India vs England ODI Update, 17th July : भारत आणि इंग्लंडदरम्यान सुरू असलेली तीन सामन्यांची एकदिवसीय मालिकेवर भारताने कब्जा केला आहे. निर्णायक तिसऱ्या सामन्यात भारताने यजमान इंग्लंडचा पाच गडी राखून पराभव केला. मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट स्टेडियमवर झालेला हा सामना जिंकून भारताने २-१ अशी मालिका जिंकली आहे. ऋषभ पंतचे शानदार शतक आणि हार्दिक पंड्याच्या अष्टपैलू कामगिरीच्या बळावर भारताला विजय मिळवणे शक्य झाले. नाणेफेक जिंकून भारताने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या इंग्लंडने भारतासमोर विजयासाठी २६० धावांचे आव्हान ठेवले होते.

Live Updates

IND VS ENG 3rd ODI Live : भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या एकदिवसीय सामन्याचे सर्व लाइव्ह अपडेट्स

16:42 (IST) 17 Jul 2022
इंग्लंडचा डाव गडगडला

प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलेल्या इंग्लंडचा डाव गडगडला आहे. बेन स्टोक्सच्या रुपात इंग्लंडचा चौथा गडी बाद झाला आहे. बेन स्टोक्सने २७ धावा केल्या.

16:38 (IST) 17 Jul 2022
१३ षटकांमध्ये इंग्लंडच्या तीन बाद ७४ धावा

१३ षटकांमध्ये इंग्लंडच्या तीन बाद ७४ धावा झाल्या आहेत. कर्णधार जोस बटलर (४) आणि बेन स्टोक्स (२७) इंग्लंडचा डाव सावरण्याचा प्रयत्न करत आहेत.

16:24 (IST) 17 Jul 2022
इंग्लंडचा तिसरा गडी तंबूत

जेसन रॉयच्या रुपात इंग्लंडचा तिसरा गडी तंबूत परतला आहे. त्याने ३१ चेंडूत ४१ धावा केल्या आहेत. इंग्लंडच्या १० षटकांमध्ये तीन बाद ६६ धावा झाल्या आहेत.

16:07 (IST) 17 Jul 2022
इंग्लंडचे अर्धशतक पूर्ण

जेसन रॉय आणि बेन स्टोक्स डाव सावरण्याचा प्रयत्न करत आहेत. दोघांनी फटकेबाजी सुरू केली असून संघाचे अर्धशतक धावफलकावर लावले आहे. ७.१ षटकामध्ये इंग्लंडच्या ५० धावा पूर्ण झाल्या.

15:55 (IST) 17 Jul 2022
पाच षटकांमध्ये इंग्लंडच्या दोन बाद ३२ धावा

दोन गडी झटपट बाद झाल्यानंतर जेसन रॉय आणि बेन स्टोक्स डाव सावरण्याचा प्रयत्न करत आहेत. पहिल्या पाच षटकांमध्ये इंग्लंडच्या दोन बाद ३२ धावा झाल्या आहेत.

15:42 (IST) 17 Jul 2022
इंग्लंडच्या संघाला जो रूटच्या रुपात दुसरा धक्का

मोहम्मद सिराजने शानदार गोलंदाजी करून इंग्लंडचा दुसरा गडी बाद केला आहे. जो रूट शून्यावर बाद झाला. इंग्लंडची अवस्था दोन बाद १२ धावा अशी आहे.

15:39 (IST) 17 Jul 2022
सिराजने दिला इंग्लंडला पहिला धक्का

इंग्लंडचा स्फोटक फलंदाज जॉनी बेअरस्टो खाते न उघडताच तंबूत परतला. मोहम्मद सिराजने बदली क्षेत्ररक्षक श्रेयस अय्यरकरवी त्याला बाद केले.

15:34 (IST) 17 Jul 2022
पहिल्याच षटकात इंग्लंडची फटकेबाजी

डावाच्या पहिल्याच षटकात इंग्लंडच्या सलामीवीरांनी आक्रमक खेळ सुरू केला आहे. मोहम्मद शमीने फेकलेल्या षटकात १२ धावा निघाल्या.

15:31 (IST) 17 Jul 2022
इंग्लंडच्या फलंदाजीला सुरुवात

नाणेफेक गमावल्यामुळे इंग्लंडच्या संघाला प्रथम फलंदाजी करावी लागत आहे. सलामीवीर जेसन रॉय आणि जॉनी बेअरस्टो यांनी डावाची सुरुवात केली आहे.

15:08 (IST) 17 Jul 2022
भारतीय संघात एक बदल

भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, प्रसिद्ध कृष्णा, युझवेंद्र चहल, मोहम्मद सिराज.

इंग्लंडचा संघ : जोस बटलर (कर्णधार आणि यष्टीरक्षक), जॉनी बेअरस्टो, जेसन रॉय, जो रूट, बेन स्टोक्स, लियाम लिव्हिंगस्टोन, मोईन अली, डेव्हिड विली, ब्रायडन कार्स, रीस टॉपली, क्रेग ओव्हरटन.

15:05 (IST) 17 Jul 2022
जसप्रीत बुमराहच्या जागी सिराजला संधी

निर्णायक एकदिवसीय सामन्यात किरकोळ दुखापतीमुळे जसप्रीत बुमराह खेळू शकणार नाही. त्याच्या जागी सिराजला संधी देण्यात आली आहे.

15:04 (IST) 17 Jul 2022
नाणेफेक जिंकून भारताचा गोलंदाजीचा निर्णय

भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकली आहे. भारत प्रथम गोलंदाजी करणार आहे.

14:52 (IST) 17 Jul 2022
रोहित शर्माकडे इतिहास रचण्याची संधी

भारताने आजचा सामना जिंकून मालिका आपल्या नावे केली तर कर्णधार रोहित शर्माच्या नावे इतिहास लिहिला जाईल. इंग्लंडमध्ये द्विपक्षीय मालिका जिंकणारा तो तिसरा भारतीय कर्णधार ठरेल.