इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात आघाडीला फलंदाजीसाठी आलेल्या रोहित शर्माने दमदार खेळी केली. रोहित शर्माने १४५ चेंडूत ८३ धावांची खेळी केली. या खेळीत ११ चौकार आणि एका षटकाराचा समावेश आहे. रोहित शर्मा आणि केएल राहुल जोडी मैदानात तग धरून होती.. मात्र जेम्स अँडरसनच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत होऊन रोहित शर्मा तंबूत परतला. रोहित शर्माने अँडरसन, ऑली रॉबिनसन यांच्या गोलंदाजीवर उत्तम फलंदाजी केली. तर सॅम करनच्या एका षटकात ४ चौकार ठोकले. त्यामुळे या सामन्यात रोहित शर्मा चांगलाच फॉर्मात असल्याचं दिसून येत आहे.
इंग्लंडचा वेगवान गोलंदाज सॅम करन चेंडू स्विंग करण्यात माहिर आहे. घरच्या मैदानावर तर त्याच्या गोलंदाजीला आणखी धार येते. मात्र रोहित शर्माने त्याच्या खराब गोलंदाजीचा चांगलाच फायदा घेताल. रोहितने सॅम करनच्या एका षटकात चार चौकार मारले. त्याने ४,४,०,४,४,० अशी खेळी केली. क्रीडाप्रेमीही रोहित शर्माच्या आक्रमक खेळीचा आनंद घेत आहेत.
“त्या मॅचमध्ये कव्हर ड्राईव्ह खेळायची नाही, असंच ठरवून मैदानात उतरलो होतो”, सचिननं सांगितला किस्सा!
रोहित शर्मा आतापर्यंत ४१ कसोटी सामने खेळला आहे. त्यात त्याने ५७.४१ च्या सरासरीने २,७९४ धावा केल्या आहेत. या खेळीत ७ शतकं आणि १३ अर्धशतकांचा समावेश आहे. तर एकदा द्विशतक झळकावलं आहे.