विशाखापट्टणम : दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय फलंदाजांनी बुधवारी नेटमध्ये फिरकीविरुद्ध  कसून सराव केला. पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडच्या फलंदाजांनी भारतीय फिरकीचा समाचार घेताना ‘स्विप’चा मुक्त वापर केला होता. तुलनेत भारताकडून केवळ रोहित शर्माने ‘स्विप’चे फटके मारले. मात्र, सराव सत्रात बहुतेक सर्व फलंदाजांनी ‘स्विप’च्या फटक्याचा सराव केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> मुंबई इंडियन्सचे ‘हे’ प्रताप तुम्ही वाचलेत का?

दुपारी झालेल्या या सराव सत्रात प्रामुख्याने शुभमन गिल, पदार्पणाच्या रांगेत असलेला रजत पाटीदार यांनी कसून सराव केला. सरावादरम्यान दोघांनी अनेक फटके मारले. मात्र, ‘स्विप’ आणि ‘रिव्हर्स स्विप’च्या सरावावर भर राहिला होता. भारतीय संघात स्थान मिळालेल्या सर्फराज खाननेही फलंदाजीचा सराव केला. पाठोपाठ सर्फराजने पाटीदारच्या साथीत स्लिपमध्ये झेल घेण्याकडे लक्ष दिले. दुसरीकडे सकाळच्या सत्रात इंग्लंडचेही फलंदाज नेटमध्ये ‘स्विप’चा सराव करताना दिसले. यामध्ये प्रामुख्याने जो रूटचा समावेश होता. विशेष म्हणजे ‘रिव्हर्स स्विप’चा सराव करण्यापूर्वी रूटने नेटमध्ये डाव्या हाताने फलंदाजी केली. दुखापतीच्या कारणाने फिरकी गोलंदाज जॅक लिच सरावास आला नाही. लिचचे दुसऱ्या कसोटीत खेळणे संदिग्ध मानले जात असल्यामुळे ‘व्हिसा’ अडचणीमुळे उशिराने संघात दाखल झालेला शोएब बशीर पदार्पण  करताना दिसू शकेल.