IND vs ENG 2nd T20I Highlights : तिलक वर्माच्या शानदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारतीय संघाने दुसऱ्या टी-२० सामन्यात इंग्लंडचा दोन गडी राखून पराभव केला. त्याचबरोबर पाच सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने २० षटकांत ९ गडी गमावून १६५ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात तिलकने ५५ चेंडूंत चार चौकार आणि पाच षटकारांच्या मदतीने नाबाद ७२ धावांची खेळी साकारली. त्याच्या या खेळीच्या जोरावर भारताने १९.२ षटकांत ८ गडी गमावून १६६ धावा करून विजयावर शिक्कामोर्तब केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

तिलक वर्माशिवाय वॉशिंग्टन सुंदरने १९ चेंडूंत तीन चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने २६ धावांचे योगदान दिले. त्याचबरोबर नववा फलंदाज म्हणून आलेला रवी बिश्नोई पाच चेंडूंत नऊ धावा करून नाबाद माघारी परतला. इंग्लंडकडून ब्रायडेन कार्सेने तीन विकेट्स घेत संघाला विजयाकडे नेण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला, पण तिलकच्या खेळीसमोर त्याचे प्रयत्न यशस्वी होऊ शकले नाहीत. इंग्लंडकडून जोफ्रा आर्चर, मार्क वुड, आदिल रशीद, जेमी ओव्हरटन आणि लियाम लिव्हिंगस्टोन यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

Live Updates

Highlights cricket score India vs England T20 : भारताने आतापर्यंत चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या तीन टी-२० सामन्यांपैकी दोन जिंकले असून एक गमावला आहे.

18:38 (IST) 25 Jan 2025
IND vs ENG Live : भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला

भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला

भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियाने प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन बदल केले आहेत. रिंकू सिंग आणि नितीश कुमार रेड्डी बाहेर पडले आहेत. या दोघांच्या जागी वॉशिंग्टन सुंदर आणि ध्रुव जुरेलला संधी देण्यात आली आहे.

18:24 (IST) 25 Jan 2025

IND vs ENG Live : नितीश-रिंकूला दुखापत

नितीश-रिंकूला दुखापत

अष्टपैलू शिवम दुबे इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेतील उर्वरित तीन सामन्यांसाठी भारतीय संघात सामील होणार असून तो जखमी झालेल्या नितीश कुमार रेड्डीची जागा घेणार आहे. त्याचबरोबर रिंकू सिंग दुखापतीमुळे दुसऱ्या आणि तिसऱ्या टी-२० सामन्यातही खेळू शकणार नाही. त्याच्या जागी रमणदीप सिंगचा संघात समावेश करण्यात आला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) दुसऱ्या टी-२० सामन्यापूर्वी ही माहिती दिली आहे.

18:11 (IST) 25 Jan 2025

IND vs ENG T20I Live : दुसऱ्या सामन्यासाठी दोन्ही संघाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन

दुसऱ्या सामन्यासाठी दोन्ही संघाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन

भारत : संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पांड्या, रिंकू सिंग, अक्षर पटेल, नितीश कुमार रेड्डी, अर्शदीप सिंग, रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती.

इंग्लं[: बेन बेकेट, फिल सॉल्ट (यष्टीरक्षक), जोस बटलर (कर्णधार), हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, जेकब बेथेल, जेमी ओव्हरटन, ब्रायडन कारसे, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, मार्क वुड.

17:50 (IST) 25 Jan 2025

IND vs ENG Live : चेन्नईतील हवामान कसे राहणार?

Accuweather च्या वृत्तानुसार, एमए चिदंबरम स्टेडियमवर होणाऱ्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या सामन्यादरम्यान हवामान आल्हाददायक असेल. या काळात ढगाळ वातावरण असेल, पण पावसाची अजिबात शक्यता नाही. दिवसभरात तापमान 28 अंश सेल्सिअसपर्यंत राहील, तर किमान तापमान 22 अंशांपर्यंत राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे चाहत्यांना कोणत्याही व्यत्ययाशिवाय या सामन्याचा आनंद घेता येईल, असे म्हणता येईल.

17:38 (IST) 25 Jan 2025

IND vs ENG Live : जोस बटलर आणि सूर्याचा कसा आहे रेकॉर्ड

इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने चेन्नई येथे झालेल्या टी-20 सामन्यात चार डावात 108.88 च्या स्ट्राइक रेटने 98 धावा केल्या आहेत. त्याची सरासरी केवळ 24.5 आहे. साहजिकच त्याची बॅट इथे चालत नाही. त्याचवेळी, भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने 11 डावात 130.94 च्या स्ट्राइक रेटने 347 धावा केल्या आहेत.

17:26 (IST) 25 Jan 2025

IND vs ENG T20I Live : अर्शदीप सिंग इतिहास घडवण्याच्या अगदी जवळ

अर्शदीप सिंग इतिहास घडवण्याच्या अगदी जवळ

भारताचा डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग सातत्याने चांगली कामगिरी करत आहे आणि पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमध्ये आपली छाप सोडत आहे. आंतरराष्ट्रीय टी-20मध्ये 100 बळी घेण्यापासून तो केवळ 3 विकेट्स दूर आहे. असे केल्याने तो 100 T20 आंतरराष्ट्रीय विकेट घेणारा पहिला भारतीय ठरणार आहे. या सामन्यात त्याने तीन विकेट्स घेतल्यास, अशी कामगिरी करणारा तो जगातील तिसरा वेगवान गोलंदाज ठरेल.

17:13 (IST) 25 Jan 2025

IND vs ENG 2nd T20I Live : भारताचा चेन्नईत रेकॉर्ड कसा आहे?

चेन्नईतील हे मैदान चेपॉक या नावाने ओळखले जाते आणि आतापर्यंत येथे फक्त दोन टी-२० आंतरराष्ट्रीय सामने झाले आहेत. दोन्ही वेळा रोमांचक सामने पाहायला मिळाले, जिथे सामना शेवटच्या चेंडूवर संपला. पहिला सामना २०१२ मध्ये खेळला गेला होता, जेव्हा न्यूझीलंडने भारताचा केवळ एका धावेने पराभव केला होता. दुसरा सामना २०१८ साली झाला जेव्हा भारताने वेस्ट इंडिजचा ६ गडी राखून पराभव केला.

17:07 (IST) 25 Jan 2025

IND vs ENG T20I Live : नाणेफेक ठरणार निर्णायक!

आतापर्यंत चेपॉकमध्ये आयपीएलचे अनेक सामने झाले आहेत. आयपीएलच्या ९ पैकी ६ सामने येथे लक्ष्याचा पाठलाग करताना संघाने जिंकले आहेत. येथील पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या १७० आहे. सामन्याच्या उत्तरार्धात दव आपला प्रभाव सोडू शकतो, नाणेफेक जिंकल्यानंतर कर्णधाराचा निर्णय सामन्यात महत्त्वाची भूमिका बजावेल. मात्र, गेल्या आयपीएलमध्ये स्पिनर्सपेक्षा वेगवान गोलंदाजांना जास्त यश मिळाले होते.

India vs England T20I Highlights : दोन्ही संघांतील हेड टू हेड रेकॉर्डबद्दल बोलायचे तर दोन्ही संघांत आतापर्यंत एकूण २६ टी-२० सामने खेळले गेले आहेत. यापैकी भारताने १५ टी-२० जिंकले आहेत, तर इंग्लिश संघाने ११ जिंकले आहेत.