉर्ड्सवर सुरू असलेल्या एकदिवसीय सामन्यात यजमानांचा डाव गडगडला आहे. इंग्लंडचे सुरुवातीचे पाच फलंदाज बाद झाले आहेत. इंग्लंडची अवस्था पाच बाद १०२ अशी झाली आहे.

19:14 (IST) 14 Jul 2022
इंग्लंडचा धावफलक शंभरीपार

२१ व्या षटकामध्ये इंग्लंडच्या चार बाद १०० धावा झाल्या आहेत. बेन स्टोक्स आणि लियाम लिव्हिंगस्टोन डाव सावरण्याचा प्रयत्न करत आहेत.

19:03 (IST) 14 Jul 2022
इंग्लंडचा संघ अडचणीत

कर्णधार जोस बटलर स्वस्तात बाद झाल्यामुळे इंग्लंडचा संघ अडचणीत आला आहे. इंग्लंडची अवस्था चार बाद ८७ अशी झाली आहे. मोहम्मद शमीने बटलरला चार धावांवर त्रिफळाचित केले.

18:58 (IST) 14 Jul 2022
बेअरस्टो पाठोपाठ जो रूटही बाद

युझवेंद्र चहलने जो रूटच्या रुपात इंग्लंडला तिसरा झटका दिला आहे. जो रूट ११ धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर पायचित झाला. इंग्लंडच्या तीन बाद ८२ धावा झाल्या आहेत.

Story img Loader